२० भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – २०.

गोपी आपसांत चर्चा करीत असतांनाच स्नान संध्या आटपुन नदीवरुन येत असलेला ऊध्दव त्यांच्या दृष्टीस पडला.त्याच्या शांत,सौम्य,प्रगाढ ज्ञान,बुध्दीमत्तेच्या तेजाने कांतीमान चेहरा पाहुन हा अक्रुर नसुन,कृष्णानेच आपल्या जवळचा दूत कांही कुशल वार्ता घेऊन पाठविला असेल. त्याने बघ कृष्णा सारखाच वेश धारण केलेला असुन अजानबाहु, तेजस्वी चेहरा दिसतो आहे. तो जवळ येतांच गोपींनी त्याला गराडाच घातला.गोपींनो!

कृष्णाकडुन तुमच्या साठी निरोप घेऊन आलोय, हे ऐकताच त्यांच्या ह्रदयात आनंदी लहरी ऊमटल्या. त्यांनी त्याला एका झाडाखाली बसायला सांगुन,कृष्णाबद्दल कुशल सांगण्याची विनंती केली.आम्ही त्याच्या आठवणीने किती बेचैन झालोत,त्याच्या दर्शनासाठी किती उत्सुक आहोत याची त्याला कल्पना तरी आहे कां?कृष्णाला भेटण्या ची गोपींची उत्कंठा पाहुन ऊध्दव आश्चर्य चकित झाला.

ऊध्दव म्हणाला,हे गोपींनो! भगवंता ची भक्ती साधण्यासाठी मोठमोठ्या योग्यांनाही अत्यंत कठीण साधना करुन परिश्रम,व्रत वैकल्ये,अनुष्ठाने,होमहवन, जपजाप्य,इंद्रीय दमन अश्या अनेक प्रका रांनी कृष्णभक्ती मोठ्या कष्टाने प्राप्त होते तुमचे भाग्य काय वर्णावे?यातील एकही उपाय न करतां,ऋषी मुनींनाही जे शक्य नाही,त्यांनाही हेवा वाटावा असे भगवान श्रीकृष्णाचे प्रेम तुम्ही संपादन केलेत.हे पुर्व पुण्याशिवाय शक्य नाही. आतां ऐका! मी कृष्णाचा विश्वासू दूत असल्यामुळे त्याने ही गुप्त कामगीरी माझ्यावर सोपवली आहे. भगवान कृष्ण म्हणतो, गोपींनो तुमचा व माझा वियोग होणे कधीही शक्य नाही, कारण मी सर्वात्मा आहे. मनोनिग्रहच सर्वांचे सार आहे.गोपीं नो नद्या जशा समुद्रास मिळतात तशाच तुम्ही माझ्यात एकरुप झालेल्या आहात.

एक गोपी मधेच म्हणाली,हे दूता! कृष्णा ला म्हणावं,तुझं हे भारी भारी वेदान्त आमच्या समजण्यापलिकडे आहे,आम्ही तुझ्या सगुन रुपाला भुललेलो आहोत.तूं आम्हाला सोडुन गेलास…. हे ऐकुन ऊध्दव म्हणाला,तुम्ही असेच म्हणाल हे त्याला माहित होते!म्हणुन त्याने निरोप दिला की, मी तुमच्यापासुन दूर राहण्या चा हेतुच मुळी,तुम्ही सतत माझे चिंतन करुन,माझ्यावरची भक्ती दृढ व्हावी,तुम्ही माझ्याशी पुर्णपणे तादात्म्य पावावे,म्हणुन
माझेवर विश्वास ठेवा,जे मी करीत आहे ते योग्य करीत आहे अशी दृध भावना ठेवुन सारे विकल्प दूर करा.मी तुमच्या ह्रदयात सदैव आहे हा विश्वास ठेवा.अशा प्रकारे उध्दवाने गोपींची विविध प्रकारे समजुत घातली.

नंद यशोदेच्या आग्रहास्तव उध्दव कांही दिवस राहुन,सर्वांचा निरोप घेऊन निघाला तेव्हा,जणुं कृष्णच निघाला,या भावनेने त्या शोकाकुल झाल्यात,पण लगेच स्वतःला आवरुन,कृष्णाच्या आवडीच्या अनेक वस्तु त्याच्याजवळ देत म्हणाल्या,आमची एवढीच इच्छा आहे की,कृष्णचरणांपासुन आमचे मन क्षण भरही ढळुं नये,आमच्यामुखी सदैव त्याच्याच नामाचा जयघोस असावा आणि हा नश्वरदेह त्याच्याच सेवेत झिजुन जावा.जा ऊध्दवा जा…आमचे कुशल सांग त्याला.जड अंतःकरणाने सर्वांचा निरोप घेऊन ऊध्दव मथुरेकडे रवाना झाला.

मथुरेला पोहोचल्यावर ऊध्दवाने वृंदावनवासीयांचे मनोगत व त्यांच्या निःस्सीम भक्तीबद्दल सद्गदित कंठाने श्रीकृष्णाला सांगीतले.मथुरेतील जनतेचे कृष्णावर अत्यंत प्रेम जडले.सर्वजन आनंदात होते.पण कंसाच्या दोन राण्या म्हणजे जरासंधाच्या दोन कन्या अस्ति आणि प्राप्ति ( सुकोनी व सुस्तानी) यांच्या ह्रदयात द्वेषाग्नी घुसमसत होता. श्रीकृष्णाने आपला पती कंसाला ठार मारुन आपल्याला दुःखसागरात लोटले हे त्या विसरुं शकत नव्हत्या.कश्या बश्या एक वर्ष मथुरेत राहुन,मगधदेशी आपला पिता जरासंधाकडे जाऊन आपल्या विलापांनी त्याचा आधीचा द्वेषाग्नी भडकवला.मथुरेत श्रीकृष्णाचे स्तोम माजले असुन,राजा उग्रसेन सुध्दा त्याच्या च कलाने वागतो हे ऐकुन जरासंधाचा क्रोधाग्नी भडकला.कंसवधाचा सूड घेण्यासाठी मथुरेवर स्वारी करण्याचा त्याने निश्चय केला.

जरासंध सार्‍या हिंदुस्थानच्या सार्व भौम पदाला पोहोचलेला,सर्व राजांनी त्याचे मांडलिकत्व स्विकारले होते.इतरही हितैषी,राजे, नि चहाते सगळे आपापल्या अफाट सैन्यानिशी मथुरेकडे सरकु लागले.जरासंधाने मथुरेला वेढा घातला. मथुरेतील यादव,भोज,वृष्णी,अंधक इत्यादी क्षत्रिय बलराम-श्रीकृष्ण या दोन महापराक्रमी सेनापतीच्या अधिपत्या खाली मथुरेचे सावधपणे रक्षण करुं लागले.

भ. श्रीकृष्ण संपूर्ण चरित्र

सर्व देवी देवतांचे व संतांचे चरित्र

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *