नीती भारुड -नीती सांगतो ऐका एक । दास… वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नीती भारुड प्रारंभ

नीती सांगतो ऐका एक । दास सभेचा सेवक ।
मन टाळू नका एक । कोणी एक ॥१॥

सांडावरुन जाऊं नये । लांच खाऊं नये ।
चोहट्यात राहू नेये । कोणी एक ॥२॥

अक्रीत घेऊं नये । इमान सोडु नये ।
बैमान होऊं नये । कोणी एक ॥३॥

सज्जनाशी विंटू नये । नीचासवे बांटू नये ।
तस्कराशी पुसूं नये । कोणी एक ॥४॥

भक्‍तिमार्ग खंडू नये । कुभांडयासी तंडूं नये ।
खळासंगे भांडू नये । कोणी एक ॥५॥

सत्पुरुषाशी छळूं नये । शिवेचा गुंडा डाळूं नये ।
केला नेम टाळू नये । कोणी एक ॥६॥

सद्‍गुरु सेवा सोडूं नये । कुळ धर्मासी मोडू नये ।
पापद्रव्य जोडू नये । कोणी एक ॥७॥

संपत्‍ति आलिया माजू नये । अभिमाने फुगूं नये ।
सभा देखून लाजूं नये । कोणी एक ॥८॥

असत्यवाद करु नये । खोटा संग धरु नये ।
मोचकाशी मैत्री करु नये । कोणी एक ॥९॥

भलते भरी पडू नये । अनाचार करु नये ।
कपट मनी धरु नये । कोणी एक ॥१०॥

जन्मा आलिया स्वभावे । काही सार्थक करावे ।
ऐसे मनी विचारवे । कोणी एक ॥११॥

एकाजनार्दनी भावे । संतचरणी लीन व्हावे ।
सदा हरिनाम उच्चारावे । कोणी एक ॥१२॥

नीती भारुड समाप्त

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – कान्होबा तुझी घोंगडी चांगली
भारुड -घोंगडी अभंग Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *