वेद तोचि जीवात्मा ।
362.
वेद तोचि जीवात्मा ।
वेद तोचि परमात्मा ।
ज्याचेनि हा एवढा महिमा ।
ब्रह्मसुखाचा ॥१॥
वेदुचि वेदुचि नव्हता जेवा ।
ब्रह्मांड कैचे तेव्हा ।
सुखदुःख भोगणे या जीवा ।
कासया पाहे ॥२॥
ॐकारब्रह्मीचा बिंदु ।
तेथुनी उपजला वेदू ।
त्रिगुणेसी वाढला भेदू ।
ब्रह्मांडकारे ॥३॥
ऊर्ध्वमूळ अधोशाखा ।
प्रसवला वेद देखा ।
खांद्या पत्रपुष्प सर्वथा ।
निर्माण जाल्या ॥४॥
छंदपदजटाक्रम ।
आरण्य-ब्राह्मण जाण ।
विस्तारला वेद आपण ।
ब्रह्मस्वरूप ॥५॥
कर्म तेचि ब्रह्म जाण ।
ब्रह्म तेचि कर्म आपण ।
कर्म ब्रह्म नाही रे भिन्न ।
वेदार्थ-बोधे ॥६॥
तत्त्वार्थ वेदींचा अर्थु ।
वेदान्ताचा मथितार्थु ।
जेणे निरसे संसार भेदू ।
अद्वयबोधे ॥७॥
अद्वय ऐसे हे वचन ।
दुसरे ते नव्हेचि जाण ।
स्वसंवेद्य अवघा आपण ।
सर्वी सर्वत्र ॥८॥
भूतमात्री व्यापक ।
तोचि तू वर्ततू देख ।
व्यतिरेकान्वये सुख ।
अनुभवे पाहावे ॥९॥
बहेणि म्हणे वेदान्वये ।
ज्ञान ते निखळ लाहे ।
वरकड ते मलिन होये ।
अंधाचे परी ॥१०॥
