१९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – १९.

वसुदेवाचे शूर पुत्र बलराम-कृष्ण अस्रविद्या,वेदविद्या संपादन करुन मथुरेत आले त्यावेळी संपुर्ण मथुरानगरी त्यांच्या स्वागतार्थ सजली होती.जसे इंद्रोत्सवा च्या वेळी लोक अत्यानदांत असत तसेच वातावरण ही दोघे गुरुगृहातुन सहा महिन्यानंतर परत आल्यामुळे होते.त्यांना मथुरेच्या सिमेवरुन आणायला सुशोभित शुभ्र अश्व जोडलेल्या रथात बसवुन वाड्यासमोर आल्यावर सुवासिनींनी त्यांचे औक्षण करुन स्वागत केले.
राम-कृष्णाचे दिवस मथुरेत आनंदा त जात होते.श्रीकृष्ण धनुर्विद्यत व बलराम मल्लविद्येत सर्वांना शिकवुन तयार करीत होते.कृष्णाचा चुलत भाऊ अतिशय बुध्दीमान व बोलण्यात पटाईत असलेल्या उध्दवशी विशेष मैत्री झाली होती.श्रीकृष्णाचे गोकुळ,वृंदावनातील अद्भुत,अद्वितीय पराक्रमाच्या वार्ता ऐकुन कृष्णावर त्याची भक्ती जडली होती. कित्येकदा दोघेच यमुनातीरी फिरायला जात,आपापल्या मनीचे हितगुज सांगत. कृष्णाच्या सततच्या निकट सहवासाने हा परमात्मा,विष्णुचा अवतार आहे याची खात्री पटली.उध्दव कृष्णाचा अत्यंत विश्वासु मित्र व परमभक्त बनला.


एक दिवस श्रीकृष्ण म्हणाला, उध्दवा!मी जरी इथे देहाने असलो तरी, माझे सारे चित्त वृंदावनी आहे.मित्रा! माझ्या वियोगाने गोपी अगदी होरपळुन गेल्या असतील.मित्रा!मी त्यांना स्वतःच्या प्राणापेक्षाही प्रिय आहे.मी लवकर परत येईन या आशातंतुवर कशाबशा टिकुन असतील.ज्यांनी माझ्यासाठी लोकधर्म सोडला,त्यांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे,तरी ऊध्दवा! इथली सर्व कामे टाकुन सत्वर वृंदावनी जाऊन माझ्यावती ने सर्वांचे समाधान कर!श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे दुसर्‍याच दिवशी रथ घेऊन रथ घेऊन वृंदावनी रवाना झाला. सायंकाळी तो नंदाची चौकशी करीत त्याच्या वाड्यासमोर पोहोचला.रथाचा आवाज ऐकुन नंद बाहेर आल्याबरोबर ऊध्दव उतरुन,मी कृष्णाचा परम मित्र व चुलत भाऊ उध्दव असा परिचय देत, श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार तुम्हाला भेटायला

आलो.असे म्हटल्याबरोबर,जणुं आपला पुत्र कृष्णच आहे असे वाटुन नंदाने त्याला कडकडुन अलिंगन दिले. त्याचे यथोचित स्वागत करुन मृदुशय्येवर बसवुन कुशलक्षेम विचारले.नंतर दोघांची जेवणे ऊरकल्यावर त्यांचे बोलणे सुरु झाले.ऊध्दवाने मथुरेची, त्यांच्या शिक्षणा ची सर्व माहिती कथन केली.आर्तपणे विकल स्वरांत नंदाने विचारले,ऊध्दवा! कृष्णाला यशोदेची,माझी,त्याच्या जिवलग गोपमित्रांची,गोपींची,राधेची, त्याच्यावाचुन कावर्‍या बावर्‍या झालेल्या गाईंची आठवण येते का रे? अरे! त्याला इथे सर्वांना भेटावेसे नाही वाटत का रे? अरे!तो इथे असतांना त्याची योग्यता कळली नव्हती.अरे!कृष्णाचै मोठाले परा क्रम,मधुर हास्य,मृदुभाषण,सर्वात म्हणजे भान हरपणारे त्याच्या बासरीच्या सूरांची सय आली की,आम्ही अस्वस्थ होतो,मने भरुन येतात.एकदा तरी त्याला इथे यायला सांग की रे!


गर्गाचार्यांनी वर्तवलेले भविष्य अक्षरशः खरे ठरले.देवकार्य साधण्या साठी विष्णुचा अंश या मर्त्यलोकी अवतर ले.अरे ऊध्दवा!दहा हजार हत्तीचे बळ असलेला कंस,चाणूर,मुष्टीक केवढे असा मान्य मल्ल,इंद्राच्या ऐरावतालाही मागे सारेल असा कुवल्ल्यापीठ हत्ती या सर्वां चा त्याने एका क्षणांत वध केला.अरे एवढे अवजड धनुष्य ऊस मोडावा तसे सहज तुकडे केले.हाताच्या एका करंगळी वर गोवर्धन महापर्वत उचलुन धरला.अरे त्याच्या किती म्हणुन लिला सांगु?यशोदा सुध्दा तिथे येऊन बसलेली असल्यामुळे आपल्या मुलाचे चरित्र कौतुक ऐकुन दुःखवियोगाने हुंदके अनावर झाले,अश्रु थांबेनात.भगवान कृष्णावरचे त्यांचे अगाध प्रेम पाहुन ऊध्दवालाही गहिवर दाटुन आला.


ऊध्दव त्यांचे सांत्वन करीत म्हणाला,अशा अनंतशक्ती,सर्वान्तर्यामी देवाचे मातापिता म्हणवुन घेण्याचा अधि कार तुम्हाला प्राप्त झाला,यापेक्षा अधिक काय साधायचेय?त्या सर्वेश्वर परमेश्वराल तुमची तळमळ कळत नसेल का?त्यामुळे च तर त्याच्यावतीने मला इथे पाठवले ना लवकरच तो तुमचे वियोग,दुःख दूर करेल जगातील प्रत्येक प्राण्यांचा तो आत्मा आहे.चिंता नका करु!बोलता बोलता पहाट झाली.गोपींना पाणी आणण्या साठी नंदाच्या घरावरुनच नदीवर जावे लागत असल्यामुळे त्यांना नंदाच्या वाड्या समोर रथ पाहिल्यावर त्या मनी चरकल्या हा मथुरेचा रथ पुन्हा इथे कशाला?अक्रुर आला तेव्हा त्याने श्रीकृष्णाला हिरावुन घेऊन गेला.आतां परत काय असेल?
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *