३१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ३१.

वास्तविक स्यमंतक मण्यावर सत्यभामेच्या मुलाचा,पर्यायाने त्याचा हक्क होता पण!घरातील दुही टाळण्या साठी रास्त हक्काचा त्याग करुन,तो मणी तुझ्याच जवळ ठेव व निश्चिंत मनाने घरी परत ये, असा निरोप अक्रुराला श्रीकृष्णानने पाठवला.अक्रुर काशीहुन आल्यावर सर्वां समक्ष त्यालाच तो मणी देऊन स्यमंक मण्याचा विषय इथेच संपवला.


श्रीकृष्णाचे गृहस्थ जीवन आनंदात जाऊ लागले.आठ भार्यांमधे सर्वतोपरी उत्तम व आदर्श गृहस्थी कशी चालवावा याचे ऊदाहरण त्याच्या जीवनावरुन दिसुन येते,पण धर्मरक्षणार्थ मानवलोकी अवतीर्ण झालेल्या कृष्णाला कुठली उसंत?तो सत्यभामेशी तिच्या महालात निवांत बोलत बसले असतां,इंद्राचा दूत निरोप घेऊन आला, “प्रागज्योतिष” (आसाम) चा महादुष्ट,ऊन्मत राक्षस,राजा नरकासुराने वरुणाचे छत्र,इंद्रमाता अदितीची कुंडले व इंद्राचे मणीपर्वत हरण केले.त्याचे परिपात्य करावे.हे ऐकताच कृष्णाला हा आपलाच अपमान समजुन,संतापाने त्याचे पारिपात्य करण्याचा निर्धार केला व तसा दूताला निरोप दिला,प्रागज्योतिषाचा(आसामचा) राजा नरकासुर राक्षसाने पृथ्वीवरील गंधर्वाच्या,मनुष्याच्या व राक्षसांच्या सुंदर सुंदर मुलींचे अपहरण करुन त्यांना एका पर्वतावर कैद करुन ठेवले होते.

त्या गरीब मुलींना सोडविण्याचा विचार सुरु असतांनाच इंद्राकडुन दूत आल्यामुळे तात्काळ हालचाल करणे आवश्यक होते.सत्यभामे ने सोबत येण्याचा हट्ट केल्यामुळे तिलाही बरोबर घेऊन, शंख,चक्र,गदा घेऊन युध्दाच्या तयारीने सरळ गरुड वाहनाने श्रीकृष्ण प्रागज्योतिष नगरीत येऊन पोहोचला .प्रत्यक्ष श्रीवत्सांकित भूषण व वन मालांनी युक्त असा श्रीविष्णुच गरुडारुढ होऊन येत असलेसे पाहुन,नरकासुराने मुरु नामक असुरश्रेष्ठ आणि कल्पांत कतुल्य सेनापती हातात शक्ती घेऊन श्रीकृष्णाचा प्रतिकार करण्यास अंगावर धावुन आपल्या हातातील व्रज व कांचन अस्र फेकली.जळजळीत उल्केसारखी ती महाशक्ती आपल्याकडे येतसे पाहुन जनार्दनाने सुवर्णपंखा बाण सोडल्याबरोबर त्या महाशक्तीचे दोन तुकडे झाले.

ते पाहुन संतापाने त्याने सुवर्ण गदा घेतल्याचे पाहुन वासुदेवाने अर्धचंद्र बाण सोडल्या वर गदेचे दोन तुकडे झाले व लगेच दुसर्‍या बाणाने त्याचे मस्तक उडविले. मरु व असंख्य दैत्यांचा समाचार घेतल्या वर श्रीकृष्णाने पर्वत ओलांडुन गेल्यावर तिथे निसुंद हा दुसरा सेनापती व हयग्रीवा सुल ससैन्य युध्दास सिध्द असल्याचे श्रीकृष्णाला दिसले. निसुंद, हयग्रीवासु व श्रीकृष्णामधे भिषण युध्द होऊन महाबलाढ्य दोघेही दैत्य ठार व दानव सैन्याची पूर्ण वाट लावुन,श्रीकृष्ण प्रागज्योतिष नगराच्या वेशीजवळ येऊन “पांचजन्य” शंख जोरात वाजवला.प्रचंड शंखध्वनी ऐकुन भयंकर क्रोधीष्ट नरकासुर, एक सहस्र अश्व जोडलेल्या,शत्रुला कर्दनकाळ वाट णार्‍या रथात आरुढ होऊन सोबत धुम्रवर्ण,धिप्पाड रकाक्ष व विक्रतमुखी, दैत्य,दानव व राक्षसांसह सज्ज होऊन नगराबाहेर,जिथे श्रीकृष्ण होता,त्याला गराडा घालुन भीषण युध्द सुरु झाले, शेवटी मधुसुदनाने आपल्या दैदिप्यमान चक्राच्या सहाय्याने नरकासुराच्या शरीरा चे दोन शकले भूमीवर पडले.पराभूत दानव सैन्य श्रीकृष्णाला शरण आले.


श्रीकृष्णरुपी भगवान विष्णुंचे एक मोठेच काम आटोपले.श्रीकृष्णाने नरका सुराच्या प्रचंड वाड्यात प्रवेश करुन त्याच्या जामदार खान्यातील अपार धन, विपुल मोती,विविध रत्ने,प्रवाळ,वैडुर्य राशी,सुवर्ण,चंद्रकांत मणी,हिर्‍यांचा ढीग, महामुल्यवान शयने,सिंहासने, वरुणाचे हरण केलेले मौल्यवान छत्र, व इंद्रमातेची कुंडले,एवढे अफाट भांडार व वीस सहस्र हत्ती अठरा हजार अश्व,गायी कोशरक्षका ने श्रीकृष्णाला अर्पन केल्यावर,कृष्णाने ती सर्व संपत्ती द्वारकेस पोहोचविण्याची आज्ञा केली.नरकासुराने हरण करुन ठेवलेल्या कन्यांना मुक्त करण्यासाठी तो गरुडावरुन गिरिकंदात आला. त्या सर्व कन्यांची मुक्तता झाल्यावर त्या सर्वांनी भक्तीभावाने नमस्कार करुन सद्गदीत सयंत व आनंदी मुद्रेने म्हणाल्या,देवा! आमची मुक्तता करुन आमचा उध्दार केलास,तुझे चरण सोडुन आम्ही कुठेही जाणार नाही.त्यांच्या विनंतीनुसार सर्वांना अंगरक्षकांसोबत द्वारकेस पाठवुन दिले. तिथुन निघण्यापुर्वी नरकासुराची माता भूमी च्या विनंतीवरुन नरकासुर पुत्र भगदत्तला गादीवर बसविले.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *