श्रीकृष्ण जन्माचे अभंग वारकरी भजनी मालिका 2

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Gokul ashtami shrikrushn jayanti gopal kala janmache abhang

हरिविजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठी)

  1. कृष्ण जन्माचे अभंग

१ पापी जे अभक्त दैत्य ते
२ वासुदेव ह्रुषिकेशा माधवा
३ आकाशीची वाणी सांगे
४ शेषाप्रती बोले लक्ष्मीचा
५ पूर्वी तूं अनुज झालासी
६ वसुदेवा देत देवकी बहीण
७ सातवा जो गर्भ योगमाया
८ देवकीचें तेज दिसे
९ विमानांची दाटी अंतरिक्षी
१० मयूरादि पक्षी नृत्य
११ दशरथें मारिला तोचि
१२ फिराविली दोनी
१३ कृष्ण गोकुळीं जन्मला
१४ गोकुळींच्या सुखा
१५ अनंत ब्रह्मांडे उदारीं

हरिविजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठी)

कृष्ण जन्माचे अभंग प्रारंभ

टीप :
श्रावण वद्य अष्टमी अर्थात गोकुळ अष्टमी (जन्माष्टमी) आहे,

तेंव्हा भ. श्रीकृष्ण यांची खालीलप्रमाणे प्रतिमा घेऊन ती उंचावर किंवा पाळण्यात ठेवून पंचामृत, सुंठ-साखर, खोबरे, यांचा प्रसाद बनवून दिवसभर एकादशी सारखा उपवास करून रात्री भ. श्रीकृष्ण यांचे स्मरण. कीर्तन. भजन, नृत्य आदी रीतीने उत्सव साजरा करावा.

विशेष टीप :- श्रीकृष्ण जयंतीचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडवा.

रात्रौ १२ वाजता भ. श्रीकृष्ण यांचा जन्म अभंग नं. ११ दशरथें मारिला तोचि होता मास हा संपूर्ण अभंग जसा म्हणता येईल तसा म्हणून शेवटचे चरण पूर्ण झाले कि
किंवा
हरिविजय ग्रंथातील तिसरा अध्याय म्हणून साजरा करावा.
(तिसरा अध्याय श्रीकृष्ण जन्माच्या अभंगाच्या शेवटी दिलेला आहे.)

सर्वांनी गजर करताना फुले. गुलाल उधळणे (वर्षाव) करणे.
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपालकृष्ण भगवान कि जय!!!!!!! …

पापी जे अभक्त दैत्य जे मातले
पापी जे अभक्त दैत्य जे मातले । धरणीसी झाले ओझे त्यांचे ॥१॥
दिधलासे त्रास ऋषीमुनि सर्वां । न पूजिती देवा कोणी एक ॥२॥
राहिले यज्ञ मोडिले कीर्तन । पळाले ब्राह्मण दैत्यां भेणे ॥३॥
वत्सरुपी पृथ्वी ब्रह्मयापाशीं जाय । नेत्रीं वाहे तोय सांगतसे ॥४॥
बुडविला धर्म अधर्म झाला फार । सोसवेना भार मज आता ॥५॥
ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव । चालियेले सर्व क्षीराब्धीशीं ॥६॥
नामा म्हणे आता करितील स्तुती । सावधान चित्ती परिसावे ॥ ७ ।

वासुदेवा हृषीकेशा माधवा मधुसुदना

वासुदेवा हृषीकेशा माधवा मधुसुदना । करिताती स्तवना पुरुषसुक्ते ॥१॥
पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशायी । आम्हा कोणी नाही तुजवीण ॥२॥
जनार्दना हरी श्रीवत्सला गरुडध्वजा । पाव अधोक्षजा आता आम्हां ॥३॥
वराहा पुंढरीका नृसिंहा नरांतका । वैकुंठनायका देवराया ॥४॥
अच्युता शाश्वता अनंता अज अव्यया । कृपेच्या अभया देई आम्हां ॥५॥
नारायणा देवाध्यक्षा कैटभभंजना । करी रे मर्दना दुष्टांचिया ॥६॥
चक्रगदाशंकपाणी नरोत्तमा । पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या ॥ ७ ॥
रामा हयग्रीवा भीमा रौद्रोद्धवा । आश्रय भुतां सर्वां तुझा असे ॥ ८ ॥
श्रीधरा श्रीपते चतुर्बाहो मेघ:श्यामा । लेंकुरें आम्ही आम्हा पाव त्वरें ॥ ९ ॥
नामा म्हणे ऐसे करितां स्तवन । तोषला भगवान क्षीराब्धींत ॥ १० ॥

हरिविजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठी)

आकाशींची वाणी सांगे सकळाशी
आकाशींची वाणी सांगे सकळाशी । तळमळ मानसी करू नका ॥१॥
देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गाई भक्त ॥२॥
उतरील भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वासी करील तो ॥३॥
रोहिणी उदरीं शेष बळिभद्र । यादव समग्र व्हा रे तुम्ही ॥४॥
ऐकोनिया ऐसे आनंद मानसी । येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥५॥

शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर

शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आता ॥१॥
पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार । गाऱ्हाणें सुरवर सांगू आले ॥२॥
शेष म्हणे मज श्रम झाले फार । यालागीं अवतार मी न घेंचि ॥३॥
राम अवतारीं झालो लक्ष्मण । सेविलें अरण्य तुम्हांसवे ४ ॥
चौदा वर्षावरी केले उपोषण । जाणतां आपण प्रत्यक्ष हे ॥५॥
नामा म्हणे ऐसे वदे धरणीधर । हांसोनि श्रीधर काय बोले ॥ ६ ।

पुर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ
पुर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोशियेले कष्ट मजसवें ॥१॥
आता तूं वडील होईं गा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बा रे ॥२॥
देवकीउदरीं रहावें जावोनी । मायेसी मागूनि पाठवितो ॥३॥
योगमाया तुज काढील तेथून । घालील नेऊन गोकुळासी ॥४॥
लक्ष्मीसी सांगे तेव्हां हृषीकेशी । कौंडण्यपुरासी जावे तुम्ही ॥५॥
नामा म्हणे ऐसा करूनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असे ॥६॥

वसुदेवा देत देवकी बहीण
वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्ये विघ्न झाले ऐका ॥१॥
आकाशीची वाणी सांगतसे कंसा । मानी हा भरंवसा बोलण्याचा ॥२॥
आठवा हिचा पुत्र वधील तुजसी । ऐकोनी मानसी क्रोधावला ॥३॥
घेऊनिया खड्‌ग माराया धांवला । हात तो धरिला वसुदेवे ॥४॥
देईन मी पुत्र सत्य माझे मानीं । ठेवा बंदीखानी दुता सांगे ॥५॥
पुण्य सारावया भेटे देवऋषी । वधी बाळकांसी ठेवुं नको ॥६॥
होताचि प्रसुत नेऊनिया देत । सहाही मारीत दुराचारी ॥ ७ ॥
धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक । वधितां बाळक नामा म्हणे ॥ ८ ॥

हरिविजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठी)

सातवा जो गर्भ योगमाया नेत
सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्चर्यकरीत मनामाजीं ॥१॥
रोहिणी उदरीं नेवोनी घातला । न कळे कोणाला देवावीण ॥२॥
कंसाचिया भेणें यादव पळाळे । ब्राह्मण राहिले अरण्यात ॥३॥
नाही कोणा सुख तळमळ मानसी । वधील दुष्टांसी कोण आता ॥४॥
विश्वाचा जो आत्मा कळलें तयाला । दावितसे लीला संभुतीची ॥ ॥
अहर्निशी ध्यान भक्तांचे मानसी । स्थापील धर्मासी नामा म्हणे ॥६॥

देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचे हृदय जळतसे ॥१॥
हरणें पळती देखोनिया व्याघ्र । कांपे थरथर तैशापरी ॥२॥
अजासर्पन्यायें कीटकभ्रमर । दिसती नारीनर कृष्णरूप ॥३॥
जेवितां बोलतां सेजेसीं पैं निजे । आला आला मज मारावया ॥४॥
नाशील हा आता दैत्याचें ते बंड । फाटलीसे गांड तेव्हां त्याची ॥५॥
नामा म्हणे भयें लागलेसें ध्यान । चराचरी कृष्ण दिसतसे ॥६॥

विमानांची दाटी अंतरिक्षी देव
विमानांची दाटी अंतरिक्षी देव । करिताती सर्व गर्भस्तुति ॥१॥
सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ती । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥
सहाजणें भांडती नवजणी स्थापिती । न कळे कोणाप्रती अंत तुझा ॥३॥
अठराजणें तुझी वर्णिताती कीर्ति । गुणातीता श्रीपति नमो तुज ॥४॥
चौघां जणां तुझा न कळेची पार । श्रमसी वारंवार आम्हांसाठी ॥५॥
अठ्ठ्याऐंशी सहस्त्र वर्णितांती तुज । ब्रह्मांडाचे बीज तुज नमो ॥ ६ ।
जन्ममरणांचे नाही तया भय । आठविती पाय तुझे जे का ॥ ७ ॥
नवजणी तुझ्या पायी लोळताती । परब्रह्म मूर्ति तुज नमो ॥ ८ ॥
नामा म्हणे ऐशी करिताती स्तुति । पुष्पें वाहूनि जाती स्वस्थळांशी ॥ ९ ॥

मयूरादि पक्षी नृत्य करीताती|
मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोहीं थड्या ॥१॥
भूमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरी सकळाच्या ॥२॥
विमानांची दाटी सुरवर येती । गंधर्व गाताती सप्तस्वरें ॥३॥
मंदमंद मेघ गर्जना करिती । वाद्यें वाजताती नानापरी ॥४॥
नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती । अप्सरा नाचती आनंदाने ॥५॥

दशरथें मारिला तोचि होता मास
दशरथें मारिला तोचि होता मास ।
वर्षाऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥
वसुनाम तिथि बुधवार असे ।
शुक सांगतसे परीक्षिती ॥२॥
रोहिणी नक्षत्र दोन प्रहररात्र ।
माया घाली अस्त्र रक्षपाळां ॥३॥
नवग्रह अनुकूल सर्वांचे जेमूळ ।
वसुदेव कपाळ धन्य धन्य ॥४॥
जयाचा तो वंश तयासी आनंद ।
माझ्या कुळीं गोविंद अवतरला ॥५॥
अयोनीसंभव नोहे कांही श्रमी ।
नामयाचा स्वामी प्रगटला ॥६॥

टीप : शेवटचे चरण म्हणून फुले. गुलाल उधळणे (वर्षाव) करणे.

सोडा सोडा मीठि
सोडा सोडा मीठि । लपवा लपवा जगजेठी ॥१॥
झणीं कंसासी कळेल । माझ्या बाळासी मारील ॥२॥
वसुदेवा चिंता मनीं । तेज न माये गगनीं ॥३॥
नामा म्हणे आलें हांसे । देव तेव्हां सांगतसे ॥४॥

हरिविजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठी)

२. नंदाच्या घराला । मज नेई
नंदाच्या घराला । मज नेई गोकुळाला ॥१॥
माया उपजली तेथे । ठेवी मज आणि येथे ॥२॥
म्हणसीं असे रक्षपाळ । ते म्या मोहिले सकळ ॥३॥
आच्छादित रूप । नामा म्हणे माझा बाप ॥४॥

उचलिला कमळापती
उचलिला कमळापती । पायीचीं बंधने गळतीं ॥१॥
त्रैलोक्यांत जो न माय । त्यासी बंधन करील काय ॥२॥
कवाडें उघडतीं । देखतांची देवाप्रती ॥३॥
मंद मंद पडे पाऊस । शिरी छाया करी शेष ॥४॥
पूर चढला अचाट । त्यासी लाविला अंगुष्ठ ॥५॥
त्वरें आला नंदाघरी । निद्रिस्त त्या नरनारी ॥६॥
ठेवी तेथे कृष्णजीला । माया घेऊनि निघाला ॥ ७ ॥
रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत ॥ ८ ॥

पूर्णब्रम्ह मानी कंसाच्या भयासी
पूर्णब्रम्ह मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसी कोणाचिया ॥१॥
इच्छामात्रें करी सुष्टीचा प्रलय । त्यासी भय असे कवणाचें ॥२॥
नंदाचे सुकृत झाले अगणित । म्हणोनि भगवंत आला तेथे ॥३॥
सर्वा होय सुख तरतील लोक । नामा म्हणे शुक सांगतसे ॥४॥

तांतडीने जाती । कंसा
तांतडीने जाती । कंसा सेवक सांगती ॥१॥
उपजला वैरी । त्यासी तूं रे त्वरें मारी ॥२॥
त्वरें धांव घाली । पाहे कन्या उपजली ॥३॥
ज्याचा धाक तुज । नव्हे कन्या द्यावी मज ॥४॥
मारायासी खड्‌ग घाली । हातीची निष्टूनिया गेली ॥५॥
तुजलागीं वधी । उपजला मज आधीं ॥६॥
सांगे ब्रह्मज्ञान । देवकीचें समाधान ॥ ७ ॥
नामा म्हणे तयेवेळीं । त्यांची बंधनें काढिलीं ॥ ८ ॥

शुक म्हणे राया ऐक परीक्षिती
शुक म्हणे राया ऐक परीक्षिती । श्रवन करितां तृप्ती नाही तुज ॥१॥
माया जातां मथुरे सावध निद्रिस्त । देखिला भगवतं यशोदेनें ॥२॥
ब्रह्माडें उदरीं न कळे कोणाला । वाजविती थाळा जन्मकाळीं ॥३॥
यज्ञभोक्ता कृष्ण त्यासी देती बोळा । ध्यानीं ध्याय भोळा सदाशिव ॥४॥
गौळणी बहाती नंदालागीं तेव्हा । पुत्रमुख पाहा नामा म्हणे ॥५॥

फिरविली दोन्ही । कन्या
फिरविली दोन्ही । कन्या आणि चक्रपाणि ॥१॥
झाला आनंदि आनंद । अवतरले गोविंद ॥२॥
तुटली बंधनें । वसुदेव देवकीचीं दर्शनें ॥३॥
गोकुळासी आलें । ब्रम्हा अव्यक्त चांगंलें ॥४॥
नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपति ॥५॥
निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥६॥
आनंदली मही । भार गेला सकळही ॥ ७ ॥
तुका म्हणे कंसा । आट भोविला वोळसा ॥८॥

कृष्ण गोकुळी जन्मला
कृष्ण गोकुळी जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥
होता कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥२॥
सदा नाम वाचे गातीं । प्रेमे आनंदे नाचती ॥३॥
तुका म्हणे हरती दोष । आनंदाने करिती घोष ॥४॥

गोकुळीच्या सुखा । अंतपार
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदाघरीं । आनंदल्या नरनारी ॥२॥
गुढिया तोरणें । करिती कथा गातीं गाणें ॥३॥
तुका म्हणे छंदे । येणॆं वेधिलीं गोविंदें ॥४॥

अनंत ब्रह्मांडे उदरीं
अनंत ब्रह्मांडे उदरीं । हरि हा बाळक नंदाघरीं ॥१॥
नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडे ॥२॥
पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासी यशोदा भोजन घाली ॥३॥
विश्वव्यापक कमळापती । त्यासी गौळणी कडिये घेती ॥४॥
तुका म्हणे नटधारी । भोग भोगुनी ब्रह्मचारी ॥५॥

पापी जे अभक्त दैत्य ते माजले
पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसीं झाले ओझें त्यांचे ॥१॥
दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वां । न पूजिती देवा कोणी एक ॥२॥
राहियेले यज्ञ मोडिलें कीर्तन । पळाले ब्राम्हण दैत्यां भेणे ॥३॥
वत्सरुपी पृथ्वी ब्रम्हयापाशीं जाय । नेत्रीं वाहे तोय सांगतसे ॥४॥
बुडविला धर्म अधर्म झाला फ़ार । सोसवेना भार मज आतां॥५॥
ब्रम्हा इंद्र आणि बरोबरी शीव । चालियेले सर्व क्षीराब्धीशी ॥६॥
नामा म्हणे आतां करितील स्तुती । सावधान चित्तीं परिसावें ॥७॥

वासुदेव ह्रुषिकेशा माधवा
वासुदेव ह्रुषिकेशा माधवा मधुसूदना । करितातीं स्तवना पुरुषसूक्तें ॥१॥
पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशायी । आम्हां कोणी नाहीं तुजवीण ॥२॥
जनार्दना हरि श्रीवत्सला गरुडध्वजा । पाव अधोक्षजा आतां आम्हां ॥३॥
वराहा पुंडरीका नृसिंहा नरांतका । वैकुंठनायका देवराया ॥४॥
अच्युता शाश्वता अनंता अज अव्यया । कृपेच्या अभया देई आम्हां ॥५॥
नारायणा देवाध्यक्षा कैठभभंजना । करी रे मर्दना दृष्टाचिया ॥६॥
चक्रगदा शंखपाणि नरोत्तमा । पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या ॥७॥
रामा हयग्रीवा भीमा रौद्रोभ्दवा । आश्रय भूतां सर्वा तुझा असे ॥८॥
श्रीधरा श्रीपति चतुर्बाहो मेघ :शामा । लेकुंरे आम्हां पाव त्वरें ॥९॥
नामा म्हणे ऐसें करितां स्तवन । तोषला भगवान क्षीराब्धींत ॥१०॥

हरिविजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठी)

आकाशीची वाणी सांगे सकळांसी
आकाशीची वाणी सांगे सकळांसी । तळमळ मानसीं करु नका ॥१॥
देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राम्हण गाई भक्त ॥२॥
उतरील भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांसी करील तो ॥३॥
रोहिणी उदरीं शेष बळिभद्र । यादव समग्र व्हा रे तुम्ही ॥४॥
ऐकोनियां ऐसें आनंद मानसीं । येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥५॥

शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आतां ॥१॥
पृथ्वीवरी दैत्य माजले ते फ़ार । गार्‍हाणें सुरवर सांगुं आले॥२॥
शेष म्हणे मज श्रम झाले फ़ार । यालागीं अवतार मी ग घेचि ॥३॥
राम अवतारीं झालें लक्षुमण । सेविलें अरण्य तुम्हांसवे ॥४॥
चौदा वर्षावरी केलें उपोषण । जाणातां आपण प्रत्यक्ष हें ॥५॥
नामा म्हणे ऐसें वदे धरणीधर । हासोनी श्रीधर काय बोले ॥६॥

पूर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ
पूर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोसियेले कष्ट मजसवें ॥१॥
आतां तूं वडील होई गा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बा रे ॥२॥
देवकी उदरीं राहावें जावोनी । मायेसी मागुनी पाठवितों ॥३॥
योगमाया तुज काढील तेथुन । घालीन नेऊन गोकुळासी ॥३॥
लक्ष्मीसी सांगे तेव्हांह्र्षीकेषी । कौडण्यपुरासी जावें तुम्हीं ॥५॥
नामा म्हणे ऐसा करुनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असे ॥६॥

वसुदेवा देत देवकी बहीण
वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्ये विघ्न झालें ऐका ॥१॥
आकाशीची वाणी सांगतसे कंसा । मानी भरवंसा हा बोलण्याचा ॥२॥
आठवा इचा पुत्र वधील तुजसी । ऐकोनी मानसीं क्रोधावला ॥३॥
घेऊनियां खडग माराया धांवला । हात तो धरीला वासुदेवें ॥४॥
देईन मी पुत्र सत्य माझें मानी । ठेवा बंदीखानीं दूता सांगें ॥५॥
पुण्य सारावया भेटे देवऋषी । वधी बाळकांसी ठेवूं नको ॥६॥
होतांची प्रसूत नेऊनियां देत । सहाही मारीत दुराचारी ॥७॥
धन्य त्याचें ज्ञान न करीच शोक । वधितां बाळक नामा म्हणॆ ॥८॥

सातवा जो गर्भ योगमाया नेत
सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्र्चर्य करीत मनामाजी ॥१॥
रोहीणी उदरीं नेवोनी घातला । न कळे कोणाला देवावीण ॥२॥
कंसाचिया भेणें यादव पळाले । ब्राम्हण राहिले अरण्यांत ॥३॥
नाही कोणा सुख तळमळ मानसीं । वधील दुष्टासी कोण आतां ॥४॥
विश्‍वाचा जो आत्मा कळलें तयाल । दावितसे लीला संभूतीची ॥५॥
अहर्निशीं ध्यान भक्तांचे मानसीं । स्थापिल धर्मासी नामा म्हणे ॥६॥

देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य
देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचे ह्र्दय जळतसे ॥१॥
हरणें पळती देखोनियां व्याघ्र । कांपे थरथर तयापरी ॥२॥
अजासर्पन्यानें कीटकभ्रमर । दिसती नारीनर कृष्णरुप ॥३॥
जेवितां बोलतां शेजेसी तो निजे । आला आला मज मारावया ॥४॥
नाशील हा आतां दैत्यांचे तें बंड । फ़ाटलीसे गांड तेव्हां त्याची ॥५॥
नामा म्हणे भय़ें लागलेंसे ध्यान । चराचरीं कृष्ण दिसतसे ॥६॥

विमानांची दाटी अंतरिक्षी देव
विमानांची दाटी अंतरिक्षी देव । करिताती सर्व गर्भस्तुति ॥१॥
सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ती । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥
सहाजणीं भांडती नवजणीं स्थापिती । न कळे कोणाप्रती अंत तुझा ॥३॥
आठराजणें तुझी वर्णिताती कीर्ति । गुणातीत श्रीपति नमो तुज ॥४॥
चौघां जणां तुझा न कळेचि पार । श्रमसी वारंवार आम्हांसाठीं ॥५॥
आठ्यांशी सहस्त्र वर्णिताती तुज । ब्रह्माडांचे बीज तुज नमो ॥६॥
जन्म मरणानें नाहीं तया भय । आठविती पाय तुझेजे कां ॥७॥
नवजणी तुझ्या पायीं लोळतांतीं । परब्रम्हा मूर्ति तुज नमो ॥८॥
नामाम्हणे ऐसी करिताती स्तुती । पुष्पें वाहूनि जाती स्वस्थळासीं ॥९॥

मयूरादि पक्षी नृत्य करीताती
मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोहीं थड्या ॥१॥
भुमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरीं सकळांच्या ॥२॥
विमानांची दाटी सुरवर येती । गंधर्व गाताती सप्तस्वरे ॥३॥
मंद मंद मेघ गर्जना करिती । वाद्यें वाजताती नानापरी ॥४॥
नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती । अप्सरा नाचती आनंदाने ॥५॥

दशरथें मारिला तोचि होता मास
दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षा ऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥
वसुनाम तिथी बुधवार असे । शुक सांगतसे परीक्षिती ॥२॥
रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र । माया घाली अस्त्र रक्षपाळां ॥३॥
नवग्रह अनुकूल सर्वांचे जें मूळ । वसुदेव कपाळ धन्य धन्य ॥४॥
जयाचा हा वंश तयासी आनंद । माझा कुळीं गोविंद अवतरला ॥५॥
अयोनीसम्भव नोहे कांही श्रमी । नामयाचा स्वामी प्रगतला ॥६॥

सोडा सोडा मीठि । लपवा
सोडा सोडा मीठि । लपवा लपवा जगजेठी ॥१॥
झणीं कंसासी कळेल । माझ्या बाळासी मारील ॥२॥
वसुदेवा चिंता मनीं । तेज न माये गगनीं ॥३॥
नामा म्हणे आलें हांसे । देव तेव्हां सांगतसे ॥४॥

नंदाच्या घराला । मज
नंदाच्या घराला । मज नेई गोकुळाला ॥१॥
माया उपजली तेथें । ठेवी मज आणि येथें ॥२॥
म्हणसीं असे रक्षपाळ । तें म्या मोहिले सकळ ॥३॥
आच्छादित रूप । नामा म्हणे माझा बाप ॥४॥

उचलिला कमळापती । पायीचीं
उचलिला कमळापती । पायीचीं बंधने गळतीं ॥१॥
त्रैलोक्यांत जो न माय । त्यासी बंधन करील काय ॥२॥
कवाडें उघडतीं । देखतांची देवाप्रती ॥३॥
मंद मंद पडे पाऊस । शिरी छाया करी शेष ॥४॥
पूर चढला अचाट । त्यासी लाविला अंगुष्ठ ॥५॥
त्वरें आला नंदाघरी । निद्रिस्त त्या नरनारी ॥६॥
ठेवी तेथें कृष्णजीला । माया घेऊनि निघाला ॥७॥
रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत ॥८॥

हरिविजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठी)

पूर्णब्रम्ह मानी कंसाच्या भयासी
पूर्णब्रम्ह मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसीं कोणाचिया ॥१॥
इच्छामात्रें करी सुष्टीचा प्रलय । त्यासी भय असे कवणाचें ॥२॥
नंदाचे सुकृत झालें अगणित । म्हणोनि भगवंत आला तेथें ॥३॥
सर्वा होय सुख तरतील लोक । नामा म्हणे शुक सांगतसे ॥४॥

तांतडीने जाती । कंसा सेवक
तांतडीने जाती । कंसा सेवक सांगती ॥१॥
उपजला वैरी । त्यासी तूं रे त्वरें मारी ॥२॥
त्वरें धांव घाली । पाहे कन्या उपजली ॥३॥
ज्याचा धाक तुज । नव्हे कन्या द्यावी मज ॥४॥
मारायासी खड्‌ग घाली । हातीची निष्टूनिया गेली ॥५॥
तुजलागीं वधी । उपजला मज आधीं ॥६॥
सांगे ब्रह्मज्ञान । देवकीचें समाधान ॥७॥
नामा म्हणे तयेवेळीं । त्यांची बंधनें काढिलीं ॥८॥

शुक म्हणे राया ऐक परीक्षिती
शुक म्हणे राया ऐक परीक्षिती । श्रवन करितां तृप्ती नाहीं तुज ॥१॥
माया जातां मथुरे सावध निद्रिस्त । देखिला भगवतं यशोदेनें ॥२॥
ब्रह्माडें उदरीं न कळे कोणाला । वाजविती थाळा जन्मकाळीं ॥३॥
यज्ञभोक्ता कृष्ण त्यासी देती बोळा । ध्यानीं ध्याय भोळा सदाशिव ॥४॥
गौळणी बहाती नंदालागीं तेंव्हा । पुत्रमुख पाहा नामा म्हणे ॥५॥

फिराविली दोनी
फिराविली दोनी । कन्या आणि चक्रपाणि ॥१॥
झाला आनंदि आनंद । अवतरले गोविंद ॥२॥
तुटली बंधनें । वसुदेव देवकीचीं दर्शनें ॥३॥
गोकुळासी आलें । ब्रम्हा अव्यक्त चांगंलें ॥४॥
नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपति ॥५॥
निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥६॥
आनंदली मही । भार गेला सकळही ॥७॥
तुका म्हणे कंसा । आट भोविला वोळसा ॥८॥

कृष्ण गोकुळीं जन्मला
कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥
होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥२॥
सदा नाम वाचे गातीं । प्रेमे आनंदे नाचती ॥३॥
तुका म्हणे हरती दोष । आनंदाने करिती घोष ॥४॥

गोकुळींच्या सुखा
गोकुळींच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदाघरीं । आनंदल्या नरनारी ॥२॥
गुढिया तोरणें । करिती कथा गातीं गाणें ॥३॥
तुका म्हणे छंदे । येणॆं वेधिलीं गोविंदें ॥४॥

अनंत ब्रह्मांडे उदारीं
अनंत ब्रह्मांडे उदारीं । हरि हा बाळक नंदाघरीं ॥१॥
नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडे ॥२॥
पृथ्वी जेणें तृत्प केली । त्यासी यशोदा भोजन घाली ॥३॥
विश्वव्यापक कमळापती । त्यासी गौळणी कडिये घेती ॥४॥
तुका म्हणे नटधारी । भोग भोगुनी ब्रह्माचारी ॥५॥

हरिविजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठी)

अवतार गोकुळी हो। जन
भ. श्रीकृष्ण आरती

टीप: जन्म झाल्यावर खालील आरती जरूर म्हणावी.

अवतार गोकुळी हो। जन तारावयासी।
लावण्यरुपडे हो। तेज:पुंजाळ राशी।
उगवले कोटिबिंब। रवि लोपला शशी।
उत्साह सुरवरां। महाथोर मानसी।।1।।

जय देवा कृष्णनाथा। जय रखुमाई कांता।
आरती ओवाळीन। तुम्हा देवकीसुता ।।धृ।।

कौतुक पहावया। माव ब्रह्मयाने केली।
वत्सेही चोरूनिया। सत्यलोकासी नेलीं।
गोपाळ गाईवत्सें। दोन्ही ठाई रक्षिली।
सुखाचा प्रेमसिंधु। अनाथांची माऊली।।2।।

चोरितां गोधनें हो। इन्द्र कोपलाभारी।
मेघ कडाडिला। शिला वर्षलल्या धारी।
रक्षिले गोकुळ हो। नखीं धरिला गिरी।
निर्भय लोकपाळ। अवतरले हरी।।3।।

वसुदेव देवकीचे। बंद फोडिली शाळ।
होऊनिया विश्वजनिता। तया पोटिंचा बाळ।
दैत्य हे त्रासियेले। समुळ कंसासी काळ।
राज्य हें उग्रसेना। केला मथुरापाळ।।4।।

तारिले भक्तजन। दैत्य सर्व निर्दाळूनि।
पांडवा साहाकारी। अडलिया निर्वाणी।
गुण मी काय वर्णु। मति केवढी वाणी।
विनवितो दास तुका। ठाव मागे चरणी।।5।।

****॥ विठ्ठल-विठ्ठल ॥*****


कृष्ण जन्माचे अभंग समाप्त

[05/09, 9:07 pm] +91 88068 77702: 🚩श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत पूजन कसे करावे ?

श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरेत भगवान कृष्णाने अवतार घेतला. म्हणूनच या दिवसाला कृष्ण जन्माष्टमी किंवा जन्माष्टमीच्या रूपात साजरे केले जाते. या दिवशी रात्री बारा वाजता जन्माष्टमी जन्मउत्सव साजरा केला जातो

💠व्रत-पूजन असे करावे

१.उपवासाच्या पहिल्या (आज)रात्री हलकेसे जेवण करावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे

२.उद्या सकाळी सूर्योदय पूर्वी स्नान करून नित्यकर्म ,देवपूजा उरकून आपल्या दररोजच्या कामातून निवृत्त व्हावे.

३.देवघर किंवा भगवान श्रीकृष्णा च्या प्रतीमे समोर हातात २ पळी पाणी,अक्षता,फुल आणि गंध घेऊन खालील संकल्प करावा.. व म्हणल्या नंतर समोरच्या ताम्हणात पाणी सोडून द्यावे..

ममखिल पापप्रशमन पूर्वक सर्वाभीष्ट सिद्धये तथाच भगवान श्रीकृष्ण अखंड प्रीती,कृपा आशीर्वाद प्राप्त्यार्थे श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रतं अहं करिष्ये।।

५.ज्यांना शक्य आहे/इच्छा आहे त्यांनी सुतिकागृह तयार करून मूर्तीत बालक शिशु श्रीकृष्ण समवेत देवकी माता अशी मूर्ती किंवा फोटो स्थापन करावा तसेच पूजेत वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मी या सर्वांची मूर्ती ठेवून किंवा नावे क्रमाने लिहावित.

६.असे शक्य नसल्यास छोटासा सजवलेला पाळणा, षोडशोपचार पूजन साहित्य ,नैवेद्य इत्यादी तयारी करून ठेवावी.

७.नंतर रात्री १२ वाजेच्या अगोदर देवघरातील बाल कृष्णांची मूर्ती ला श्रीसुक्त, पुरुषसूक्त ने युक्त षोडशोपारे अभिषेक पूजन करून घ्यावे. (ज्यांना शक्य असेल त्यांनी संपूर्ण पूजन करावे ज्यात अंगपुजा, अर्घ्य प्रदान,नाम पूजा, चंद्र पूजा इ.असते.)

८.नंतर भगवान भगवान श्रीकृष्णांना पाळण्यात ठेवून सर्व प्रथम श्रीकृष्ण जन्म आख्यान,व्रत कथा वाचावी.यानंतर धूप,दीप दाखवून,सुंठवड्याचा,इतर पदार्थांचा नैवैद्य दाखवून आरती करावी.खालील मंत्राने पुष्पांजली अर्पण करावी.

‘प्रणमे देव जननी त्वया जातस्तु वामन:।वसुदेवात तथा कृष्णो नमस्तुभ्यं नमो नम:।
सुपुत्रार्घ्य प्रदत्तं में गृहाणेमं नमोऽस्तु ते।’

🔅यानंतर पाळणा गीत म्हणावे…

९.त्यानंतर भजन, कीर्तन,स्तोत्र वाचन करून शक्य तितका वेळ रात्री जागरन करावे.

संकलन आभार :श्रीधरजी कुलकर्णी
[05/09, 9:08 pm] +91 88068 77702: || श्री स्वामी समर्थ || || जय श्री कृष्ण||

🌷शास्रार्थसणउत्सव🌷

प्रश्न :यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे ? उपवास कधी करावा? जन्मोत्सव पूजन कधी करावे?

🔅या वर्षी श्रावण कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी ६ सप्टेंबर बुधवारी दुपारी ०३ वाजून ३७ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी ७ सप्टेंबर रोजी साय ०७.१५ पर्यंत राहील.

🔅त्यामुळे श्रीकृष्ण जन्मष्टमी चा उपवास,व्रत आणि पूजन हे सर्व बुधवारी करावे.

💠कारण बुधवारी होणाऱ्या चंन्द्रोदय समयी अष्टमी तिथि विद्यमान आहे आणि हे चंद्र वेळेतील उत्सव आहे. यावेळी रोहिणी नक्षत्र बुधवारी चंन्द्रोदय च्या वेळी स्थित असल्याने व यामुळे श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा योग तयार झाल्याने याचे फळ सर्वोत्तम म्हणले गेले आहे.

श्रावणे वा नभस्ये वा रोहिणी सहिताष्टमी । यदा कृष्णे नरैर्लब्धा सा जयन्ती प्रकीर्तिता ।।

तसेच यावेळी बुधवारी आलेल्या या जन्माष्टमी चा योगही सर्वोत्तम आहे.त्यामुळे हे व्रत बुधवारी करावे.

🔅तर गुरूवारी गोपाळकाला दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल..

🔅जे भाविक जन्माष्टमी चा उपवास करतात त्यांनी हा एकादशी सारखा उपवास बुधवारी करावा व गुरूवारी सोडावा..

🔅अनेक वैष्णव संप्रदयी भक्तगण गुरूवारी हे व्रत करणार आहेत.

🚩गोपाळ कृष्ण भगवान की जय🚩
[05/09, 9:11 pm] +91 88068 77702: 🍁यंदा श्रावण बुधवारी.. श्रीकृष्ण जन्माष्टमी

👉🏻काही महत्वाच्या बाबी…

🌷यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी आलेल्या रोहिणी नक्षत्र आणि बुधवार या संयोगाने मोहरात्री अर्थात ही अष्टमीची रात्र अनंत पटीने फलदायी ठरणार आहे.कारण भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म रोहिणी नक्षत्रावर झाला होता..

🦚जन्माष्टमी च्या दिवशी एकादशी सारखा उपवास केल्याने (केवळ फलाहार करावा) १००० एकादशी केल्याचे पुण्य प्राप्त होते..असे शास्रात वर्णन आहे.हा उपवास उद्या बुधवारी करावा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी उपवास सोडावा.

🦚या दिवशी दिवसभरात तसेच रात्री जागरण इत्यादी करून केलेला जप,सेवा,उपासना चे फळ अनंत पटीने प्राप्त होते…

🦚१८ पुराणांपैकी “श्री भविष्य पुराणात”- असा उल्लेख येतो की जो कोणी जन्माष्टमी चे व्रत करतो त्याना अकाली मृत्यू येत नाही…

🦚तसेच ज्या गर्भवती माता भगिनी भगवान कृष्णांच्या प्रीत्यर्थ असलेले हे व्रत करतात त्यांच्या गर्भस्थ शिशूला भगवान कृष्णा द्वारे सुखी तथा सुआरोग्यचा आशीर्वाद प्राप्त होतो (📍महत्वाची सूचना-आपली शारीरिक परिस्थिती- तब्बेत इ. लक्षात घेऊनच व्रत करावे, व्रत करता न आल्यास फक्त शक्य ती पूजन,सेवा उपासना करावी).

🦚ब्रह्मवैवर्त पुरानात असे वर्णन येते की जो कोणी श्रीकृष्ण जन्माष्टमी चे व्रत करतो,तो त्याच्या मागील शंभर जन्मतील पापापासून मुक्त होतो.

🌸🌸श्री कृष्णार्पनमस्तू🌸🌸
🦚🍁🍁शुभं भवतु..🍁🍁🦚

देव जन्माचे अभंग

देव जन्माचे अभंग

भजनी मलिक संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *