४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ४.

अश्या या ब्रम्हविद्येत श्रेष्ठ ब्रम्हवेत्ता मुनींकडुन आपल्या पुत्रांवर संस्कार करण्याची विनंती केल्यावर, ते म्हणाले, मी जर यांचेवर संस्कार केले तर  हाच तो वसुदेव देवकीनंदन आहे हे त्या दुष्ट कंसाला कळेल.मग नंदाने त्यांना गुप्तपणे संस्कार करण्याची विनंती केल्यावर एकांतात यशोदा व रोहीणी पुत्रांवर विधिपुर्वक संस्कार व नामकरण  केल्यावर ते नंदाच्या घरांत आले.यशोदा व रोहिणीनी गुरुदेवांची पुजा करुन दोन्ही मुलांच्या नांवाची उत्सुकतेने एकाग्रतेने प्रतिक्षा करुं लागल्या.हा रोहिणीपुत्र आपल्या सद्गुणांनी सर्वांना रमविणारा असेल म्हणुन ‘राम’ व बलशाली असल्या ने तो बलराम म्हणुन ओळखल्या जाईल. याच्यामुळेच यादवांत ऐक्य प्रस्थापित होणार असल्याने ‘संकर्षण’ असेही म्हणतील.

नंद-यशोदा! तुझा हा पुत्र  प्रत्येक युगांत अवतार धारण करणारा आहे,यापुर्वी याचे श्र्वेत,गौर,रम्य व पीत असे वर्ण होऊन गेलेत.सांप्रत हा कृष्ण वर्ण झाला म्हणुन याचे नांव कृष्ण ! हा वसुदेवपुत्र असल्याने वासुदेव असेही म्हणतील.हा समयानुसार व कार्यानुसार अनेक नांवाने ओळखल्या जाईल.गोप गोपाळांना आनंद देईल.याच्या योगाने तुमच्यावरचे संकटे नष्ट होऊन तुमचे कल्याण करील.हा तुझा पुत्र साक्षात नारायण आहे.तू फक्त सावध व दक्ष राहुन याचे रक्षण कर,असे सांगुन गर्गमुनी मथुरेस निघुन गेले.

तुझ्या या पुत्राचे नीट रक्षन कर… नित्य दक्ष रहा हे गर्गमुनींचे, व मथुरेत कर भरायला गेले असतां वसुदेवानेही हेच सांगीतल्याने नंद नेहमी सावध असे.

एकदा कांही कामानिमित्य नंदाला मथुरेस जावे लागले.जातांना पुन्हा पुन्हा कृष्णाचा नीट सांभाळ कर,त्याचेवर व्यवस्थीत लक्ष ठेव म्हणुन बजावुन गेले. नंद गेले,इतर गोप आपल्या कामात व्यस्त,यशोदा स्वयंपाक घरांत गुंतलेली, कृष्ण अंगणांत मुठी चोखीत,हातपाय हलवित पडलेला,आंतुन यशोदा त्याच्याशी बोलत होती व तोही हुंकारे देत होता.तेवढ्यात बाहेर कुणाची तरी चाहुल लागल्याने यशोदेने आंंतुनच कोण ग? म्हणुन विचारल्यावर,”मी” असा मंजुळ पण अपरिचित आवाज आल्याने ती चटकण बाहेर आली.एक अत्यंत सुंदर, रेशमी वस्रालंकारांनी युक्त स्री कृष्णाला मांडीवर घेऊन आपली काळेभोर बुबुळे त्याच्यावर रोखुन बसलेली दिसली.कोण तुम्ही? गोकुळ सुंदर असल्याची किर्ती ऐकुन मुद्दाम पहायला आले.तुमचा हा सुंदर पुत्र पाहुन कोणालाही आई व्हावेसे वाटते असे म्हणुन तिने आपला स्तन कृष्णाच्या तोंडात दिला.

कृष्णही स्तन जोरात चोखुं लागला.यशोदा निश्चिंत होऊन स्वयंपाक घरांत गेली.इकडे कृष्ण तिचे स्तन चिमुकल्या हातात धरुन दुध ओढीतच होता.असह्य वेदनेने ती ओरडु  लागली,पण कृष्ण कांही केल्या तोंडात धरलेला स्तन सोडत नव्हता.लगबगीने यशोदा बाहेर येऊन पाहते तर, वेदनांनी ओरडणार्‍या स्रीचे डोळे गरगरा फिरत, हातपाय ताठ झाले तरी कृष्णाचे स्तन पान चालुच होते.हे दृष्य पाहुन यशोदाने केलेला आरडाओरडा ऐकुन आसपासचे स्री पुरुष गोळा झाले.ती सुंदर स्री आतां भयानक दिसुं लागली.ती निर्जिव,मृत होऊन पडली तरी कृष्ण तिच्या अंगावर खेळतच होता.

तेवढ्यात एका वृध्द गोपाने तिला ओळखले.अरेss ही तर कंसाची पुतना.. कृष्णाला मारण्याच्या उद्देशाने आलेली, या राक्षसांना कोणतेही रुप धारण करतां येते.गोपांनी तिचे प्रेत ओढत गहन अरण्यात श्वापदांच्या भक्षणांसाठी टाकुन दिले.आवेगाने यशोदेने कृष्णाला छातीशी कवटाळुन अश्रु ढाळूं लागली.केवढं अरिष्ट टळले!गोपींनी कृष्णाचा रक्षाविधि केल्यावर नेहमीप्रमाणे कृष्ण खेळु लागला.संध्याकाळी नंद मथुरेहुन आल्या वर हे वृत्त समजल्यावर तो कांहीसा चिंतित होऊन म्हणाला,यापुढे आपल्या ला अधिक सजग रहायला हवय!

बलराम कृष्ण वाढत होते.तीन महिन्याचा कृष्ण उपडा पडु लागला.गोपीं नी त्याची उपडी पडण्याचा उत्सव साजरा केला.त्यानिमित्य नंदाने गोपगोपींना मेजवाणी,ब्राम्हणांना दान दक्षिणा दिली. घरांत पंगती बसल्या असल्याने घरांत कृष्णाला झोपायला जागा नसल्यामुळे  बाहेर उभ्या असलेल्या गाड्याखाली सावलीत त्याला झोपवले.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *