अपेक्षांचा अंत कधीच पूर्ण होत नाही

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

दुपारी दुकान बंद करुन घरी जेवायला चाललो होतो… तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला… त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते… मला आश्चर्य वाटले… मी त्या लिस्टमधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे त्याच पिशवीत ठेवले… कुत्रा ती पिशवी तोंडात घेऊन निघाला… मी तो कुत्रा कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याच्यामागे निघालो… कुत्रा बसस्टाॅपवर येऊन एका बसमध्ये चढला… मी देखील त्याच्यामागे बसमध्ये चढलो… पिशवीवर स्टाॅपचे नाव लिहिले होते… कंडन्टरने पिवशीमधील पैसे घेऊन, एक तिकीट त्याच्या पिशवीत ठेवले… स्टाॅप आल्यावर कुत्रा बरोबर त्याच स्टाॅपला उतरला,,, मी ही त्याच्यामागे उतरलो…

थोडे पुढे चालून गेल्यावर कुत्रा एका घराजवळ थांबला आणि त्याने त्या घराची बेल वाजवली… एका माणसाने दार उघडले… त्याच्या हातात काठी होती… त्या माणसाने सामान घेऊन, त्या कुत्र्याला काठीने खूप मारले… मी त्या माणसाला माझी ओळख सांगून, कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले… तो माणूस म्हणाला, साल्याने माझी झोपमोड केली… चावी घेऊन गेला असता, तर माझी झोपमोड झाली नसती… जीवनाची ही खरी सच्चाई आहे… लोकांच्या अपेक्षांचा अंत कधीच पूर्ण होत नाही… जिथे तुम्ही थोडे चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचे थांबवले की, तुम्ही मागे केलेली मदत ते विसरून, तेच लोक तुमची निंदा चालू करतात… त्याकरिता तुम्ही तुमचे कर्म करत चला… कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू नका… कारण कोणीच तुमच्याकडून कायमस्वरुपी संतुष्ट होणार नाही… अर्थात जीवनात तुम्ही कितीही चांगले काम करा, लोक तुमच्या एका चुकीची वाट पाहत असतात हे मात्र तितकेच खरे!…

बाळासाहेब हांडे संग्रहित सर्व साहित्य पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *