श्रीराम प्रभुचा पाळणा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🌸श्री रामाचा पारंपरिक पाळणा🌸

बाळा जो जो रे, कुलभुषणा l दशरथनंदना ll
निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा ll धृ ll
बाळा जो जो रे….
पाळणा लांबविला अयोध्येसी l दशरथाचे वंशी ll
पुत्र जन्माला ऋषीकेशी l कौशल्येचे कुशी ll १ ll
बाळा जो जो रे….
रत्नजडित पालख l झळके अलौकिक l
वरती पहुडले कुलदीपक l त्रिभुवननायक ll २ ll
बाळा जो जो रे….


हलवी कौशल्या सुंदरी l धरुनी ज्ञानदोरी ll
पुष्पे वर्षिली सुरूवरी l गर्जती जयजयकारी ll ३ ll
बाळा जो जो रे….
विश्वव्यापका रघुराया l निद्रा करी बा सखयां ll
तुजवर कुरवंडी करुनिया l सांडीन आपुली काया ll ४ ll
बाळा जो जो रे….


येऊनी वसिष्ठ सत्वर | सांगे जन्मांतर |
राम परब्रह्म साचार l सातवा अवतार ll५ ll
बाळा जो जो रे….
याग रक्षुनिया अवधारा l मारुनी रजनीचरा ll
जाईल सीतेच्या स्वयंवरा l उध्दरी गौतमदारा ll६ ll
बाळा जो जो रे….


परिणिल जानकी स्वरूपा l भंगुनिया शिवचापा ll
रावण लज्जित महाकोपा l नव्हे पण हा सोपा ll७ ll
बाळा जो जो रे….
सिंधुजलडोही अवलीळा l नामे तरतिल शिला ll
त्यांवरी उतरुनि दयाळां l नेईल वानरमेळा ll८ ll
बाळा जो जो रे….


समुळ मर्दूनी रावण l स्थापिल बिभीषण ll
देव सोडवील संपूर्ण आनंदेल त्रिभुवन ll९ ll
बाळा जो जो रे….
राम भावाचा भुकेला l भक्ताधीन झाला l
दास विठ्ठले ऐकिला l पाळणा गाईला ll१० ll
बाळा जो जो रे….बाळा जो जो रे….बाळा जो जो रे…….

धन्यवाद.….

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *