शाप म्हणजे काय व सत्य काय?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

शाप म्हणजे काय?*

शाप ही अभद्र वाणी किंवा अपशब्द आहे.

एखाद्या व्यक्तीची जेव्हा पिळवणूक होते ,त्याला दिल्या जाणा-या त्रासाचा कहर, अतिरेक , कळस होतो अशा वेळी ती त्रस्त व्यक्ती अभद्र वाणी उच्चरते.

यात दोन घटक आहेत. एक त्रास देणारा तर दुसरा त्रास सहन करणारा.
त्रास देणा-याचा हेतू जर एखाद्याला आयुष्यातून पार नेस्तनाबूत करायचा असेल, तर अशा वेळी त्रास सहन करणारी व्यक्ती अभद्र वाणी उच्चारते.

अभद्र वाणी चा उच्चार हा शारिरीक व मानसिक अशा दोन स्तरांवर केला जाऊ शकतो.
शूद्र व्यक्तीच्या बाबत हा बहुदा शारिरीक पातळीवर असतो.
वैश्य व क्षत्रीयाच्या बाबतीत हा दोन्ही, शारिरीक/मानसिक पातळीवर तर ब्राम्हणाचा अंतर्मनातून असतो.

शापाच्या प्रक्रियेत, त्रास देणारा , त्रास सहन न होऊन अभद्रवाणी उच्चारणार व त्रास देण्यामागील मुख्य हेतू हे तीन महत्वाचे घटक असतात.

त्रस्त व्यक्तीने हातात पाणी घेऊन, ते त्रास देणा-या व्यक्तीच्या अंगावर टाकून, जी अभद्रवाणी निघते तिला शाप म्हणतात.
शाप देणा-याने तो जिवंत असेपर्यंत ऊ:शाप दिला तर ठिक.
नाही तर तो शाप , शाप घेणा-याच्या पुढच्या अनेक पिढ्यांना बाधतो.
**ह्यावर फक्त गुरूच मार्ग दाखवू शकतो.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *