कपाळी गंध कशासाठी, कुठे, का, फळ काय ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

कपाळी गंध कशासाठी लावायचे ?* ते नेमके कुठे लावावे ?

कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळू-हळू कमी होत चालली आहे. गंध लावून बाहेर जाण्यास आजच्या काळी कमीपणा वाटतो. वास्तविक कपाळी गंध लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे गंधाद्वारे बुद्धीचे आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची पूजा करण्याचाही हेतू आहे म्हणूनच ईशपूजनानंतर पूजकाने आपल्या कपाळी गंध लावण्याची प्रथा पडली. गंध म्हणजे केवळ कपाळाची शोभा नव्हे, तर बुद्धीचेही पूजन आहे. ईश्वर हे साध्य, तर बुद्धी हे साधन असल्याने बुद्धीची पूजा करणे आवश्यकच आहे.


गंध हे मांगल्याचेही प्रतीक आहे. कपाळी गंध लावलेला माणूस आणि गंध न लावलेला माणूस यातला फरक लगेच लक्षात येतो. गंधामुळे माणूस शुचिर्भूत बनतो. त्याच्या चेहऱ्यावर मांगल्याचे भाव दिसू लागतात. आकाशाने देखील यासाठीच सूर्य-चंद्ररूपी दोन तिलक दिवसा व रात्री धारण केले आहे. मात्र हे गंध दोन्ही भुवयांच्या मध्ये (आज्ञाचक्रात) कधीही लावू नये. ते त्या वरील भागात लावावे. कारण आज्ञाचक्राच्या ठिकाणी
असलेला सुप्तावस्थेतील तृतीय नेत्र बंद होता कामा नये.

नित्य गंध लावणारा मरणोत्तर वैकुंठलोकी जातो असे धर्मशास्त्र सांगते. गंध लावण्याचा अधिकार प्रत्येक वर्णातील पुरुषाला आहे; श्रीकृष्णाचे उपासक उभे गंध लावतात, तर शिव उपासक आडवे गंध लावतात. गंध चंदनाचे, केशराचे, रक्तचंदनाचे व गोपीचंदनाचे जसे आवडेल तसे लावावे. बाहेर जातांना गंध लावून जाण्याची लाज वाटत असेल, तर निदान देवपूजेनंतर तरी कपाळी गंध आवर्जून लावावे.

s🕉️ स्नान झाल्यावर कपाळावर टिळा, गंध कां लावतात ? 🕉️

आपला देह म्हणजे ईश्वराचे मंदिर आहे. मंदिरात जो सर्वत्र ईश्वरी भाव असतो तसाच देहात रोमा-रोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते. हे ईश्वरी तत्त्व विशेष करून मर्म स्थानात प्रचितीस येते. भ्रुकुटीचे मध्यभागी आज्ञाचक्रावर सगुण परमेश्वर वास करतो. देहाला मायेची उपाधी असेपर्यंत सगुण परमेश्वराचीच पूजा करणे प्रशस्त असते.

म्हणूनच स्नान झाल्यावर कपाळाचे मध्यभागी असणाऱ्या
परमेश्वराच्या मूर्तीस टिळा लावावा. म्हणजे ही सुद्धा एक छोटी देवपूजा असते. ज्यांना कामाचा भरपूर व्याप असून
श्वास घ्यायलादेखील फुरसत मिळत नाही अशा माणसांनी
स्नान झाल्यावर किमान कपाळी टिळा तरी लावावा. त्या निमित्ताने भगवंताची पूजा होते.

टिळा लावतांना मधल्या बोटाने लावावा, मधल्या बोटाचा संबंध हृदयाशी असल्यामुळे या बोटातून प्रवाहित होणारी स्पंदने हृदया- पर्यंत जाऊन भिडतात. जप करतांना सुद्धा मधले बोट वापरतात. त्यामुळे दिवसभर मन शांत व भक्तिभावाने राहते. टिळा लावल्यामुळे मनुष्य सहसा पाप कर्माकडे वळत नाही. कारण जो टिळा लावतो तो देवाला
मानतो. समाज देखील त्याच्या कडे सन्मानाने बघत असतो. हिंदू
धर्माखेरीज इतर कोणत्याही धर्माचे लोक टिळा लावत
नाहीत. या बाबतीत कठोपनिषदात असे सांगितले आहे, की हृदयातून निघणाऱ्या शंभर प्रमुख नाड्यांपैकी सुषुम्ना ही नाडी मस्तकाच्या समोरील भागातून निघते. यातूनच
मोक्ष मार्ग निघतो, जो ऊर्ध्व दिशेने जातो. माणसाचा मृत्यू झाल्यावर जीवात्मा या मार्गाने गमन करता झाला तर त्याला त्वरीत गती मिळते. म्हणूनच कपाळी तिलक धारण करतात.

🕉️ चंदनाच्या टिळ्याला महत्त्व कां आहे? 🕉️

कारण नाकातून वाहणाऱ्या दोन नाड्यांपैकी एक धन व दुसरी ऋण असते. धन नाडीतून श्वास वाहतांना निर्माण होणारी उष्णता रोखण्यासाठी चंदन तिलक महत्वाची कामगिरी बजावतो. कपाळावर टिळा लावतांना औषधीचंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन, बुक्का इत्यादींचा शुद्ध टिळा लावावा.

🕉️ *टिळा लावणे* 🕉️
टिळा लावल्याने समाजामध्ये मान-सन्मानाने पाहतात. आर्य धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा लावणे ही प्रथा आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो.
उदा. हळदी, कुंकू, केशर, भस्म आणि चंदन हे प्रमुख आहेत.

🕉️ पण टिळा लावण्यामागे काय भावना असते ? 🕉️

पुराणामध्ये असे लिहिलेले आहे, की संगमाच्या किनाऱ्यावर ‘गंगा- स्नान’ केल्यानंतर साधू/पंडितां- द्वारे टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते. कपाळावर टिळा लावण्या मागे आध्यात्मिक महत्व आहे. आपल्या शरीरात सात सूक्ष्म ऊर्जा केंद्र आहेत जे अपार शक्तीचे भांडार आहेत. त्यांना ‘चक्र’ असे म्हणतात.

कपाळाच्यामध्ये जिथे आपण टिळा लावतो, तिथे आज्ञाचक्र असते. हे चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वपूर्ण स्थान आहे.

🕉️ नाड्यांचा त्रिवेणी संगम 🕉️

इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन नाड्या आहेत.
१) इडा, २) पिंगला आणि ३) सुष्मना येऊन मिळतात म्हणून याला ‘त्रिवेणी’ किंवा संगम’ पण म्हणतात. हे गुरु स्थान आहे. इथूनच पूर्ण शरीराचे संचालन होते. हे आपल्या चेतनांचे मुख्य स्थान पण आहे. याला मनाचे घर पण म्हणतात. यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त पूजनीय आहे. योगामध्ये ध्यान करता वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते. टिळा लावल्याने स्वभावात चांगले बदल घडून येतात व पाहणाऱ्यांचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो.

🕉️ टिळा काही खास प्रयोजनासाठी पण लावतात 🕉️

१) जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्या ने,
२) शत्रूचा नाश करायचा असेल तर तर्जनी ने,
३) धनप्राप्ती हेतू मध्यमा ने आणि
४) शांती प्राप्तीसाठी अनामिका ने टिळा लावला जातो.

साधारणत: टिळा अनामिके द्वारेच लावला जातो आणि
त्याच्यात पण चंदनाचा लावला जातो.
तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते, थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त लपलेले असते. म्हणून टिळा जरूर लावावा. आर्य प्रथे प्रमाणे टिळा न लावणे अशुभ आहे. टिळा आर्य संस्कृतीची ओळख आहे.

टिळा लावण्यामागे फक्त धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक कारण सुद्धा आहे.

🕉️ कपाळावर टिळा लावण्याचं महत्व 🕉️

हिंदू धर्मात पूजा करतांना टिळा लावण्याची प्रथा आहे. पूजाच कशाला इतर मंगल कार्याची सुरूवातही गंध लावूनच करण्यात येते. गंध लावल्याशिवाय कोणतेही मंगल कार्य सुरू होत नाही. कपाळावर टिळा नसणे हे अशुभ मानले जाते. पूजेच्या वेळी कुंकुम टिळा किंवा चंदनाचा टिळा लावतात. हा टिळा कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्या मधोमध
लावण्याची प्रथा आहे. अनामिकेच्या खालचा भाग हस्त
ज्योतिषानुसार सूर्यक्षेत्र मानले गेले आहे. कपाळावर आज्ञा चक्राचे स्थान आहे. सूर्याच्या बोटाने टिळा लावल्याने मुखमंडल सूर्याप्रमाणे तेजस्वी बनू लागते.
तसेच आज्ञाचक्रही जागृत व्हायला मदत होते. यामुळे मनाची एकाग्रता वाढायला मदत होते. टिळा लावणारा यशस्वी आणि ओजस्वी बनतो.

🕉️ कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्यदायी महत्त्व 🕉️

पूजा विधींमध्ये कपाळावर टिळा लावण्याची प्रथा आहे. भारतात नियमित देवपूजेमध्ये देखील चंदनाचा वापर केला जातो. परंतू आपल्या प्राचीन संस्कृतींना देखील विज्ञानाचा आधार आहे. मग जाणून घ्या चंदनाच्या टिळा
लावण्यामागील आरोग्यदायी कारण.


📚 *वैज्ञानिक आधार* 📚

कपाळावर दोन भुवयांमध्ये ‘अग्न’ चक्राचे स्थान असते. या स्थानालाच ‘तिसरा डोळा’ असेही म्हणतात. हे एक ऊर्जा स्थान असल्याने अध्यात्मात या स्थानाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा आरोग्यदायी देखील ठरते.

🕉️ चंदनाच्या टिळ्याचे पाच फायदे🕉️

१) एकाग्रता सुधारते.
आध्यात्मिक गुरू श्री. श्री रवी शंकर यांच्या मते, तिसरा डोळा हा शरीरात एकाग्रता वाढवण्याचे केंद्रस्थान आहे. चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता
मिळवण्यास मदत करते.

२) डोकेदुखीपासून आराम मिळतो.

चायनिज अ‍ॅक्युप्रेशरनुसार दोन्ही भुवयांमधील जागा ही शरीरातील नसा एकत्र मिळण्याची जागा समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखी पासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच या ठिकाणी चंदनाचा टिळा लावल्यास नसांमध्ये थंडावा निर्माण झाल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून त्वरीत आराम मिळण्यास मदत होते.

३) सकारात्मक बनवते.

तिसर्‍या डोळ्याचे स्थान हे अंतर्मन आणि विचारांचे
केंद्रस्थान आहे. नकारात्मक विचारातून शरीरात येणारी नकारात्मक भावना या चक्राच्या माध्यमातून आत येते. मात्र चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश येते.

४) निद्रानाश आणि ताण-तणावापासून आराम.

अतिथकवा, मानसिक ताण किंवा अतिउत्साही मनामुळे देखील निद्रानाश होण्याची शक्यता असते. आयुर्वेदानुसार कपाळावरील या स्थानावर चंदनाने मसाज केल्यास ताण कमी होण्यास तसेच निद्रानाशाच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.

५) शरीरात थंडावा निर्माण होतो.

चंदना मध्ये मंद सुवासाप्रमाणेच शरीरात थंडावा निर्माण
करण्याची क्षमतादेखील आहे. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. सोबतीलाच नसांना देखील थंडावा मिळतो. भारता सारख्या उष्णकटिबंधीय क्षेत्रात कपाळावर चंदन लावणे तुमच्या साऱ्या शरीराला थंड करण्यास मदत करते.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *