भागवत महापूराण माहात्म्य अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

1.                  भागवत पर

1.      शुकसनकादिकीं उभारिला बाहो

शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षितीला हो दिसां सातां ॥१॥
उठाउठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥धृ.॥
त्वरा जाली गरुड टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥
तुका म्हणे करी बहु च तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥

.

1.      गीता भागवत वेद उच्चारितां

गीता भागवत वेद उच्चारितां । पापाची तों वार्ता कोठें राहे ॥१॥
कळ वासना नामीं जे रंगली । साधनें राहिली मग कैंची ॥२॥
म्हणोनिया नेम ऐसा तारी जीवा । होय तोचि देवा आवडता ॥३॥
उगवला दिवस जाय तो क्षणांत । विचारूनि हित वेगीं करा ॥४॥
तुका म्हणे स्मरा वेगीं विठोबासी । न धरा मानसीं दुजें कांहीं ॥५॥

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्या पुत्र होती जीं सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥२॥
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥३॥
तुका म्हणॆ मज घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥४॥

संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥१॥
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ॥२॥
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ॥३॥
जनार्दन एकनाथ । ध्वज उभारिला भागवत ॥४॥
भजन करा सावकाश । तुका झालासें कळस ॥५॥
बहिणी म्हणे पडकती ध्वजा । निरुपण केले वोजा ॥६॥

हरि गुन गावत नाचुंगी ॥धृ॥
अपने मंदिरमों बैठ बैठकर । गींता भागवत बांचुगी ॥१॥
ग्यान ध्यानकी गठडी बांधकर । हरिहर संग मै लागूंगी ॥२॥
मीराके प्रभु गिरिधर नागर । सदा प्रेमरस चाखुंगी ॥३॥

टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची । १ ॥
पंढरीचा हाट कउलांची पेठ । मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजजयजयक भिमातीर ॥३॥
हरिनाम गर्जता भया नाही चिंता । ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
खटनट यावे शुध्द होऊनि जावे । दवंडी पिटी भावे चोखामेळा ॥५॥

रे मन,कृष्ण नाम कहि लीजै ।
गुरुके बचन अटल करि मानहि, साधु समागम कैजै ॥
पढिये गुनिये भगति भागवत, और कहा कथी कीजै ।
कृष्णनाम बिनु जनमु बादिही, बिरथा काहे जीजै ॥
कृष्णनाम – रस बह्यो जात है, तृषावन्त हूवै पीजे ।
सूरदास हरिसरन ताकिये, जनम सफल करि लीजै ॥

भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *