संत व त्यांची एकूण अभंग रचना

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत व त्यांची अभंग रचना 
    महाराष्ट्र व देशातील वारकरी सांप्रदायातील संत व त्यांच्या रचित अभंगाची संख्या जी आमच्या कडे उपलब्ध आहे ती येथे देत आहोत.  ही माहिती गीता प्रेस मार्फत प्रकाशित सकल संतवाणी -गाथा भाग १ व २  यास अनुसरून आहेत. कांहीं संत व अभंगाची संख्याही कमी जास्त असण्याची शक्यता आहे. ( पोस्ट टाकण्याचा आमचा उद्देश शेवटी लिहीला आहे)


१) संत ज्ञानेश्वर माऊली –  ९०१
२) संत एकनाथ महाराज – ४००८
३) संत भानुदास महाराज –      ९४
४) संत जनार्दन स्वामी –         ३२
५)  संत तुकाराम महाराज   – ४०९२
६) संत कान्होबा राय         –      ५०
७) संत बहिणाबाई             –   ३२
८)  संत निळोबाराय            –  १५७०
९) संत निवृत्तीनाथ महाराज-   ३५७
१०) संत सोपानदेव                  ४९
११) संत मुक्ताई महाराज         ४२ 
१२) संत चांगदेव महाराज       ४६
१३) संत कबीर                      ३०२
१४) संत कमाल                      ५६
१५) संत सुरदास                   ११०
१६) संत नरसी मेहता              ३०
१७)संत सजनकसाई महाराज    ९
१८) संत लतीफ शहा महाराज      १
१९) संत दादु पिंजारी महाराज       ३
२०) संत मीराबाई  महाराज      १५६
२१ ) संत शेख महंमद महाराज      १८
२२) संत कान्होपात्रा महाराज       २३
२३) संत गोरा कुंभार महाराज       २०
२४) संत जगमित्र नागा महाराज     ८
२५) संत नरहरी महाराज             ३४
२६) संत सावता महाराज            १२
२८) संत सेना महाराज              १४३
२९) संत माणकोजी बोधला म.   ११०
३०) संत चोखामेळा महाराज      ३४९
३१) संत वंका महाराज               ३९
३२) संत सोयराबाई महाराज       ६२
३३) संत निर्मळाबाई महाराज       २४
३४) संत कर्ममेळा महाराज          २७
३६) संत कान्होपाठक   महाराज     ६
३७) संत परीसा भागवत महाराज     ३
३८) संत सच्चिदानंद बाबा              २
३९) संत चांगा केशवदासमहाराज    १
४०) बहीरापिसा महाराज                २
४१) संत भागुबाई महाराज             ७
                               ——————–
                               एकुण – १२८३०

   बारा हजार आठशे तीस.
आणि इतरही अनेक संत व त्यांचे अभंग वारकरी सांप्रदायात उपलब्ध आहेत,  तरीही किर्तनकार मंडळींना इतर खरकटं सिनेमातील गाणी, भावगीते, आराध्यांचे गाणे, पोतराजांचे गाणे, आईचे गाणे, बापाचे गाणे, पोवाडे, कव्वाली, शेर शायरी किर्तनात प्रमाण म्हणुन घ्यायची कां गरज पडते.?


           आमचं सांप्रदायिक भांडवल भरपुर आहे. मग लोकांचे अपवित्र कोणी काय म्हणून घ्याव ? कोणीही घेऊच नये. व्यासपीठावर, नारदाच्या गादीवर म्हणुच नये.
       आम्ही आमच्या सांप्रदायिक संत व शास्त्राचा , परंपरेचा मान ठेवणार नाहीत तर दुसरे लोक आपच्या परंपरेचा मान ठेवतील काय? 


         कोणाला वाईट वाटण्याची शक्यता आहे पण नाईलाज म्हणुन पोस्ट करीत आहे. थोडासा विचार करावा. नाही आवडले तर सोडून द्यावं.
जय हरि..
चूक असल्यास जरूर कळवावे. 

धनंजय महाराज मोरे

9422938199

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇