द्वादशी, अभंग व महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Dwadashi che Abhang
Dwadashi che Mahatmya
द्वादशीचे अभंग
द्वादशीचे महात्म्य.
द्वादशीचे ७, अभंग आहेत.
वारकरी भजनी मालिका

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?
कोणी कोणती एकादशी करावी ?
एकादशी अभंग पाहा.
द्वादशी अभंग पहा.
क्षिरापती अभंग पहा
एकादशी व्रताचे फळ, व विधी पहा
२६ एकादशी महात्म्य पहा.

-: एकादशी व्रताचे नियम :-
दशमीला एकाच वेळी जेवण करावे,
एकादशीला निराहार म्हणजे काहीच खाऊ नये,
रात्रभर हरिजागर, कथा, किर्तन, सत्संग करावे.
शक्य असल्यास प्रदक्षणा करावी, अनवाणी राहावे, मौन धरावे.
द्वादशीला एकभुक्त म्हणजे एकाच वेळेस जेवण करावे तेही सूर्योदयाच्या अगोदर.

-: महत्वाची सूचना :-
एकादशीच्या जागराचे भजन न झोपता आपण रात्रभर भजन करत असतो,

द्वादशीचे सकाळी ब्रह्म मुहूर्तावर (४ :१५ मिनिटांनी) स्नान करावे, नंतर नित्याचा काकडा घ्यावा, व सूर्योदयाचे अगोदर नैवद्य तयार करून तो द्वादशीचे अभंग म्हणून भगवान परमात्म्याला द्यावा.

नंतर तो प्रसाद आपण ग्रहण करताना म्हणजेच उपवास सोडण्याची अगोदर क्षिरापती (खिरापती) चे अभंग सुद्धा म्हणावे, हे सर्व अभंग म्हणून मग सर्वांना प्रसाद द्यावा, अर्थात सर्वांनी उपवास सोडावा (भोजन करावे.)

द्वादशीचे अभंग

, , , ,


झाले ज्ञानदेव वाणी। आले सामुग्री घेऊनि ॥१॥
पर्वकाळ द्वादशी। दिली सामुग्री आम्हांसी ॥२॥
ज्ञानदेवाच्या चरणीं। शरण एका जनार्दनीं ॥३॥


झाली पाकसिध्दि वाट पाहे रखुमाई।
उदक तापलें डेरां चीकसा मर्दू द्यां पायी ॥१॥
उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनीं ॥
उभ्या आंचवणा गोपिका कळस घेऊनि ॥२॥
अवघ्या सावचित्त सेवेलागी सकळां।
उध्दव अक्रूर आले पाचारूं मूळा ॥३॥
सावरिली सेज सुमनयाति सुगंधा।
रत्नदीप ताटी वाळा विडीया विनोदा ॥४॥
तुका विनंती करी पाहे पंढरीराणा।
असा सावचित्त सांगें सकळ जनां ॥५॥

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?
कोणी कोणती एकादशी करावी ?
एकादशी अभंग पाहा.
द्वादशी अभंग पहा.
क्षिरापती अभंग पहा
एकादशी व्रताचे फळ, व विधी पहा
२६ एकादशी महात्म्य पहा.


माझा हा विठोबा येईल गे जेव्हां।
जेवीन मी तेव्हां गोणाबाई ॥१॥
जाऊनि राउळां तयासी तूं पाहे।
लवकरी बाहे भोजनासी ॥२॥
भरलिया रागें क्रोध त्याचा साहे।
लवकरी बाहे भोजनासी ॥३॥
ज्ञानेश्वरा घरी असेल बैसला।
जाऊनि विठ्ठला पाहें तेथें ॥४॥
जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा।
खोळंबला नामा भोजनासी ॥५॥


उठोनि प्रात:काळी ओढितां कांचोळी।
जातो वेळोवेळी महाद्वारा ॥१॥
अहो जी दातारा विनंती अवधारा।
तुम्ही यावे घरा भोजनासी ॥२॥
रखुमाई मातें तुम्ही यावें तेथे।
सामुग्री सांगातें चालवावी ॥३॥
सडे संमार्जन हे माझे करणे।
उदक भरीन सुगंधेसी ॥४॥
शेष पत्रावळी काढीन उष्टावळी।
नित्य वेळोवेळी हाचि धंदा ॥५॥
नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा।
प्रसाद तो द्यावा सेवकासी ॥६॥

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?
कोणी कोणती एकादशी करावी ?
एकादशी अभंग पाहा.
द्वादशी अभंग पहा.
क्षिरापती अभंग पहा
एकादशी व्रताचे फळ, व विधी पहा
२६ एकादशी महात्म्य पहा.


रुक्मांगदाकारणे एकादशीचा छंद।
तेणें परमानंद प्रगटला ॥१॥
अंबऋषीकारणे द्वादशीचा छंद।
तेणें परमानंद प्रगटला ॥२॥
प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद।
तेणें परमानंद प्रगटला ॥३॥
एकाजनार्दनीं एकविध छंद।
तेणें परमानंद प्रगटला ॥४॥


नावडे वैकुंठ शेषशयन। वैष्णव सदन आवडले ॥१॥
रमा म्हणे कैसी नवल परी। देव भुललें वैष्णवा घरीं ॥२॥
जो नातुडे ध्यानीं समाधिसाधनीं। तो स्वानंदें कीर्तनी नाचतसे ॥३॥
जो यज्ञावदानीं कांहीं नेघे माये। तो द्वादशी क्षीराब्धी उभउभ्या खाये ॥४॥
लक्ष्मी म्हणे देव आतुडे कवणे बुद्धी। वैष्णवांची सेवा करावी त्रिशुद्धी ॥५॥
वैष्णवा घरी लक्ष्मी कामारी। एका जनार्दनी देव दास्यत्व करी ॥६॥

, , , ,

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?
कोणी कोणती एकादशी करावी ?
एकादशी अभंग पाहा.
द्वादशी अभंग पहा.
क्षिरापती अभंग पहा
एकादशी व्रताचे फळ, व विधी पहा
२६ एकादशी महात्म्य पहा.

एकादशी, द्वादशी, अभंग. विधी, नियम इत्यादी माहिती

एकादशी, द्वादशी, अभंग. विधी, नियम इत्यादी माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *