बरे झाले शरण गेलो ।
367.
बरे झाले शरण गेलो ।
संती लाविलो निज सोयी ॥१॥
म्हणती पंढरीचा हाट ।
करी बोभाट हरीनामे ॥२॥
येईल तो वरावरी ।
धरील श्रीहरी हदयेंसी ॥३॥
निळा म्हणे एकचि खेपे ।
खंडती पापे सकळही ॥४॥
367.
बरे झाले शरण गेलो ।
संती लाविलो निज सोयी ॥१॥
म्हणती पंढरीचा हाट ।
करी बोभाट हरीनामे ॥२॥
येईल तो वरावरी ।
धरील श्रीहरी हदयेंसी ॥३॥
निळा म्हणे एकचि खेपे ।
खंडती पापे सकळही ॥४॥