ब्रह्मत्वाची खूण जप
360.
ब्रह्मत्वाची खूण जप गायत्रीचा ।
जो सर्व वेदांचा मूळमंत्र ॥१॥
तयाहून परते आहेसे सांगती ।
ते जाणावे मतिमंत हीन ॥२॥
गुणासाम्य ऐसी म्हणती मूळमाया ।
गायत्री ते जया ब्रह्मरूप ॥३॥
अकार ऊकार मकाराचे बीज ।
ओंकाराचे निज उन्मनी हे ॥४॥
इजपासूनिया जाले वेदविद ।
गायत्री प्रसिद्ध वेदमाता ॥५॥
बहेणि म्हणे जया गायत्रीचा जप ।
तो ब्रह्मस्वरूप केवळ जाणा ॥६॥
