गीता जयंती महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

गीता आरती

आज मंगळवार दिनांक 14/12/2021 रोजी
म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल. विश्वातील लोक भावपूर्ण अंतःकरणाने गीताजयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित अखिल विश्वात गीतेची आगळीवेगळी विशेषता आणि महानता प्रकर्षाने दिसून येते, म्हणूनच थोर संत विनोबाजींनी गीतेसंबंधी असे म्हटले आहे की,’ माझे शरीर आईच्या दुधावर पोसले, त्यापेक्षाही माझे हृदय व बुद्धी यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे गीता माझे प्राणतत्त्व होय.’

समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा नान मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे.

हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील,काळातील असो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील श्लोक माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे.

पांडुरंगशास्त्री आठवले यांनी गीतेसंबंधी असे म्हटले आहे की,’वेद,उपनिषदे यांचा महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहानसा घागरीत सामावून घेतलेला आहे. गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. ‘गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय पहायला मिळतो. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता हा आमचा विश्व धर्मग्रंथ आहे. साहित्य शौकिनांची लालसा गीता पूर्ण करते. कर्मवीरांना गीता उत्साह देते. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते. व्याकरणकारांचे हृदय गीतेतील शब्दांचे लालित्य पाहून डोलू लागते. पांडुरंगशास्त्री सांगतात की, निराशावादी मनुष्य गुलाबावरील काटे पाहतो, गीता त्याला काट्यांमध्ये गुलाब पाहण्याची दृष्टी देते. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. स्वधर्म जाणणे आणि प्राणांतीही तो न टाकणे ही एक मनाची घडण आहे. आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर, क्रांतिकारक देशभक्त, गीता हृदयाशी धरून फासावर चढले, याचाच अर्थ असा की, मृत्यूलाही हसतमुखाने सामोरे जाण्याचे आत्मिक आणि मानसिक बळ, शक्ती गीतेने दिली. लोकमान्य टिळक, योगी अरविंद, महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केले आहे.

विद्या प्राप्त करावयाची असेल तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजेत, असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

💐 आपण भगवद्गीता का वाचावी ❓ – परमेश्वरासोबत असलेल्या आपल्या वास्तविक संबंधांना विसरण्याची वृत्ती हिच मनुष्याचे दुःखाच्या जाळ्यात अडकण्याचे एकमेव कारण आहे. भगवद्गीतेमुळे आपले सर्व संशय दूर होवून मनातील इच्छा पूर्ण होतात व सर्वप्रकारे सौभाग्य प्राप्ती होते. मानव समाजाला त्याच्या अस्तित्वाच्या संघर्षामध्ये विजयी होण्यासाठी हा एक पूर्ण आध्यात्मिक ज्ञानसंग्रह आहे. भगवद्गीतेच्या अनुसरणानुसार अर्जुन हे एक आदर्श उदाहरण आहे. मानवाला त्याच्या आयुष्यात आपले शरीर आणि मन यांच्या माध्यमातून अनेक दुःख आणि अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यांची उत्पत्ती मानवाच्या स्वतःच्या इच्छा आणि इतर प्राणीमात्रासोबत असलेल्या लोभ व संबंधातून होत असते. अशा परिस्थितींचा सामना करण्यासाठी भगवद्गीतेचे अनुसरण करण्याव्यतिरिक्त इतर कोणताच मार्ग नाही. भगवद्गीतेचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तींना ज्ञान होते की भगवान श्रीकृष्णच परम पुरुषोत्तम परमेश्वर आहेत. तेव्हा आपण स्वतःला त्यांना समर्पित होऊन शरण जावून जीवनात शांती प्राप्त करून आपल्या जीवनाचे उद्देश प्राप्त करण्यात सफल होऊ शकतो. ( गीतेचा सारांश पुढील श्लोकात व्यक्त झालेला आहे.) एकं शास्रं देवकीपुत्र गीतम्, एको देवो देवकीपुत्र एव l एको मंत्रस्तस्य नामानि यानि, कर्माप्यको तस्य देवस्य सेवा ll अर्थात एकच असे शास्त्र आहे जे देवकीपुत्र भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून गायले गेले आहे. प्राप्त करून घेण्यासारखा देवकीपुत्र श्रीकृष्ण हा एकच देव आहे. या त्याच्या गीतात आत्मा हेच सत्य सांगितले आहे. आत्म्याशिवाय दुसरे काहीही शाश्वत नाही. भगवान श्रीकृष्णाच्या नंतर हजारो वर्षांनी ज्या महापुरुषांनी एका ईश्वराला सत्य असल्याचे सांगितले ते गीतेचे संदेशवाहक आहेत. ईश्वराकडून लौकिक तसेच पारलौकिक सुखांची कामना, ईश्वराला घाबरणे, अन्य कोणालाही ईश्वर न समजणे परंतु ईश्वरासाठी साधना करणे या सर्व गोष्टींची क्रमबध्द सांगोपांग चर्चा केवळ गीतेमध्ये केलेली आहे. गीतेने सुखशांती तर प्राप्त होतेच परंतु ती अक्षय, अनामय, परमपददेखील देते आणि हे परमपद प्राप्त करावयाचे असेल तर विश्व गौरवास पात्र झालेली म्हणजे श्रीमद्भगद्गीता होय…. ( गीता जयंतीच्या निमित्ताने ) 🙏🌹 संकलन – ह.भ.प. बळीराम दादा आळंदीकर १४/१२/२०२१ 🚩🚩🚩

जगातील पहिली छापील भगवद्गीता

आज गीता जयंती.. त्यानिमित्ताने जगातील पहिल्या छापील भगवद्गीतेविषयी.. !

भगवद्गीता हा तमाम हिंदूच्या श्रध्देचा ग्रंथ. अनेक शतके या ग्रंथावर विचारमंथन होत आले आहे. अनेक विद्वानांनी- विचारवंतांनी या ग्रंथातील विचारांची मांडणी वेगवेगळ्या पध्दतीने केली. आजच्या प्रगत मुद्रणयुगात भगवद्गीतेच्या शेकडो आवृत्त्या निघाल्या आहेत. मात्र, या ग्रंथाची पहिली छपाई सन १८०५ साली मिरजेत झाली. जगात छापण्यात आलेली ही पहिली भगवद्गीता. देशाच्या इतिहासातील ही महत्त्वपूर्ण घटना होती. जगातील या पहिल्या छापील गीतेची सध्या ज्ञात असलेली एकमेव प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात आहे.
मिरजेचे तत्कालीन संस्थानाधिपती गंगाधरराव पटवर्धन यांनी एका तांबट कारागीराकडून तांब्याच्या पत्र्यावर ठसे उमटवून त्याद्वारे भगवद्गीता छापली. देशातील हा पहिला ब्लॉक प्रिटींगचा नमुना होता. मिरजेतील या पहिल्या मुद्रणाने देवनागरी मुद्रणकलेची मुहुर्तमेढ देशात रोवली गेली.
© मानसिंगराव कुमठेकर, मिरज 9405066065

गीताजयंती

गीतेचें महिमान ऐकावें श्रवणीं । सावधान सज्जनीं द्यावें आतां ॥१॥
जयाचे अंतरी वसे नित्य गीता । पावन तत्वतां ब्रह्मरुप ॥२॥
गीता म्हणतां ऐसें दोन्हीच अक्षरें । पाप तें निर्धारें दिशा लंघी ॥३॥
भगवदगीता पठण सर्वकाळ ज्यासी । मोक्षाची तो राशी मूर्तिमंत ॥४॥
गीता म्हणतां त्यासी काय पुण्य आहे । इतिहास पाहे पुराणींचा ॥५॥

पार्वतीयेप्रती शिवें सांगितलें । अध्यात्म बोलिले ब्रह्मविद्या ॥६॥’
ब्रह्मरुप त्याचें स्वयें चित्त झालें । बोलणें खुंटले आहे नाहीं ॥७॥
नित्य म्हणतां गीता वाचेसी स्मरण । केलिया पठण पुण्य काय ॥८॥
दोषाचे पर्वत भस्म होती तेणें । गीतेचे पठण केलियानें ॥९॥
श्रवण पठण गीतेचे पूजन । सर्वही साधन कलियुगीं ॥१०॥

पद्मपुराणीचें सांगितलें सार । गीता आहे थोर ब्रह्मविद्या ॥११॥
सर्वही पातकें जळोनियां जाती । अर्जुना श्रीपती बोलियेला ॥१२॥
गीता अभ्यासितां कळे सारासार । महिमा आहे थोर पठणाचा ॥१३॥
गीता म्हणतां आहे पापा प्रायश्चिता । मुक्ति सायुज्यता वरी त्यासी ॥१४॥
गीता म्हणतां जाण भागीरथीं स्नान । पृथ्वीचि दान दिधली तेणें ॥१५॥

गीता ध्याई नर सर्वदा तो सुची । सर्वही तीर्थांची महिमा तेथें ॥१६॥
तीर्थक्षेत्रयात्रा देवाचें पूजन । यज्ञयाग दान उद्यापन ॥१७॥
धरणी पारणी नित्य उपोषण । पृथ्वीचें भ्रमण निराहारी ॥१८॥
जप तप व्रत नित्य अनुष्ठान । कर्म आचरण उपासना ॥१९॥
पुराण श्रवण वेदशास्त्रीं जाण । सर्वही साधन घडे त्यासी ॥२०॥
ब्रह्मविद्या गीता सर्वांचें साधन । करी जो पठण नित्य काळीं ॥२१॥
एका जनार्दनीं नित्य हेंचि ध्यान । पूर्ण समाधान घडे तेणें ॥२२॥

श्रीगीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीकृष्णार्पण

मोक्षदा एकादशी- गीता जयंती🙏🏻

गीता गीता म्हणतां पापा होय नाश।
कैवल्यहि त्यास प्राप्त होय।।

गीतेची अक्षरें पडतां श्रवणीं।
जाय तत्क्षणीं भवभय।।

एक एक श्लोकी कोटी अश्वमेध।
पुण्यही अगाध म्हणतां गीता।।

नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता।
तयाच्या सुकृता पार नाहीं।।

।।भगवान श्रीगोपालकृष्ण महाराज की जय।।
।।श्रीमद्भगवद्गीतामाता की जय।।

श्रीमद्भगवद्गीता जयंती
गीता जाणणारा मानुस प्रतिकुल परीस्थीतित डगमगत नाही.मात्र तो व्याघ्रमुखी
असावा श्वानमुखी नसावा.
म्हणजे दृष्टांतापेक्षा सिद्धांतास महत्त्व देणारा असावा.कारण गीता हे चिलखत आहे गीता मानसाला देव,दुखाला सुख,मृत्युलोकाचा वैकुंठलोक ,विपत्तीचे रुपांतर संपत्तीत आणि विश्वाचे ब्रह्म करणारा क्रांतिकारक ग्रंथ आहे.ते जगण्याचे प्रेरणास्रोत आहे.जगातील सर्व ग्रंथाचे गीतातत्व सार आहे चारवेदांचे सार उपनिषदात ,पूढे व्यासांनी महाभारत गोवले व महाभारतातील एक लक्ष श्लोकांचे सार गीतेतील सातसे श्लोकात आले.

या श्लोकांची विभागणी–
५७४ भगवान उवाच ,
९१ अर्जुन उवाच ,
३४ संजय उवाच ,
आणि
१ धृतराष्ट्र उवाच असे एकूण ७०० श्लोक.
भगवंताने अर्जुनाचे निम्मीत्त करुन सर्व जगाचा उद्धार केला.नुसता या ग्रंथाचा उच्चार जरी केला तरी गर्भवास संपतो.

घरात आणुन भावपुर्वक नित्यपूजन केल्यास तिथे सर्व तिर्थ वास करतात.म्हणून जीवनात गीताभ्यास फार महत्वाचा आहे .असो.🙏🙏

की हे गीता सप्तशती- । मंत्रप्रतिपाद्य भगवती ।
मोहमहिषा मुक्ती । आनंदली असे ।।

आपल्या भारतभूमीतील आणि दिव्य महान संस्कृतीतील अजरामर व सनातन असा संस्कृतमधील ७०० श्लोकांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ “श्रीमद्भगवद्गीता”

महाभारतातील भीष्मपर्वात कुरुक्षेत्राच्या महासंग्रामात “किं
कर्तव्यमूढ ?” झालेल्या अर्जुनाला उपदेश करण्याच्या निमित्त गायली गेली ती गीता. या दिव्य ग्रंथाला ५००० हुन अधिक वर्षे पूर्ण होत आहेत. कुठल्याही काळात, कुठल्याही युगात, कुठल्याही भूमीत व कोणत्याही परिस्थितीत न बदलणारी म्हणजे सर्वकाळ उपयुक्त असणारी तत्वे व जीवनमूल्ये भारतीय तत्वज्ञानाने प्रकट केली. सर्व ऋषीमुनी, संत व महान द्रष्ट्या पुरूषांनी वेळोवेळी श्रीमद्भगवद्गीतेतील महान तत्वांनाच उजाळा देऊन समाजाला नेहमी स्थिर, तत्वनिष्ठ, विकाररहित व कर्तव्याने उच्च ध्येयाकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त केले आहे. जगद्गुरू श्रीमदादयशंकराचार्यांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत अनेकांनी याच सनातन व दिव्य ग्रंथावर भाष्य करून समाजाला योग्य वळण व दिशा देण्याचे काम केले आहे. व्यक्तिगत व सामाजिक अशा दोन्ही ‘धर्मांचे’ म्हणजेच कर्तव्याचे दिग्दर्शन, सृष्टिनिर्मितीचे गूढ, मनुष्ययोनीची विशेषता, आपली जबाबदारी ओळखून विश्वकल्याणासाठी आचारावयाची तत्वे, जीवनमूल्ये, कर्म त्याचे परिणाम (कर्मविपाक) व मानवी जीवनाचे ध्येय जो “आत्मसाक्षात्कार” तो मिळवण्याची साधना या ग्रंथामध्ये सामावलेली आहे. ” वसुधैव कुटुम्बकम्” या वैश्विक विचाराने देश, भाषा, संप्रदायाच्या चौकटीच्या पलीकडे जो कोणी स्वतःला मानव समजतो त्या प्रत्येकाच्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वंकष विकास व त्यातील सर्वश्रेष्ठ प्रकटीकरण कोणत्या गुणांनी करता येईल याचा विचार म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. सांस्कृतिक व आध्यात्मिक शास्त्राचा परिपूर्ण विकास म्हणजे श्रीमद्भगवद्गीता..!! गंगेतूनही पवित्र अशा श्रीगीतेने स्वधर्म म्हणजे आपले कर्तव्य तर आपल्याला शिकविलेच त्याचसोबत सकाम उपासनेतील फोलपणा स्पष्ट करून एक परमात्म्याचे ज्ञान, भक्ती, योग यावर आधारित निष्काम, निरपेक्ष, शुद्ध उपासना शिकवली. जगाकडे पाहण्याचा विलक्षण दृष्टिकोन देऊन चिंता, भय, यातून मुक्त होण्यासाठीची स्थितप्रज्ञता व जगाच्या कल्याणासाठी ची संवेदनशीलता असा मन व बुद्धी पोषक आहार दिला.
व्यक्ती व समाजाला निकोप करून स्थिर, सुस्थितीत आणून उत्कर्ष साधावयाचा असेल तर यच्चयावत जीवाला गीता विचारांच्या अनुशिलनाशिवाय पर्याय नाही !! याचसाठी आज “मोक्षदा एकादशी” “श्रीमद्भगवद्गीता जयंती” निमित्त मनबुद्धीसहित या दिव्य ग्रंथाची कास धरूयात. दररोज या ग्रंथाचे नियमित वाचन, चिंतन त्यानुसार आचरण व त्याच बरोबर समाजातील आपल्या परिचयाच्या जास्तीत जास्त लोकांना या जीवनग्रंथाचे महत्व पटवून देण्याचा संकल्प करूयात..!

श्रीमद्भगवद्गीता जयंती निमित्त आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा व परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम..!!

🕉️ कृष्णं वन्दे जगद्गुरुम् I
श्रीमद् भगवद्गीता माहात्म्य (भाग २)I

भगवद्गीता जयंती निमित्त विशेष कार्यक्रम 🌹

मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल. विश्वातील लोक भावपूर्ण अंतःकरणाने गीताजयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित अखिल विश्वात गीतेची आगळीवेगळी विशेषता आणि महानता प्रकर्षाने दिसून येते.
प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा मान मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे. गीता म्हणजे सर्व उपनिषदांचे सार आणि सर्व धर्म ग्रंथांचा मुकुट मणी आहे.
हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील,काळातील असो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे.
भगवद्गीता अत्यंत महान, पूजनीय, पवित्र ग्रंथ आहे.
गीता सांगून पाच हजार वर्षे होऊन गेली तरी सर्व काळी सर्व ठिकाणी त्यातील सिध्दांत, विचारांची महती आणि उपयोगीता आजच्या काळात ही आहे. माणसाची शरीर रचना अनादी काळापासून तिच आहे,अंतरंग बदलत चालल आहे.गुणांकडून अवगुणांकडे…चालला आहे.भौतिक समृद्धी वाढली पण माणूसपण हरवलं आहे. गीतेत सर्व जीवांच्या कल्याणाचा, आनंदाचा, मार्ग सांगितला आहे. नराचा नारायण होण्याचे सामर्थ्य गीतेत आहे. गीता म्हणजे भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. कर्म, भक्ती, ज्ञानयोग द्वारा माणसांला परमेश्वर प्राप्ती म्हणजे मनुष्य जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय, शाश्वत सुखाची प्राप्ती होईल.

गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता हा आमचा विश्व धर्मग्रंथ आहे. कर्मवीरांना गीता उत्साह देते. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते. व्याकरणकारांचे हृदय गीतेतील शब्दांचे लालित्य पाहून डोलू लागते. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. अश्या साक्षात्कार प्रदान करणाऱ्या गीतेचे महात्म्य.

🌹सिध्द साधक साधना 🌹

कैसा विश्वाचिया कृपाकरूनि महानंद सोपाअर्जुनव्यानें रूपाआणिला देवें ॥८७॥
तैसें गीतेचे हे दुभतेंवत्स करूनि पार्थातें
दुभीनली जगापुरतेंश्रीकृष्ण गाय ॥९०॥
जे हे श्रवणें पाठें अर्थेगीता नेदी मोक्षाआरौतेंजैसा समथु दाता कोणातेंनास्ति न म्हणे ॥९५॥ … श्री ज्ञानेश्वरी

मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो.
प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा मान मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे. गीता म्हणजे सर्व उपनिषदांचे सार आणि सर्व धर्म ग्रंथांचा मुकुट मणी आहे.
हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील,काळातील असो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे.
भगवद्गीता अत्यंत महान, पूजनीय, पवित्र ग्रंथ आहे.
गीता सांगून पाच हजार वर्षे होऊन गेली तरी सर्व काळी सर्व ठिकाणी त्यातील सिध्दांत, विचारांची महती आणि उपयोगीता आजच्या काळात ही आहे. माणसाची शरीर रचना अनादी काळापासून तिच आहे,अंतरंग बदलत चालल आहे. गुणांकडून अवगुणांकडे…चालला आहे.भौतिक समृद्धी वाढली पण माणूसपण हरवलं आहे. गीतेत सर्व जीवांच्या कल्याणाचा, आनंदाचा, मार्ग सांगितला आहे. नराचा नारायण होण्याचे सामर्थ्य गीतेत आहे. गीता म्हणजे भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. कर्म, भक्ती, ज्ञानयोग द्वारा माणसांला परमेश्वर प्राप्ती म्हणजे मनुष्य जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय, शाश्वत सुखाची प्राप्ती होईल.

I भगवद्गीता आरती I

जय भगवद्गीते, जय भगवद्गीते I
हरि-हिय-कमल विहारिणि सुन्दर सुपुनीते ॥ जय०
कर्म सुमर्म-प्रकाशिनि कामासक्तिहरा।
तत्त्वज्ञान-विकाशिनि विद्या ब्रह्म परा॥ जय०
निश्चल-भक्ति-विधायिनि निर्मल मलहारी।
शरण-रहस्य-प्रदायिनि सब विधि सुखकारी॥ जय०
राग-द्वेष-विदारिणि कारिणि मोद सदा।
भव-भय-हारिणि तारिणि परमानन्दप्रदा।। जय०
आसुर-भाव-विनाशिनि नाशिनि तम-रजनी।
दैवी सद्गुणदायिनि हरि-रसिका सजनी ॥ जय०
समता, त्याग सिखावनि, हरि-मुखकी बानी।
सकल शास्त्रकी स्वामिनि, श्रुतियोंकी रानी॥ जय०
दया-सुधा बरसावनि मातु ! कृपा कीजै।
हरिपद-प्रेम दान कर अपनो कर लीजै॥ जय०

गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता हा आमचा विश्व धर्मग्रंथ आहे. कर्मवीरांना गीता उत्साह देते. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते. व्याकरणकारांचे हृदय गीतेतील शब्दांचे लालित्य पाहून डोलू लागते. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. अश्या साक्षात्कार प्रदान करणाऱ्या गीतेचे महात्म्य दिनांक १३-१४/१२/२१ रोजी आदरणीय डॉ.रजनी पत्की यांच्याबरोबर तसेच भगवत गीता आरती गायन: सौ. मंजिरी काळे यांच्या सुमधुर आवाजात..

गीताजयंती

श्रीमद्भगवतगीतामहात्म्य

🎄🔴🎄

९-१) भगवद्गीतेचे दोन भाष्यकार – ज्ञानदेव व आद्य शंकराचार्य भाग १ –

‘श्रीमद्भगवद्गीता’ हा भारतीय तत्त्वज्ञानात सर्वाधिक मान्यता पावलेला ग्रंथ. ब्रह्मसूत्रे, उपनिषदे व भगवद्गीता ही वैदिक धर्माची प्रस्थानत्रयी आहे. म्हणजे वैदिक धर्माचे तीन प्रमुख ग्रंथ. हजारो वर्षांचा काळ लोटला असला तरी आजही भगवद्गीतेचीची लोकप्रियता अबाधित आहे. भारतातील सर्व भाषांमधे या ग्रंथावर भाष्ये, टीका लिहील्या गेल्या आहेत. असे भाग्य दुसर्‍या कोणत्याही ग्रंथाला मिळालेले नाही.

स्वजनांच्या वधाचे पाप लागेल या भीतीने युद्धापासून पराङ्मुख झालेल्या अर्जुनाला उपदेश करून पुन्हा युद्धोन्मुख करण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे गीता. गीतेचे तात्पर्य काय, त्यात कोणता उपदेश केला आहे, ती नेमकी केव्हा सांगितली, अशा अनेक अंगांनी विद्वानांनी गीतेचे परीक्षण केले आणि आपली विविध मते मांडली. या गीतेच्या अर्थाच्या बाबतीत सुद्धा विद्वानांमधे व टीकाकारांमधे मतभेद दिसून येतात. कोणी गीता कर्मपर मानतात, कोणी ज्ञानयोगपर मानतात, कोणी कर्मसंन्यासपर मानतात तर कोणी भक्तियोगपर मानतात, कोणी गीता अनासक्ती योग शिकवते असं म्हणतात तर कोणी साक्षात्कारदर्शन मानतात. आणि प्रत्येकजण आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ गीतेतील वचनेच प्रस्तुत करतो. अशी मतमतांतरे असण्याचे कारण म्हणजे भगवद्गीतेमधे अनेक परस्पर विरोधी विचार दिसून येतात. वैदिक तत्वज्ञानातील सारे प्रवाह गीतेत अंतर्भूत झालेले आहेत. जीव, जगत् व परमात्मा यांच्या स्वरूपाचे व संबंधाचे ज्ञान करून देणे हा तत्त्वज्ञानाचा प्रांत. पण त्याबद्दलही गीतेत उलट सुलट विचार आलेले आहेत. गीतेने सगुणोपासना स्वीकारली तशीच अव्यक्तोपासना सुद्धा स्वीकारली. विश्वाच्या मूलतत्त्वाचा उलगडा करणारे सांख्य तत्त्वज्ञान, चित्ताचा निरोध करावयास सांगणारा पातंजल योग, स्वधर्मनिष्ठा स्वीकारायला लावणारा कर्मयोग तसेच भक्तियोग, ज्ञानयोग या सर्वांचा समावेश गीतेत आहे. तसेच प्रकृति, पुरुष, क्षर, अक्षर, सत्, असत्, ब्रह्म, माया, भाव, अभाव, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, अधिभूत, अध्यात्म इत्यादी अनेक पारिभाषिक शब्द यात आलेले आहेत. पण त्यांचे नेमके अर्थ गीतेत स्पष्ट केलेले नसल्यामुळे हा ग्रंथ गूढ बनला आहे.

जेव्हा ग्रंथ गूढ बनतो तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट करण्याचे काम टीकाकार अथवा भाष्यकार करत असतात. अर्थातच टीकाकार ज्या प्रवृत्तीचा असतो तीच विचारधारा त्याच्या भाष्यात दिसून येते. त्यामुळे विद्वानांमधे गीतेत नेमके काय सांगितले आहे यावर टोकाचे मतभेद दिसून येतात.

गीतेवर संस्कृत भाषेमधे तर खूप भाष्ये रचली गेली. त्यात श्रीशंकराचार्यंचे अद्वैतपर शांकरभाष्य, श्रीरामानु्जांचे विशिष्टाद्वैतपर भाष्य, श्रीमदानन्दतीर्थांचे द्वैतपर माध्वभाष्य, श्रीमद्वल्लभाचार्यांची शुद्धाद्वैतपर तत्त्वदीपिका, अशी अनेक भाष्ये उपलब्ध आहेत. मराठीमधे ज्ञानदेवांची भावार्थ-दीपिका, वामन पंडितांची यथार्थ-दीपिका या दोन पद्य टीका व लोकमान्य टिळकांचा गद्यात लिहीलेला गीतारहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यातील शंकराचार्यांच्या आधीच्या आचार्यांची गीतेवरील भाष्ये उपलब्ध नसल्यामुळे शंकराचार्य हेच गीतेचे संस्कृतमधील आद्य भाष्यकार ठरतात व ज्ञानदेव हे मराठीतील आद्य भाष्यकार (टीकाकार). (भाष्य व टीका ह्या दोन शास्त्रीय शब्दात थोडा फरक आहे.)

आद्य शंकराचार्यांच्या आधीही भगवद्गीतेवर संस्कृत भाष्ये लिहीली गेली होती. परंतु आचार्यांच्या भाष्यापुढे ती सारी निष्प्रभ झाली. त्यांनी अद्वैत वेदान्ताला एवढी प्रतिष्ठा मिळवून दिली की आजही अद्वैत वेदान्त दर्शन सर्व दर्शनग्रंथात श्रेष्ठ म्हणून ओळखले जाते. आचार्य अद्वैती असूनही त्यांनी अनेक देवतांची इतकी सुंदर स्तोत्रे लिहीली की त्यावरून त्यांच्या अद्वैतमताविषयी शंका यावी. स्वत: संन्यास घेतला पण ३२ वर्षाच्या आयुष्यात एवढे मोठे कार्य केले की खरोखरच त्यांनी कर्मसंन्यासाचा पुरस्कार केला असावा का अशी शंका यावी. आणि ज्ञानदेवांचे तर २१ वर्षाचे आयुष्य. एवढ्या कालावधीत त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी व अभंगगाथा यांची रचना करून संजीवन समाधी घेतली. दोघेही अल्पायुषी. पण दोघांनीही पिढ्यानपिढ्या पुरेल इतके महान कार्य करून ठेवले आहे. असं मानवी सामर्थ्याच्या पलीकडे कार्य करणारे असल्यामुळे दोघांनाही भगवंतांचा अवतार मानण्यात येते. आद्य शंकराचार्य हे शंकराचा अवतार तर ज्ञानदेव हे विष्णूचा अवतार अशी लोकमान्यता आहे.

आता आचर्य शंकर व ज्ञानदेव दोघेही अद्वैती आहेत. ज्ञानदेवांनी आपल्या टीकेत म्हटलेही आहे की आपण हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ‘भाष्यकारांते वाट पुसतु’ लिहीला आहे. याचा अर्थ त्यांनी अनेक भाष्ये आपल्या डोळ्याखालून घातली होती. तेव्हा त्यांनी शंकराचार्यांच्या भाष्याचे अनुसरण केले आहे हे निर्विवाद आहे. त्यामुळे दोघांच्या भाष्यात साम्यस्थळे आहेतच. पण त्याचबरोबर ज्ञानदेवांनी आचार्यांची सर्वच मते मान्य केली आहेत असेही नाही. आपली वेगळी भूमिकाही स्पष्ट केली आहे. तेव्हा दोघांच्याही भाष्यातील साम्यस्थळे कोणती आहेत व फरक कोठे आहे हे दाखवण्याचा या लेखाचा हेतू आहे. ते पहाण्यापूर्वी दोघांचा काळ विचारात घेणे आवश्यक आहे.

काळ –

आद्य शंकराचार्य हे इ.स. ७८८ मधे होऊन गेले. (त्यांच्या कालाविषयी विद्वानांमधे मतभेद आहेत.) ३२ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले होते. तो काळ बौद्ध धर्माच्या प्रसाराचा होता. बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे त्याचा प्रसार फार वेगाने दूरवर झाला. त्यापुढे वैदिक धर्माचा प्रभाव कमी झाला. वैदिक धर्माचे पुनरुत्थान हे आचार्यांचे मुख्य कार्य होते. पुराणांच्या लोकप्रियतेमुळे औपनिषद तत्त्वज्ञान मागे पडले. उपनिषदातील वचने सुद्धा परस्पर विरोध दर्शवणारी होती. तेव्हा हा वर वर दिसणारा विरोध दूर करून त्यांचा समन्वय करणे आवश्यक होते. ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहून हा विरोध दूर करण्याचे कार्य त्यांनी केले.

ज्ञानेश्वर शंकराचार्यांच्यानंतर ४०० वर्षांनी होऊन गेले. त्यांच्या काळी भारतात धार्मिक अनागोंदी माजलेली होती. धर्मपंथीय आंदोलनांना उत आला होता. भारतात तेव्हा नाना धर्मपंथांचा जोर होता. प्रत्येक जण आपापल्या श्रेष्ठत्वाविषयी भांडत होते. तमिळ भाषेतील ‘अळवार’ संत विष्णुभक्तीचा प्रसार करत होते. तर शैव नायनार हे शिवभक्तीचा प्रसार करत होते. शैव, वैष्णव यांच्यामधे तर युद्धे होत असत. बौद्ध, जैन हे पंथही आपापल्या मताचा प्रसार करत होते. शैव, कापालिक, शाक्त, योग या संप्रदायांनी तंत्रमार्गाचा स्वीकार केला होता. नाथपंथीय योगी, जैन व बौद्ध धर्मामधे सुद्धा संन्यासाला अतिरिक्त महत्व प्राप्त झाले होते. भक्तिमार्गामधे सुद्धा मूर्तीपूजेला आत्यंतिक महत्व प्राप्त झाले होते. नाना व्रते, वैकल्ये आचरणे म्हणजे धर्म असा समज रूढ झालेला होता. तेव्हा लोकांना विवेकाने वागण्यास प्रवृत्त करणे आवश्यक झाले होते.

गीताभाष्य लिखाणाचा हेतू –

शंकराचार्य गीताभाष्याच्या उपोद्घातात म्हणतात की ‘अहं विवेकत: अर्थनिर्धार्णार्थं सङ्क्षेपत: विवरणं करिष्यामि’ म्हणजे ‘गीताशास्त्राचा विवेकपूर्वक अर्थनिर्धारण करण्य़ासाठी मी संक्षेपाने विवरण करणार आहे’ त्य़ांच्या मतानुसार वेदोक्त धर्म हा प्रवृत्ति व निवृत्ति असा दोन प्रकारचा आहे. धर्मसंस्थापना करण्यासाठी जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वीतलावर अवतरले त्यावेळी अर्जुनाला त्यांनी दोन्ही प्रकारच्या धर्मांचा उपदेश केला. पुढे ते म्हणतात की कारणासह संसाराची आत्यंतिक निवृत्ति करणे हे गीताशास्त्राचे प्रयोजन आहे आणि ते परमकल्याण सर्वकर्मसंन्यासपूर्वक आत्मज्ञाननिष्ठारूप धर्माने प्राप्त होते. कारण मीमांसकांचे कर्म हे काम्य कर्म होते व काम्य कर्मे केली की त्यामुळे त्याचा फळभोग घ्यावाच लागत असल्यामुळे कर्म तेवढे बंधनकात्रक अशी समजूत रूढ झालेली होती. म्हणून आचार्यांनी मोक्षप्राप्तीकरता सर्वकर्मसंन्यासाचा आग्रह धरलेला होता.

ज्ञानदेव म्हणतात –

‘मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळी’

अविवेकाची काजळी झाडून विवेकदीप प्रज्वलित करण्यासाठी ज्ञानदेवांनी गीताशास्त्रावर भाष्य लिहीले. अर्थातच दोघांचाही हेतू एकच होता विवेक जागृत करण्याचा. पण आचार्यांचा विवेकपूर्वक निश्चित अर्थ सांगण्याचा आहे हेतू आहे तर लोकांमधील विवेकाची उणीव नाहीशी व्हावी म्हणून ज्ञानदेवांनी गीतेवर टीकाग्रंथ लिहीला आहे. धर्माच्या राज्यात पसरलेले अविवेकाचे साम्राज्य दूर करण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध अशा गीताशास्त्रावर टीका लिहीली. त्यांना विवेक त्यांच्या गुरूंनी शिकवला होता. भगवद्गीता म्हणजे ‘आधीचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी’ कार्याकार्याचा विवेक श्रीकृष्णांनी गीतेत अर्जुनाला सांगितला. वेदोपनिषदावर आधारलेल्या भगवद्गीता व विष्णुपुराण या भागवत धर्माच्या प्रधान ग्रंथातील शिकवण हळू हळू बाजूस पडली होती. ज्ञान, भक्ति, कर्म, धर्म याविषयी अयथार्थ कल्पना रूढ झाल्या होत्या. परिणामी अज्ञानाचे व अविवेकाचे वाईट परिणाम समाजामधे दिसू लागले होते. ईश्वराच्या सगुण रूपाला आलेले महत्व, मूर्तीची तांत्रिक पूजा म्हणजे भक्ती अशा कल्पना मान्यता पावल्या होत्या. कर्तव्यप्रधान भक्ती बाजूला पडून वैराग्य-प्रधान भक्तीचा पुरस्कार चालू झाला होता. तीर्थयात्रा, कानामात्रेचा बदल न करता व्रताचरण पार पाडणे म्हणजे धर्म असे मानले जाऊ लागले होते. धर्माच्या राज्यात पसरलेले हे अविवेकाचे साम्राज्य दूर करण्याकरता ज्ञानदेवांनी त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या गीताग्रंथावर टीका लिहून सर्वसामान्यांना विवेक शिकवणे हा ज्ञानदेवांचा गीतेवर टीका लिहीण्याचा प्रधान हेतू होता.

फिटो विवेकाची वाणी । हो कानामनाची जिणी ।
देखो आवडे तो खाणी । ब्रह्मविद्येची । ।१३-११६१ । ।

लोकांमधील विवेक जागृत तर व्हावाच पण त्यांना ब्रह्मविद्येची खाण दिसावी, हे ज्ञानदेवांच्या भाष्य़ाचे प्रयोजन आहे.

सौ. मनीषा अभ्यंकर.

वाङ्मयी भगवन्मूर्ती भगवती श्री गीता

आज मोक्षदा एकादशी, भगवती श्रीगीता जयंती !!
परिपूर्ण परब्रह्म भगवान श्रीकृष्णांनी भक्तराज अर्जुनाच्या मोहाचे निराकरण करण्यासाठी जो परमामृतमय उपदेश केला तोच भगवती श्री गीता होय ! श्री गीतेला आजवरच्या सर्व आचार्यांनी, महात्म्यांनी व संतांनी परमश्रेष्ठ मानून गौरविलेले आहे. भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली तर श्री ज्ञानेश्वरीत ठायी ठायी गीतेची अलौकिक स्तुती करतात ; आणि तेच यथार्थही आहे.
गीता गीता गीता असे नुसते तीनदा जरी म्हटले तरी त्या जीवावर भगवत्कृपा होते, असे श्री नामदेवरायांनी आपल्या अभंगात म्हटलेले आहे. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत की, “गीता गीता गीता असे सलग म्हटले की ‘त्याग त्याग त्याग’ असे त्यातून ध्वनित होते व तोच गीतेचा खरा अर्थ आहे !” पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी आपल्या सांप्रदायिकांना घालून दिलेल्या दैनंदिन उपासनेत श्री गीतेचा आवर्जून समावेश केलेला आहे. खरोखर श्री गीतेचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे !


श्रीभगवंतांनी गीतेद्वारे विविध मार्ग सुचवून मोक्षाची साधनेच आपल्यासमोर ठेवलेली आहेत, ज्याला जो रुचेल, पचेल, त्याने तो मार्ग अवलंबावा व मोक्षाप्रत जावे. म्हणूनच भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचे साक्षात् वाङ्मयरूप, शब्दरूप असलेल्या भगवती श्री गीतेचे अनुसंधान, चिंतन-मनन, पठण, पूजन, प्रदक्षिणा, लेखन, सेवन अशा विविध प्रकारे आपण दररोज मनोभावे सेवा केली पाहिजे. यातच आपले शाश्वत हित आहे.
चतुर्थ श्रीदत्तावतार सकलमत-संस्थापक प.पू.सद्गुरु श्री माणिकप्रभू महाराजांनी आजच्याच पावन तिथीला हुमणाबाद येथे समाधी घेतली. श्रीसंत माणिकप्रभू महाराजांचा जन्म श्रीदत्तजयंतीचा आणि त्यांनी जिवंत समाधी मोक्षदा एकादशीला घेतली. श्रीसंत माणिकप्रभू महाराजांच्या सर्व रचना अतिशय प्रासादिक व भगवद्भक्तीचा परमोच्च आदर्श सांगणाऱ्या आहेत. या श्रीदत्तप्रभूंच्या अवताराने गोपीभावात राहून अनन्य श्रीकृष्णभक्ती प्रकट केली. त्यांचे चरित्रही फार विलक्षण आहे. त्यांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींनी अतिशय सुंदर शब्दांत वर्णिलेला श्री गीता महिमा खालील लिंकवरील लेखात थोडक्यात मांडलेला आहे. कृपया त्याचे वाचन-मनन करून श्रीभगवंतांचे शब्दमय स्वरूप असणाऱ्या भगवती श्री गीतेस मनोभावे दंडवत घालून, आजच्या पुण्यपावन दिनापासून जसे जमेल तसे पण निर्धाराने, न चुकता श्री गीता पठण व चिंतन करण्याचा आपण सर्वांनी निर्धार करू या !
गीता जाणा वाङ्मयी श्रीमूर्ति प्रभूची
कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती ।
मोहमहिषा मुक्ती । आनंदली असे ॥
म्हणौनि मनें कायें वाचा । जो सेवक होईल इयेचा ।
तो स्वानंदसाम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥

**गीताजयंती आणि मोक्षदा एकादशी :- **

**मंगळवार, १४ डिसेंबर २०२१ मार्गशीर्ष शुद्ध एकादशी **

मोक्षदा एकादशीचा शुभमुहूर्त, पूजाविधी आणि महत्व:

मार्गशीर्ष महिन्यात मंगळवार, १४ डिसेंबर २०२१ रोजी मोक्षदा एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवसाचे महत्व खुद्द श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते. यासोबतच याच दिवशी गीताजयंतीही येत आहे. असे म्हटले जाते की या दिवशी भगवतगीतेचा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिला होता.

एका वर्षात २४ वेळा एकादशी येते, याचा अर्थ एका महिन्यात दोन वेळा एकादशी येते. दर महिन्यात दोन पक्ष असतात, कृष्णपक्ष आणि शुक्लपक्ष. दोन्ही पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरा केला जातो. हिंदू मान्यतांनुसार मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा महिना मानला जातो.

मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी कुरुक्षेत्र रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो.

**मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पापमुक्ती होते **

असे म्हटले जाते की जे भक्त मोक्षदा एकादशीच्या दिवशी व्रत करतात ते आपल्या अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळवतात. सोबतच त्यांच्या पितरांनाही मोक्षप्राप्ती होते. हा दिवस मोक्षदायी असतो, त्यामुळेच या दिवसाला मोक्षदा एकादशी म्हटले जाते. हा लेख वाचा आणि मोक्षदा एकादशीबद्दल सर्व गरजेच्या गोष्टी जाणून घ्या.

**मोक्षदा एकादशी तारीख आणि वेळ **

मार्गशीर्ष शुक्ल एकदशी तिथी प्रारंभ, दिवस सोमवार 13 डिसेंबर 2021 रात्री 9.32 मिनिटापासून सुरु होत आहे आणि मंगळवार 14 डिसेंबर 2021 रात्री 11.35 मिनिटावर एकदाशी तिथी संपेल.

*व्रत पारण

**भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने मंगळवार, १४ डिसेंबर २०२१ रोजी मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाईल **

**कायआहे या दिवसाचे महत्व? **

मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या कृष्णअवताराची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि पितरांनाही मोक्षप्राप्ती होते. या एकादशीच्या दिवशीच भगवान कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीतेचा उपदेश दिला होता. त्यामुळे याचदिवशी गीताजयंतीही साजरी केली जाते. भगवान कृष्णाची पूजा करणाऱ्या भक्तांना सुख आणि समृद्धी मिळते आणि त्यांच्या दुःखांचे निवारण होते.

भगवान कृष्णाने सांगितले होते या दिवसाचे महत्व.

धर्मराज युधिष्ठिराला मोक्षदा एकादशीचे महत्व सांगताना कृष्णाने म्हटले होते की हा दिवस अतिशय विशेष आहे. जो माणूस परमात्म्याला भेटू इच्छितो त्याच्यासाठी मोक्ष हा एकच मार्ग आहे. त्यासाठी मोक्षदा एकादशीचे व्रत करावे. यामुळे जन्मजन्मांतरीची पापे धुतली जातात.

प्रत्येक हिंदूला “श्रीमद् भगवतगीते”च्या बाबतीत सर्व माहिती असायलाच हवी.

१). कुणी कुणाला सांगितली..???
उ.- श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितली.

२). कधी सांगितली ???
उ.- आज पासून ७ हजार वर्षा पूर्वी सांगितली

३). ईश्वरांनी कोणत्या दिवशी गीता सांगितली..???
उ.- रविवार च्या दिवशी…

४). कोणत्या तिथि ला ???
उ.- एकादशी

५). कुठे सांगितली…???
उ.- कुरुक्षेत्रच्या रणभूमि वर…

६). किती वेळा मध्ये सांगितली..???
उ.- ४५ मिनीटे..

७). का सांगितली…???
उ.- कर्तव्या पासून भरकटलेल्या अर्जुनाला कर्तव्य शिकवण्यासाठी आणि पुढ्या येणाऱ्या पिढ्यांना धर्म, ज्ञान आणि कर्तव्य कर्म शिकवण्यासाठी.. !!!

८). किती अध्याय आहेत?
उ.- एकूण १८ अध्याय.. !!!

९). किती श्लोक आहेत?
उ.- ७०० श्लोक

१०). गीता मध्ये काय काय सांगितलेले आहे..?
उ.- कर्मयोग-भक्तियोग- ज्ञानयोग या मार्गांची विस्तृत व्याख्या केली आहे..,
ह्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती निश्चितपणे उच्चपदस्थ होतात..

११). गीतेला अर्जुना शिवाय अजून कोणी कोणी ऐकलेले आहे.. ???
उ.- धृतराष्ट्र आणि संजय ने..

१२). अर्जुनाच्या आधी गीतेचे पावन ज्ञान कुणाला मिळाले होते.. ???
उ.- भगवान सूर्यदेवला..

१३). गीतेची माहिती कोणत्या धर्म-ग्रंथ मध्ये आहे.. ???
उ.- उपनिषदां मध्ये..

१४). गीता कोणत्या महाग्रंथाचा भाग आहे ???
उ.- गीता महाभारताचा एक अध्याय शांति-पर्व याचा एक हिस्सा आहे…

१५). गीतेचे दूसरे नाव काय आहे…???
उ.- गीतोपनिषद

१६). गीतेचे सार काय आहे.. ???
उ.- प्रभु श्रीकृष्ण यांना शरण जाणे..

१७). गीते मध्ये कोणी किती श्लोक सांगितले आहेत ???
उ.- श्रीकृष्ण यांनीे- ५७४
अर्जुनाने- ८५
धृतराष्ट्रने- १
संजयने- ४०
एकूण = ७००

अर्धवट ज्ञान योग्य ठरत नाही…

३३ करोड नाही.. ३३ कोटि (प्रकारच्या) देवी देवता आहेत हिँदू धर्मा मध्ये….

कोटि = म्हणजे प्रकार ।।

देवभाषा संस्कृत मध्ये कोटि चेे दोन अर्थ होतात..

कोटि चा एक अर्थ म्हणजे प्रकार होय आणि दुसरा अर्थशास्राचा अर्थ करोड हा ही होतो…

आपल्या हिंदू धर्माचा दुष्प्रचार करण्यासाठी असा बनाव केला गेला की, हिंदूंच्या ३३ करोड देवी देवता आहेत… आणि आज आपण पण हेच बोलतो की, आमचे ३३ करोड देवी देवता आहेत…

एकूण ३३ प्रकारचे देवी देवता आहेत हिँदू धर्मा मध्येे :-

१२ प्रकारचे आहेत आदित्य.,
आदित्य, धाता, मित, आर्यमा, शक्रा, वरुण, अँश, विवास्वान, पूष, सविता, तवास्था, आणि विष्णु…!

८ प्रकारचे आहेत वसु :-
धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभाष।

११ प्रकारचे आहेत रुद्र :-
हर, बहुरुप, त्र्यंबक,
अपराजिता, बृषाकापि, शँभू, कपार्दी, रेवात, मृगव्याध, शर्वा, आणि कपाली।

आणि
अजून २ प्रकार आहेत अश्विनी आणि कुमार.. ।।

एकूण :- १२+८+११+२= ३३ कोटी

एक हिंदू या नात्याने आपला
धर्म ग्रंथ श्रीमद् भगवत गीता जो साक्षात भगवान कृष्णांनी सांगितलेला आहे याची माहिती आपणा सर्वांना कळावी, म्हणून ही पोस्ट लिहिली, आवडल्यास पुढे नक्की अग्रेषित करावी आणि आयुष्यात एकदा तरी गीता वाचावी.

उद्या गीता जयंती आहे व त्यामुळे सादर.

हरे कृष्ण.
आपला दास

डॉ सावंत व्ही जी उर्फ वामन प्रपन्न दास पुणे.
९९२२५०१११५

” श्रीमद भगवद्गीता जयंती “
१४ डिसेंबर रोजी आहे.

श्रीमद भगवद्गीता हा जगातील सर्वोत्तम ग्रंथ का मानला जातो?

गीतेमध्ये इतके उत्कृष्ट आणि सर्वसमावेशक ज्ञान आहे की तिच्या निर्मितीला हजारो वर्षे उलटून गेली आहेत, परंतु त्यानंतर त्याच्यासारखा दुसरा ग्रंथ रचला गेला नाही.
18 अध्याय आणि
700 श्लोकांमध्ये रचलेला आणि भक्ती, ज्ञान, योग आणि नि:स्वार्थ इत्यादींनी परिपूर्ण, ही गीता जगातील एकमेव ग्रंथ आहे ज्याची जयंती साजरी केली जाते.

श्रीमद्भगवद्गीतेने कोणत्याही धर्माची, पंथाची स्तुती किंवा निंदा केलेली नाही, तर मानवाच्या प्रगतीबद्दल सांगितले आहे. गीता जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुधारण्याची आणि युद्धासारख्या घृणास्पद कृत्यांमध्येही अलिप्त राहण्याची कला शिकवते. मृत्यूनंतर नाही, गीता देते जिवंतपणी मोक्षाची चव!

‘गीते’मध्ये 18 अध्याय, 700 श्लोक, 94569 शब्द आहेत. जगातील ५७८ हून अधिक भाषांमध्ये गीतेचे भाषांतर झाले आहे.

‘हे माझे हृदय आहे’ – हे जर देवाने कोणत्याही ग्रंथासाठी सांगितले असेल तर ते गीतेसाठी आहे. ‘गीतेतील हृदयम् पार्थ. – गीता माझे हृदय आहे.’

गीतेने चमत्कार केले – धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे… युद्धभूमीलाही धर्मक्षेत्र बनवले. गीतेने रणांगणात योग प्रकट केला. हत्ती किलबिलाट करत आहेत, घोडे ओरडत आहेत, दोन्ही सैन्यांचे योद्धे सूडाच्या आगीत जळत आहेत. अशा वेळी भगवान श्रीकृष्ण ,
धैर्य गमावलेल्या , अविश्वासाने उदास बसून असणाऱ्या अर्जुनाला ज्ञानाचा उपदेश करीत आहेत.

महाभारतातील गीतेचे वर्णन केल्यानंतर श्री वेद व्यासांनी म्हटले आहे:

गीता सुगीता कर्तव्य किमन्याह शास्त्रविस्त्रैह।
किंवा स्व पद्मनाभस्य मुखपद्मद्विनिश्रीता।

“गीता सुगीता हे करणे योग्य आहे, म्हणजे श्री गीता नीट वाचणे आणि अर्थ आणि भावनेने ती विवेकात आत्मसात करणे हेच मुख्य कर्तव्य आहे, जे स्वतः श्री पद्मनाभ विष्णूंच्या मुखातून निघाले आहे, मग इतर शास्त्रां चे प्रयोजन काय? विस्तार करण्याचे कारणच काय.?’

गीता सर्वज्ञ आहे. गीता सर्व शास्त्रांच्या साराने भरलेली आहे. याला सर्व धर्मग्रंथांचा खजिना म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. गीतेचे चांगले ज्ञान घेतल्याने, सर्व शास्त्रांचे आवश्यक ज्ञान आपोआप प्राप्त होऊ शकते. त्यासाठी वेगळे काम करण्याची गरज नाही.

वराह पुराणात गीतेचा महिमा सांगताना भगवंताने स्वतः म्हटले आहे की.

गीताश्रयेऽह तिष्ठामि छोटा गृहम् गीता।
गीताज्ञानमुपाश्रित्यत्रिलोकनपलयम्यहम्।

*’मी गीतेच्या आश्रयाने राहतो. गीता हे माझे उत्तम घर आहे. गीतेच्या ज्ञानाच्या सहाय्यानेच मी तिन्ही लोक सांभाळतो.

श्रीमद्भगवद्गीता ही केवळ कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी किंवा जातीसाठी किंवा व्यक्तीसाठीच नव्हे तर मानवजातीसाठीही उपयुक्त आणि हितकारक आहे. माणूस कोणत्याही देशाचा, वेशभूषेचा, समुदायाचा, पंथाचा, जातीचा, वर्णाचा, आश्रमाचा असला तरी त्याचे थोडेसे नियमित वाचन केल्यास त्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू लागतात.

श्रीमद्भगवद्गीतेचे ज्ञान प्यायल्याने माणसाच्या जीवनात धैर्य, साधेपणा, स्नेह, शांती आणि धर्म इत्यादी दैवी गुण सहज विकसित होतात. अन्याय, अन्याय, शोषण यांच्याशी लढण्याची क्षमता येते. हा गीता ग्रंथ संपूर्ण जगात अद्वितीय आहे, जो आनंद आणि मोक्ष दोन्ही प्रदान करतो, निर्भयता इत्यादी दैवी गुण विकसित करतो.

भौतिकदृष्ट्या स्वर्गात जाऊन शस्त्रे आणण्याची क्षमता असलेला अर्जुनही गीतेच्या अमृतविना अतार्किकतेने घेरला होता. गीता मातेने अर्जुनाला बलवान केले. गीता माता अहिंसक लोकांवर हल्ला करत नाही आणि हिंसक लोकांसमोर आपल्याला डरपोक होऊ देत नाही.

देहं मनुष्माश्रित्य चातुर्वर्ण्ये तू भरते।
न शृणोति पठत्येव तममृतस्वरूपिणीम्।
हस्तत्त्यक्तं मृत्युम् प्राप्त क्षतक्षवेदम् सम्नुते.
पित्वा गीतामृतम् लोके लब्ध्वा मोक्षम् सुखी भवेत्।

भरतखंडात चार वर्णांत मनुष्य देह प्राप्त करूनही जो अमृतरूपात गीता वाचत नाही किंवा ऐकत नाही, तो हातातील अमृत सोडून दुःखाने विष खातो. पण जो माणूस गीता श्रवण करतो आणि वाचतो, तो या जगात गीतेचे अमृत प्यायल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि आनंद होतो.

गीता आरती

भगवद्गीता संहिता पारायण १८ अध्याय

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

19 Comments

  1. […] गीता महात्म्य    नमन   पहिला    दुसरा    तिसरा    चवथा    पांचवा    सहावा    सातवा    आठवा    नववा    दहावा    अकरावा    बारावा    तेरावा    चौदावा    पंधरावा    सोळवा    सतरावा    अठरावा    विष्णुसहस्रनाम    आरती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *