१६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – १६.

शस्ररक्षकाने सांगीतलेली धनुर्भंगा ची विलक्षण हकीकत ऐकुन कंस एकदम सुन्न झाला.एवढे सैन्य असतांना या बाल वीराने सर्वांसमक्ष एवढ्या अवजड धनुष्याचे तुकडे करुन निघुन गेला. ज्याच्या भयाने चुलत कां होईना,भगिनी च्या सात पुत्रांचा घात करुन निंद्य व भयंकर कृत्य केले,तोच अद्याप जीवंत आहे म्हणजे नारदाची भविष्यवाणी खरी ठरते की काय? थोडे मन स्वस्थ झाल्या वर मंचरचना पाहण्यासाठी प्रेक्षागाराकडे गेला.


दुसरा दिवस उजाडला.सकाळ पासुनच नटुन थटुन लोकांच्या झुंडी प्रेक्षा गाराकडे जाऊं लागल्या.थोड्याच वेळात विस्तिर्ण मंडप प्रेक्षकांनी भरुन गेला. मोठेछोटे सरदार आपपाल्या जागेवर बसले.भरजरी जाळीचे रत्नखचित पडदे सोडलेल्या दालनात अंतःपुरातील स्रीया बसल्या.पुर्वाभिमुख दरवाज्यावर निवडक सैन्य तैनात असुन कुवल्ल्यापीड हत्तीही झुलत होता.श्रृंगारलेले घोडे सारखे खिंकाळत होते.अश्याप्रकारे पुर्ण तयारी झाल्यावर बारा वाजतां कंसाची स्वारी पूर्व दरवाज्यातुन मंडपात शिरल्याबरोबर सर्व प्रेक्षक उठुन उभे राहिलेत.दारापासुन मंचकापर्यंत अंथरलेल्या उंची गालीच्या वरुन झपझप चालत कंस सिंहासनारुढ होताच भालदार,चोपदारांच्या ललकार्‍यां नी विस्तिर्ण प्रेक्षागार दणाणुन गेला.तेव ढ्यात सेवकांनी पायघड्या चटकण उचलल्या.सगळीकडे शांतता व उत्सुकता शिगोशिग पसरली.


कंसाच्या इशार्‍यासरशी त्याचे मल्ल,कंसाला मुजरा करुन,त्यांच्यासाठी मुद्दाम असलेल्या राखीव जागेत येऊन बसले.शेवटी बलराम-कृष्ण आपल्या गोप मल्लांसह प्रफुल्लीत मुद्रेने तुतार्‍या च्या आवाजात दरवाज्यात आल्याबरोबर पुर्व संकेतानुसार कुवल्ल्यापीडाच्या माहुताने त्यांच्यावर हत्ती घातल्याबरोबर सार्‍या लोकांत एकच हाःहाकार उडाला. तो मदस्राव हत्ती अंगाभर चालुन येत असलेल्या पाहुन कंसाचा कुटील डाव श्रीकृष्णाच्या लक्षात आल्याबरोबर संतापाने त्याने हत्तीच्या सोंडेचा आधार घेऊन त्याच्या पोटाखाली शिरुन आपल्या व्रजमुष्ठींनी असे कांही प्रहार केले की,

तो प्रचंड हत्ती
वेदनेने व संतापाने कृष्ण कोठे आहे हे पाहत गरगर फिरुं लागला.हत्ती ची मस्ती जिरवण्यासाठी कृष्ण हत्ती समोर दंड थोपटुन उभा राहिलेल्या दिसल्याबरोबर तो चवताळलेला हत्ती कृष्णावर चालुन जाऊन दाताने भोकसण्याच्या इराद्याने जोर करुन गुडघे टेकवल्या बरोबर कृष्णाने त्याचे दात पकडुन काडकण मोडल्याने हत्तीचे तोंड रक्त बंबाळ झाले.कृष्णाने त्याच्याच दाताने हत्तीच्या मस्तकावर असा कांही प्रहार केला की,एवढा प्रचंड हत्ती मस्तक फुटल्याने घेरी येऊन धाडकण खाली पडला व तो अनंतात विलिन झाला.


अर्ध्या घटकेतच श्रीकृष्णाने एवढा प्रचंड हत्ती ठार केल्याचे पाहताच सर्व प्रेक्षक आश्चर्याने आवाक होऊन तोंडात बोटे घातली.मग श्रीकृष्ण बलराम गर्जना करीत दर्शनी दरवाजातुन आंत शिरले. त्यावेळी सिंहासनाधीन असलेल्या कंसाने कृष्ण हत्तीची झुंज पाहुन तो अतिशय भयभीत झाला.एवढा मदोन्मतत हत्ती बिनाशस्राने केवळ आपल्या बाहुने मारला.त्यापुढे चाणूर व मुष्टीक मल्ल कसा काय टिकुं शकेल? हत्तीशी झालेली श्रीकृष्णाची अद्भुत झुंज पाहुन प्रेक्षक कमालीचे आश्चर्यचकित होऊन हा साधा मानव नसुन कुणी देवच अवतीर्ण झाला असे वाटुन

प्रचंड जयघोषाने प्रेक्षागार दणाणुन गेले.कंसाला शत्रु,मल्लांना अशनी,यादवांना विष्णु,सामान्यांना सम्राट,स्रीयांना कामदेव आणि देवकीला बाळ अशा वेगवेगळ्या रुपात कृष्ण भासला.श्रीकृष्ण आत प्रवेशताच क्रुध्द कंसाने चाणूरास त्याच्याशी कुस्ती करण्याची आज्ञा केली.कंसाची आज्ञा होताच त्याचे मल्ल गुरुंना वंदन करुन हौदात उतरले. कसलेल्या प्रौढ मल्ला बरोबर हे दोन बालमल्ल कुस्तीस उभे राहिलेले पाहुन हा उघड उघड अन्याय आहे,नियमानुसार कुस्ती व्हावी असेच सर्वांना वाटत होते.


श्रीकृष्ण आणि चाणूरची निकरा ची झुंज हौदात सुरु झाली.त्याचवेळी दुसरीकडे बलराम व मुष्टीकरची आकसा ने कुस्ती सुरु होऊन एकमेकांर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत होते.कंसाने वाद्ये आणि कुजबुज बंद करायला सांगुन, श्वास रोखुन कुस्ती पाहुं लागला.शेवटी चाणूरचा जोर कमी झाल्यावर श्रीकृष्णाने उभ्या उभ्या त्याला वाकवुन गुडघ्याचा रेटा देऊन इतक्या जोराने मुष्टीप्रहार केला की, तो लगेच गतप्राण होऊन धाडकण खाली पडला.श्रीकृष्णाचे अचाट कृत्य पाहुन प्रेक्षागार जयजयकाराने दुमदुमुन गेला.कंसाने तोशल नावाच्या मल्लाला इशारा केला.तोशर-कृष्णाची निकराची झुंज सुरु झाली.तिकडे बलरामने मुष्टीका ला व श्रीकृष्णाने तोशरला ठार मारले. तीनही बलाढ्य मल्ल ठार झाल्याचे पाहुन सभास्थान शून्यवत झाले.जनानी पडद्यातुन देवकीचे आनंदाश्रु वाहु लागले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *