तिर्थ प्रसाद कसा ग्रहण करावा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

*तिर्थ प्रसाद* 🌹

तिर्थ घेताना
*”अकाल मृत्यू हरणं सर्व व्याधी विनाशानं। दत्तपदोदकं तीर्थं जठरे धारयाम्याहं ।।”*

 हा मंत्र म्हणून तिर्थ घ्यावे. तिर्थ घेताना

*’प्रथमं कायाशूध्यर्थ । द्वितीयं धर्मासाधनं त्रितीयम मोक्षमपनुयात’*

 असे म्हणून ३ वेळा तिर्थ प्रश्न करतात. वरील विधी निषेधाचा अंगीकार करून गुरुतीर्थ ग्रहण केल्यास शरीर शुद्धी, धर्मसाधन व मोक्षप्राप्ती होते. तिर्थ घेताना उजव्या हाताची गोकर्ण मुद्रा (अंगठ्याजवळचे बोट वाकवून गायीच्या कानासारखी मुद्रा करावी.) करून त्यामध्ये तिर्थ घ्यावे. देवाचे तिर्थ अग्नितीर्थ (तळ हाताच्या खोलगट भागात घेऊन) ते आत्मतीर्थाने आवाज न करता प्राशन करावे.

तिर्थ म्हणून घेतले जाणारे उदक किंवा पंचामृत अत्यल्पच (उडीदाचे डाळी येव्हढे) असावे कारण तिर्थाचे रूपांतर लाळेत व्हावे. मलामध्ये होऊ नये असा शास्त्रसंकेत आहे. सामान्यतः देवपूजा केल्यानंतर दोनदा व उपवासदीका मूळे अन्न ग्रहण होणार नसेल तर तीनदा तिर्थ घ्यावे. मंदिरात गेल्यावर एकदाच तिर्थ घ्यावे. शुद्धोदकाने तिर्थ ग्रहण केल्यावर हातावरील तिर्थलेशाचा मस्तकास स्पर्श केल्यास देवगौरव साधला जातो.  देवपूजा केल्यानंतर तिर्थ एखाद्या झारीत ठेवावे व ते परगावी जाताना, महत्वाच्या कामास जाताना, दिवसभरात कुटुंबियांकडून परपीडा, परनिंदा, पैशून्यदी पाप घडल्यास देव दर्शन घेऊन तिर्थ घ्यावे.

काही ग्रंथांतून तिर्थ हे पात्रातून घ्यावे असे लिहिले आहे. तिर्थ घेताना उजव्या हातात तिर्थ व डाव्या हातात तिर्थ भरलेले पात्र असू नये. त्याने तिर्थ भरलेले पात्र उछिष्ठ होते. अपवाद- झाकणी झाकलेली झारी.

तिर्थ प्रसाद शक्यतो पुरोहित किंवा जेष्ठ व्यक्तीकडून घ्यावा. अपवाद- आपण स्वतः पूजा केल्यास, सोवळ्यात असल्यास व दुसरे कोणी उपस्थित नसल्यास इ. तिर्थ प्रसाद खाली बसून घ्यावा. आपण बसलेल्या आसनावर (पूजा करताना) बसून तिर्थ प्रसाद ग्रहण करू नये. पूजा समाप्त झाल्यावरच तिर्थ प्रसाद ग्रहण करावा. देवाच्या गाभाऱ्यात तिर्थ घेऊ नये. तिर्थ घेताना ते जमिनीवर सांडू नये. तिर्थ प्रसाद ओलांडून जाऊ नये.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *