समाधि हरीची समसुखेवी
363.
समाधि हरीची समसुखेवीण ।
न साधेल जाणे द्वैतबुध्दी ॥१॥
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे ।
एका केशिराजे सकळसिध्दि ॥२॥
ऋध्दिसिध्दिनिधी अवघीच उपाधी ।
जव त्या परमानंदी मन नाही ॥३॥
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ।
हरीचे चिंतन सर्वकाळ ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
