दान महिमा अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

1.                  दान महिमा अभंग

1.      भुमिदाने होसी भूमिपाळू ।
भुमिदाने होसी भूमिपाळू । कनकदाने कांति निर्मळू ।
चंदनदाने सदा शीतळु । जन्मोजन्मी । प्राणिया ॥१॥
अन्नदाने दृढायुष्यी । उदकदाने सदासुखी ।
मंदिरदाने भुवनपालखी । सुपरिमलु उपचार ॥२॥
वस्त्रदाने सुंदरपण । तांबुंलदाने मनुष्यपण ।
ज्ञानदाने ब्राह्माणपण । अतिलावण्य़ सुंदरता ॥३॥

जे वृक्ष लाविती सर्वकाळ । तयांवरी शास्त्रांचे झल्लाळ ।
जे ईश्र्वरी अर्पिता फळ । पुत्रवंत होऊनि नांदती ॥४॥
ऐशा दानांच्या पंक्ति । वेगळाल्या सांगो किती ।
एका ध्या रे लक्ष्मीपती । विष्णुदास नामा म्हणे ॥५॥

अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम्।
अन्नेन क्षणिका तृप्तिर्यावज्जीवं च विद्यया॥

अन्न दान परम दान है, अतः
विद्या दान उससे भी बड़ा है
क्योंकि
अन्न से क्षण भर की तृप्ति होती है
और विद्या से आजीवन॥

Giving food is the greatest charity so giving knowledge is even greater than that because food provides the contentment for a minute and knowledge for whole life.

भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *