नृसिंह जन्माचे अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नृसिंह जन्माचे अभंग
१ पहा रे हें दैवत कैसे
२ आम्हासाठी अवतार
३ हाकेसरिसी उडी । घालूनिया
४ क्रोधयुक्त पिता पुसे प्रल्हादासी
५ दुर्जन तो लाथ मारी खांबावरी
६ मानव शरीर सिंह वदन हरि

नृसिंह जन्माचे अभंग प्रारंभ

पहा रे हें दैवत कैसे
पहा रे हें दैवत कैसे ॥ भक्तिपिसें भाविका ॥१॥
पाचारील्या सरिसें पावे ॥ ऐसे सेवे बराडी ॥२॥
शुष्काकाष्टी गुरगुरी ॥ लाज हरि न धरितां ॥३॥
तुका ह्मणे अर्धनारी ऐसी धरी रुपडी हा ॥४॥

आम्हासाठी अवतार
आम्हासाठी अवतार । मत्स्यकुर्मादि सूकर ॥१॥
मोहे धाव घाली पान्हा । नाम घेता पंढरिराणा ॥धृ ॥
कोठे न दिसे पाहता । उडी घाली अवचिता ॥३॥
सुख ठेवी आम्हासाठी । दु:ख आपणची घोंटी ॥४॥
आम्हा घाली पाठीकडे । आपण कळीकाळासी भिडे ॥५॥
तुका म्हणे कृपानिधी । आम्हा उतरी नावेमधी ॥६॥

हाकेसरिसी उडी । घालूनिया
हाकेसरिसी उडी । घालूनिया स्तंभ फोडी ॥ १ ॥
ऐसी कृपावंत कोण । माझ्या विठाईवाचून ॥२॥
करितां आठव । धावोनिया घाली कव ॥३॥
तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥४॥

क्रोधयुक्त पिता पुसे प्रल्हादासी
क्रोधयुक्त पिता पुसे प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठे आहे ॥१॥
येरु म्हणे जळी स्थळी काष्ठी भरला । व्यापुनी राहिला दिशाद्रुम ॥२॥
एका जनार्दनीं ऐकतांचि मात । मारितसे लाथ स्तंभावरी ॥३॥

दुर्जन तो लाथ मारी खांबावरी
दुर्जन तो लाथ मारी खांबावरी । स्तंभी नरहरी प्रगटला ॥१॥
धांवूनियां हरि आडवा तो घेतिला । हृदयीं विदारिला हस्तनखीं ॥२॥
एका जनार्दनीं भक्ताचे रक्षण । स्वयें नारायण करितसे ॥३॥

मानव शरीर सिंह वदन हरि
मानव शरीर सिंह वदन हरि । गुरगुर तो करी देवराव ॥१॥
अवतार वेळां वैशाख मासीं । चतुर्दश संधीसी अर्ध बिंबी ॥२॥
घरीं ना मंदिरीं सभे ना बाहेरीं । उंबरीयावरी मारियेला ॥ ३॥
शस्त्राने न मरे ऐसा वर होता । म्हणोनि नखें त्याचा अंत केला ॥४॥
वर राखोनियां वध केला पाही । दासाची नवाई वाढवित ॥५॥
राज्यीं बैसविला प्रल्हाद निजभक्त । केली जगीं ख्यात नामा म्हणे ॥ ६ ॥

नृसिंह जन्माचे अभंग समाप्त

देव जन्माचे अभंग

भजनी मलिक संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *