बाळक्रीडा अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

बाळक्रीडा अभंग
टीप: बाळक्रीडेच्या सर्व अभंगांना धृपद हे एकच आहे,

माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ।
ऐसें देईं प्रेम काहीं कळा ॥धृ॥

  1. देवा आदिदेवा जगत्रयजीवा
  2. मनोरथ जैसे गोकुळींच्या
  3. चिंता ते पळाली गोकुळा
  4. त्यांच्या पूर्वपुण्या कोण
  5. शिळा स्फटिकची न पालटे
  6. चारी वेद ज्याची कीर्ती
  7. चाड अनन्याची धरी
  8. वैकुंठीच्या लोकां दुर्लभ
  9. वर्म दावी सोपें भाविका
  10. भक्तजना दिलें निजसुख
  11. मनें हरिरूपी गुंतल्या
  12. जगाचा हा बाप दाखविलें
  13. ओळखी तयांसी होय एका
  14. नेणतीयांसाठीं नेणता
  15. कृष्ण हा परिचारी
  16. तुका म्हणे पुन्हा
  17. गोविंद भ्रतार गोविंद
  18. लीळाविग्रही तो
  19. जियेवेळीं चोरूनियां
  20. कुंभपाक लागे तयासि
  21. संचित उत्तम भूमि
  22. तुका म्हणे सुख घेतलें
  23. तयांसवें करी काला
  24. केला पुढे हरि
  25. जाय फाकोनियां निवडोनी
  26. संयोग सकळां असे
  27. भक्तीसाठीं करी यशोदेसी
  28. नारायण भूतीं न कळे
  29. भाव दावी शुध्द
  30. काय आम्हां चाळविसी
  31. नाहीं त्याची शंका
  32. खेळीमेळी आले घरा
  33. काय आतां यासि
  34. आपुलाल्यापरी
  35. मुखे सांगे त्यांसी
  36. नेदी कळो केल्याविण
  37. गोपाळां उभडु नावरे
  38. पाषाण फुटती तें
  39. तीर देखोनियां
  40. भावनेच्या मुळें
  41. आला त्यांचा भाव
  42. काळयाचे मागे चेंडु

बाळक्रीडा एकूण अभंग १०१

टीप:- बाळक्रीडेच्या सर्व १०१ अभंगाला
“माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ।
ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥”
हे द्रुपद म्हणावे, तसा वारकरी संप्रदायातील पूर्वापार दंडक आहे.

बाळक्रीडा अभंग १
॥६६६८॥
देवा आदिदेवा जगत्रयजीवा । परियेसी केशवा विनंती माझी ॥१॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥
कळा तुजपाशीं आमुचें जीवन । उचित करुन देई आह्मां ॥३॥
आह्मां शरणागतां तुझाचि आधार । तूं तंव सागर कृपासिंधु ॥४॥
सिंधु पायवाट होय तुझ्या नामें । जाळी महाकर्मे दुस्तरें तीं ॥५॥
तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥६॥
सेविलिया रामकृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥७॥
संसार तें काय तॄणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रें ॥८॥
क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥
करीं ब्रीद साच आपलें आपण । पतितपावन दीनानाथ ॥१०॥
नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तीं चा मनोरथ ॥११॥
चित्तीं जें धरावें तुका ह्मणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥१२॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग २
॥६६६९॥
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥
रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥
सीण झाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥३॥
दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥
पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥
गर्भासी तयांच्या आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप ॥६॥
आपेंआप बेडया तुटल्या शृंखला । बंदाच्या आर्गळा किलिया कोंडे ॥७॥
कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष नलगतां ॥८॥
न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥९॥
नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं झाला गोवा सवें देव ॥१०॥
सवें देव तया आड नये कांहीं । तुका ह्मणे नाहीं भय चिंता ॥११॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ३
॥६६७०॥
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥
देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥
आलें अविनाश धरुनी आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥
करावया भक्तजनाचें पाळण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥
गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥५॥
घरोघरी झाला लक्षुमीचा वास । दैन्यदारिद्र्यास त्रास आला ॥६॥
आला नारायण तयांच्या अंतरा । केलियावांचून जपतपें ॥८॥
जपतपें काय करावीं साधनें । जंव नारायणें कृपा केली ॥९॥
केलीं नारायणें आपुली अंकित । तोचि त्यांचे हित सर्व जाणे ॥१०॥
सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणिक दुसरा नाहीं नाहीं ॥११॥
नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥१२॥
याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका ह्मणे आस त्यजूनियां ॥१३॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ४
॥६६७१॥
यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिहीं तो मुरारी खेळविला ॥१॥
खेळविला जिहीं अंतर्बाह्यमुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥२॥
दिलें त्यांसी मुख अंतरींचें देवें । जिद्दी एका भावे जाणितला ॥३॥
जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥४॥
ज्याचें कृष्णीं तन मन झालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥
विष तयां झालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥६॥
एकांतीं त्या जाती हरीसी घेऊनी । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥
वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणे इच्छाभोग ॥८॥
भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासी । तुका ह्मणे जैसी स्फटिकशिळा ॥९॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ५
॥६६७२॥
शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाऊनियां छंदें जैसी तैसी ॥१॥
जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥
फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥
मायबापा सोडविलें बंदीहूनी । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥
दिक नाहीं देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥
मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥
पाप कोठें राहे हरी आठवितां । भक्ति द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥
साक्षी तयापाशीं पूर्वील कर्माच्या । बांधला सेवेच्या ऋणें देव ॥८॥
देव भोळा धांवें भक्ता पाठोपाठी । उच्चारितां कंठीं मागें मागें ॥९॥
मानाचा कंटाळा तुका ह्मणे त्यासी । धांवे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ६
॥६६७३॥
चारी वेद ज्याची कीर्ति वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥
गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥
तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनी शिरे माजी ॥३॥
माजी शिरोनियां नवनीत खाय । कवाड तें आहे जैसें तैसें ॥४॥
जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारीं । ह्मणऊनि चोरी न सांपडे ॥५॥
न सांपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥
वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनी ॥७॥
निवांत राहिल्या नि:संग होऊनी । निश्चळ ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥८॥
न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥
भाविकां तयांसी येतो काकुलती । शाहाण्या मरती न सांपडे ॥१०॥
नलगे वेचावीं टोली धनानांवें । तुका ह्मणे भावें चाड ऐका ॥११॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ७
॥६६७४॥
चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंक ॥१॥
रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरीं नाहीं म्हूण ॥२॥
न सांपडे इंद्रचंद्र ब्रह्मादिकां । अभिमानें एका तिळमात्रें ॥३॥
तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥
भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥
दुष्ट अभक्त जे निष्ठुर मानसीं । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥
यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजले जे ॥७॥
जे नाहीं भजले एका भावें हरी । तयां दंड करी यमधर्म ॥८॥
यमधर्म म्हणे तया दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥९॥
चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हां कान डोळे मुख ॥१०॥
कान डोळे मुख संतांची संगति । न धाराच चित्तीं सांगितलें ॥११॥
सांगितलें संतीं तुम्हां उगवूनी । गर्भासी येऊनी यमदंड ॥१२॥
दंडूं आह्मीं रागें ह्मणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥
दुर्जनाचा येणें करुनी संहार । पूर्वअवतार रामकृष्ण ॥१४॥
रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका ह्मणे घर वैकुंठीं त्यां ॥१५॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ८
॥६६७५॥
वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥१॥
समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चित्तवित्त समर्पिलें ॥२॥
समर्थे तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥
रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाई चारी ॥४॥
गाई चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळी ते ॥५॥
काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या ह्मैसी गाई पशू ॥६॥
सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका धणीवरी ॥७॥
धणीवरी त्यांसीं सांगितली माती । जयाचें जें आर्त तयापरी ॥८॥
परी यांचे तुह्मी आइका नवल । दुर्गमे जो खोल साधनासी ॥९॥
शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवेंचि तो ॥१०॥
तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हांसतसे ॥११॥
हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥१२॥
तो जें जें करिल तें दिसे उत्तम । तुका ह्मणे वरं दावी सोपें ॥१३॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ९
॥६६७६॥
वर्म दावी सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥
मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥
मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरी स्नान तेणें ॥३॥
वस्त्रें घोंगडिया घालूनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥
तिहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना बळतियां ॥५॥
त्यांच्या वचनाचीं पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥६॥
त्यांचिये मुखींचे हिरोनियां घ्यावें । उच्छिष्ट तें खावें धणीवरी ॥७॥
वरी माथां गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥८॥
छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलों ॥९॥
विसरलीं वरी देहाची भावना । तेचि नारायणा सर्वपूजा ॥१०॥
पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥११॥
ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका ह्मणे संगें भक्तांचिया ॥१२॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग १०
॥६६७७॥
भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥
आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरि ऋणी ॥२॥
रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आपण क्रिया करी ॥३॥
क्रिया करी तुह्मां न वजे पासूनी । अवघिया जणी गोपिकांसी ॥४॥
गोपिकांसी ह्मणे वैकुंठींचा पति । तुह्मी माझ्या चित्तीं सर्वभावें ॥५॥
भाव जैसा माझ्या ठायीं तुह्मी धरा । तैसाचि मी खरा तुह्मांलागीं ॥६॥
तुह्मां कळों द्या हा माझा साच भाव । तुमचाचि जीव तुह्मां ग्वाही ॥७॥
ग्वाही तुह्मां आह्मां असे नारायण । आपलीच आण वाहतसे ॥८॥
सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभवें रसा आणूनियां ॥९॥
यांसी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें हें ठावें नाहीं एकी ॥१०॥
एकी क्रिया नाहीं अवघियांचा भाव । पृथक हा देव घेतो तैसें ॥११॥
तैसें कळों नेदी जो मी कोठें नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥१२॥
जैसा मनोरथ जये चित्तीं काम । तैसा मेघश्याम पुरवितो ॥१३॥
पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥
गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्यांचे चित्तीं ॥१५॥
चित्तें ही चोरुनी घेतलीं सकळा । आवडी गोपाळांवरी तयां ॥१६॥
तयांसी आवडे वैकुंठनायक । गेलीं सकळींक विसरोनी ॥१७॥
निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाहीं या देहाची शुद्धि कोणा ॥१८॥
कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव ह्मणुनी तया चुंबन देती ॥१९॥
देती या टाकून भ्रतारासी घरीं । लाज ते अंतरीं आधीच ना ॥२०॥
नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका ह्मणे वाचा काया मनें ॥२१॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ११
॥६६७८॥
मनें हरिरुपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥
यांच्या भ्रतारांचीं धरुनियां रुपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरि एकां लेंक ॥३॥
एक भाव नाहीं सकळांच्या चित्तीं । ह्मणऊनि प्रीति तैसें रुप ॥४॥
रुप याचें आहे अवघेंचि एक । परि कवतुक दाखविलें ॥५॥
लेंकरुं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥६॥
कवतुक केलें सोंग बहुरुप । तुका ह्मणे बाप जगाचा हा ॥७॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग १२
॥६६७९॥
जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥१॥
मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥२॥
देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तियेपुढें ॥३॥
पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंत ॥४॥
मायावंत विश्वरुप काय जाणे । माझें माझें ह्मणे बाळ देवा ॥५॥
बाळपणीं रिठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥
गळां बांधवूनी उखळासीं दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥७॥
न कळे जुनात जगाचा जीवन । घातलें मोहन गौळियांसी ॥८॥
सिंकीं उतरुनी खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥
तरीं दुधें डेरे भरले रांजण । खाय ते भरुन दावी दुणी ॥१०॥
दूणी झालें त्याचा मानिती संतोष । दुभत्याची आस धरुनियां ॥११॥
आशाबद्धा देव असोनी जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥१२॥
मुळें याच देव न कळे तयासी । चित्त आशापाशीं गोवियेलें ॥१३॥
लेकरुं आमुचें ह्मणे दसवंती । नंदाचिये चित्तीं तोचि भाव ॥१४॥
भाव जाणावया चरित्र दाखवी । घुसळितां रवि डेरियांत ॥१५॥
डेरियांत लोणी खादलें रिघोनी । पाहे तों जननी हातीं लागे ॥१६॥
हातीं धरुनियां काढिला बाहेरी । देखोनियां करी चोज त्यासी ॥१७॥
सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥१८॥
यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यासी ॥१९॥
त्यांसी मायामोहजाळ घाली फांसा । देव आपणसा कळों नेदी ॥२०॥
नेदी भाव राहों लोभिकांचे चित्तीं । जाणतांचि होती अंधळीं तीं ॥२१॥
अंधळीं तीं तुका ह्मणे संवसारीं । जिहीं नाहीं हरि ओळखिला ॥२२॥
|माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग १३
॥६६८०॥
ओळखी तयांसी होय एकाभावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥
न पविजे कदा उन्मत्त झालिया । दंभ तोचि वांया नागवण ॥२॥
वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग ॥३॥
व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौळियांचीं ॥४॥
यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥५॥
होतें तें द्यावया आला नारायण । मायबापा रीण गौळियांचे ॥६॥
गौळियांचे सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रह्मादिकां तुका ह्मणे ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग १४
॥६६८१॥
नेणतियांसाठी नेणता लहान । थिंकोनी भोजन मागे माये ॥१॥
माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयांवरी ॥२॥
तयांवरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥
घेऊनियां एके ठायीं अवतार । एकी केला थोर वाढवूनी ॥४॥
उणा पुरां यासी नाहीं कोणी ठाव । सारिखाचि देव अवघियांसी ॥५॥
यांसी दोनी ठाव सारिखें अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥
वाढला तो सेवा भक्तिचिया गुणें । उपचारमिष्टानें करुनियां ॥७॥
करुनी सायास मेळविलें धन । तेंही कृष्णार्पण केलें तिहीं ॥८॥
कृष्णासी सकळ गाई घोडे ह्मैसी । समर्पिल्या दासी जिवें भावें ॥९॥
जीवें भावें त्याची करितील सेवा न विसंबती नांवा क्षणभरी ॥१०॥
क्षणभरी होतां वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥
त्यांचे ध्यानीं मनीं सर्वभावें हरि । देह काम करी चित्त त्यापें ॥१२॥
त्याचेंचि चिंतन कृष्ण कोठे गेला । कृष्ण हा जेविला नाहीं कृष्ण ॥१३॥
कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयिरा भेटों कृष्णा ॥१४॥
कृष्ण गातां ओंव्या दळणीं कांडणीं । कृष्ण हा भोजनीं पाचारिती ॥१५॥
कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । कृष्ण देखे स्वप्नीं कृष्णरुप ॥१६॥
कृष्ण त्यांस दिसे अभास दुश्चितां । धन्य मातापिता तुका ह्मणे ॥१७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग १५
॥६६८२॥
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी ह्मणे ॥१॥
ह्मणे कृष्णाविण कैसें तुह्मां गमे । विळ हा करमे वायांविण ॥२॥
वांयांविण तुह्मी पिटितां चावटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥
क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥४॥
याचें सुख तुह्मां कळलियावरी । मग दारोदारीं न फिराल ॥५॥
लटिकें हें तुह्मां वाटेल खेळणें । एका कृष्णेविना अवघेचि ॥६॥
अवघ्यांचा तुह्मी टाकाल सांगात । घेऊनी अनंत जाल राना ॥७॥
नावडे तुम्हांस आणीक बोलिलें । मग हें लागलें हरि ध्यान ॥८॥
न करा हा मग या जिवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥९॥
आणिकां ही तुह्मां येती काकुलती । जवळी इच्छितीं क्षण बैसों ॥१०॥
बैसों चला पाहों गोपाळाचें मुख । एकी एक सुख सांगतील ॥११॥
सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव त्या धरिती चित्तीं बाळा ॥१२॥
बाळा एकी घरा घेऊनियां जाती । नाहीं त्या परती तुका ह्मणे ॥१३॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग १६
॥६६८३॥
तुका ह्मणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥
दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥
याच्या मुखें नये डोळ्यासी वीट । राहिले हे नीट तटस्थचि ॥३॥
ताटास्थ राहिलें सकळ शरीर । इंद्रियें व्यापार विसरलीं ॥४॥
विसरल्या तान भूक घर दार । नाहीं हा विचार असों कोठें ॥५॥
कोठें असों कोण झाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥
विसरल्या आह्मी कोणीये जातीच्या । वर्णाही चहूंच्या एक झाल्या ॥७॥
एक झाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । नि:शंक भातुकें खेळतील ॥८॥
खेळती भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चित्त त्यांचें ॥९॥
चित्तीं तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥१०॥
जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करुनियां ॥११॥
करिती आपला अवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥
त्यांनी केला हरि सासुरें माहेर । बंधुहे कुमर दीर भावे ॥१३॥
भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका ह्मणे पायीं गोविंदाचे ॥१४॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग १७
॥६६८४॥
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एकचि तो ॥१॥
एकाचींच नामें ठेवियेंली दोनी । कल्पितील मनीं यावें जावें ॥२॥
जावे यावें तिही घरींचिया घरीं । तेथींची सिदोरी तेथें न्यावी ॥३॥
विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥४॥
लोक करुनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥
लटिकी करिती मंगळदायकें । लटिकींच एकें एकां व्याही ॥६॥
व्याही भाई हरि सोयरा जांवयी ॥ अवघियांच्या ठायीं केला एक ॥७॥
एकासीच पावें जें कांहीं करिती । उपचार संपत्ति नाना भोग ॥८॥
भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाई ॥९॥
लटिकाच त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥
त्यांणीं मृत्तिकेचे करुनी अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥११॥
पुरुषनारी त्यांणीं ठेवियेली नांवे । कौतुकभावें विचरती ॥१२॥
विचरती जैसे भावें लोक । तैसें नाहीं मुख खेळतीया ॥१३॥
यांणीं जाणितलें आप आपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥१४॥
खेळतों ते आह्मी नव्हों नारीनर । ह्मणोनी विकार नाहीं तयां ॥१५॥
तयां ठावें आहे आह्मी अवघीं एक । म्हणोनी नि:शंक खेळतील ॥१६॥
तयां ठावे नाहीं हरीचिया गुणें । आह्मी कोण कोणें काय खेळों ॥१७॥
काय खातों आह्मी कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखीं ॥१८॥
मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वर्ण याती काज न धरिती ॥१९॥
न धरिती कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती ॥२०॥
नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि चित्तीं मनीं बैसलासे ॥२१॥
बैसलासे हरि जयांचियें चित्तीं । तयां नावडती मायबापें ॥२२॥
मायबापें त्यांचीं नेती पाचारुनी । बळे परि मनीं हरि वसे ॥२३॥
वसतील बाळा आपापले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥२४॥
गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती ॥२५॥
न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक झालें ॥२६॥
एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं तैसा ॥२७॥
तैसा त्यांचा भाव घेतला त्यांपरी । तुका ह्मने हरि बाळलीला ॥२८॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग १८
॥६६८५॥
लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥
मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥२॥
नभाचाही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हातें त्यासी ॥३॥
हातें कुर्वाळुनी मुखीं घाली घांस । पुरे ह्मणे तीस पोट धालें ॥४॥
पोट घालें मग देतसे ढेंकर । भक्तीचे तें फार तुळसीदळ ॥५॥
तुळसीदळ भावें सहित देवा पाणी । फार तें त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥
क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचें तें जळ गोड देवा ॥७॥
देवा भक्त जिवाहुनी आवडती । सकळहि प्रीति त्यांच्याठायीं ॥८॥
त्यांचा हा अंकित सर्व भावें हरि । तुका ह्मणे करी सर्व काज ॥९॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग १९
॥६६८६॥
जयेवेळीं चोरुनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥१॥
लागे दोहीं ठायीं करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥
माय झाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरीं वत्सें जीचीं तैसा झाला ॥३॥
झाला तैसा जैसे घरींचे गोपाळ । आणिक सकळ माहेरी पांवे ॥४॥
मोहरी पावे सिंगें वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रह्मादिकीं ॥५॥
ब्रह्मादिका सुख स्वप्नींही नाहीं । तैसें दोहीं ठायीं वोसंडलें ॥६॥
वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आई तैसा झाला ॥७॥
लाघव कळलें ब्रह्मयासी याचें । परब्रह्म साचें अवतरलें ॥८॥
तरले हे जन सकळही आतां । ऐसें तो विधाता बोलियेला ॥९॥
लागला हे स्तुति करुं अनंताचि । चतुर्मुख वाची भक्ति स्तोत्रें ॥१०॥
भक्तिकाजें देवें केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥
पृथिवी दाटिली होती या असुरीं । नासाहावे वरी भार तये ॥१२॥
तया काकुलती आपल्या दासांची । तया लागी वेची सर्वस्वही ॥१३॥
स्वहित दासांचे करावयालागीं । अव्यक्त हें जगीं व्यक्ती आलें ॥१४॥
लेखा कोण करी त्यांचिया पुण्याचा । जयांसवें वाचा बोले हरी ॥१५॥
हरी नाममंत्रे पातकांच्या रासी । तो आला घरासी गौळियांच्या ॥१६॥
गौळिये अवघीं झालीं कृष्णमय । नामें लोकत्रय तरतील ॥१७॥
तरतील नामें कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशीं होईल पाप ॥१८॥
पाप ऐसें नाहीं कृष्णनामें राहे । धन्य तोचि पाहे कृष्णमुख ॥१९॥
मुख माझे काय जो मी वर्णू पार । नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥
ब्रह्मा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासी हाचि देव ॥२१॥
देवचि अवघा झालासे सकळ । गाई हा गोपाळ वत्सें तेथें ॥२२॥
तेथें पाहाणें जें आणिक दुसरें । मूर्ख त्या अंतरें दुजा नाहीं ॥२३॥
दुजा भाव तुका ह्मणे जया चित्तीं । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग २०
॥६६८७॥
कुंभपाक लागे तयासी भोगणें । अवघाचि नेणे देव ऐसा ॥१॥
देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासी यातना यम करी ॥२॥
कळला हा देव तया साच खरा । गाई वत्सें घरा धाडी ब्रह्मा ॥३॥
ब्रह्मादिकां ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥
जाणवेल देव गौळियांच्या भावें । तुका ह्मणे व्हावें संचित हें ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग २१
॥६६८८॥
संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणें वांयां परि त्याचें ॥१॥
त्याचिया पिकासी आलिया घुमरी । आल्या गाईवरी आणिक गाई ॥२॥
गाई दवडूनि घालिती बाहेरी । तंव ह्मणे हरी बांधा त्याही ॥३॥
त्याही तुह्मी बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाडयांतुनी ॥४॥
पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥
नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥६॥
मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका ह्मणे ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग २२
॥६६८९॥
तुका ह्मणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळी करुनी ध्वजा ॥१॥
करुनियां टिरे आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥
दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥३॥
ताल नाहीं गातां नाचतां गोपाळां । घननीळ सांवळा तयांमध्यें ॥४॥
मध्यें जया हरि तें सुख आगळे । देहभाव काळें नाही तयां ॥५॥
तयांसी आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥६॥
निजभाव देखे जयांचिये अंगी । तुका ह्मणे संगीं क्रीडे तयां ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग २३
॥६६९०॥
तयांसवें करी काला दहिभात । सिदोर्‍या अनंत मेळवुनी ॥१॥
मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥
नेदी चोरी करुं जाणें अंतरींचें । आपलें ही साचे द्यावें तेथें ॥३॥
द्यावा दहीं भात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडावावा ॥४॥
वांटी सकळांसी हातें आपुलिया । जैसें मागें तया तैसें द्यावें ॥५॥
द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपणही खावें त्यांचे तुक ॥६॥
तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणें गति भला बुरा ॥७॥
राखे त्यासी तसें आपलाल्या भावें । विचारुनी द्यावें जैसें तैसें ॥८॥
तैसें सुख नाहीं वैकुंठीच्या लोका । तें दिलें भाविकां गोपाळांसी ॥९॥
गोपाळांचे मुखीं देऊनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥१०॥
त्यांचिये मुखींचे काढूनियां घांस । झोंबता हातांस खाय बळें ॥११॥
बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तया ते गोपाळ पाडितील ॥१२॥
पाठी उचलुनी वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवूनि ॥१३॥
मांदीं मेळवूनी धणी दिली आह्मां । तुका ह्मणे जमा केल्या गाई ॥१४॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग २४
॥६६९१॥
केला पुढें हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसा थाट चाले ॥१॥
वाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥
सोयी लागलीया तयांची अनंतीं । न बोलावितां येती मागें तया ॥३॥
तयांचिये चित्तीं बैसला अनंत । घेती नित्यनित्य तेंचि सुख ॥४॥
सुख नाहीं कोणा हरीच्या वियोगें । तुका म्हणे जुगें घडी जाय ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग २५
॥६६९२॥
जाय फाकोनियां निवडोनी गाई । आपुल्याच सोयी घराचिये ॥१॥
घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापें ॥२॥
गोविंदें वेधीलें तुका ह्मणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचे ॥३॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग २६
॥६६९३॥
संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥
गोपाळ गुणाचा ह्मणे गुणमय । निंबलोण मयि उतरिलें ॥२॥
उतरुन हातें धरी हनुवठी । ओवाळुनी दिठी सांडियेली ॥३॥
दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥४॥
लहान हा थोर जीवजंतु भुतें । आपण दैवतें झाला देवी ॥५॥
देवी ह्मैसासुर मुंजिया खेचर । लहानहि थोर देव हरि ॥६॥
हरि तुका म्हणे अवघा एकला । परि हा धाकुला भक्तीसाठीं ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग २७
॥६६९४॥
भक्तीसाठीं केली यशोदेसी आळी । थिंकोनियां चोळी डोळे देव ॥१॥
देव गिळूनियां धरिलें मोहन । माय ह्मणे कोण येथें दुजें ॥२॥
दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥३॥
देवापाशीं पुसे देव काय झाला । हांसे आलें बोला याचें हरि ॥४॥
यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥५॥
लटिकें तें साच साच तें लटिकें । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥६॥
सांग ह्मणे माय येरु वासी तोंड । तव तें ब्रह्मांड देखे माजी ॥७॥
माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भक्तांकारणे बाळलीळा ॥८॥
लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥९॥
देवें कवतुक दाखविलें तयां । लागती ते पायां मायबाप ॥१०॥
मायबाप ह्मणे हाचि देव खरा । आणिक पसारा लटिका तो ॥११॥
तोहि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तोहि मीच ॥१२॥
मीच ह्मणउनी जें जें तेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥१३॥
तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रह्मांडांत ॥१४॥
तद्भावना तैसें भविष्य तयांचें । फळ देता साचें मीच एक ॥१५॥
मीच एक खरा बोले नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥१६॥
निजदासां खूण दाविली निरुती । तुका ह्मणे भूतीं नारायण ॥१७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग २८
॥६६९५॥
नारायण भूतीं न कळे जयांसी । तयां गर्भवासीं येणें जाणें ॥१॥
येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥२॥
देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुद्धि ॥३॥
बुडीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरि जळीं स्थळीं तयां चित्तीं ॥४॥
चित्त तें निर्मळ जैसे नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥
तयामाजि हरि जाणिजे त्या भावें । आपलें परावें सारिखेंचि ॥६॥
चिंतनें तयांच्या तरती आणीक । जो हें सकळीक देव देखे ॥७॥
देव देखे तोही देव कसा नव्हे । उरला संदेहें काय त्यासी ॥८॥
काया वाचा मनें पुजावे वैष्णव । ह्मणउनी भाव धरुनियां ॥९॥
यांसीं कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनी गोपाळांसी ॥१०॥
गोपाळांसी डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरुप ॥११॥
पसरुनी मुख गिळियेले ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥
संधि सारुनिया पाहिलें अनंता । ह्मणती ते आतां कळलासि ॥१३॥
कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥
तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसी ॥१५॥
सीण उरे तुका ह्मणे साधनाचा । भाविकासी साचा भाव दावी ॥१६॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग २९
॥६६९६॥
भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥
सांगे गोपाळांसी काय पुण्य होतें । वाचलों जळते आगी हातीं ॥२॥
आजी आह्मां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वांचतों ॥३॥
न वांचत्या गाई जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥४॥
पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठीं । बोले जगजेठी गोपाळांसी ॥५॥
गोपाळांसी ह्मणे वैकुंठनायक । भले तुह्मी एक पुण्यवंत ॥६॥
करी तुका ह्मणे करविता आपण । द्यावें थोरपण सेवकांसी ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ३०
॥६६९७॥
काय आह्मां चालविसी वायांविण । ह्मणती दुरुन देखिलासी ॥१॥
लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥
होती दृष्टि आंत उघडी आमची । बाहेरी ते वांयांचि कुंची झाकूं ॥३॥
झालासी थोरला थोरल्या तोंडाचा । गिळियेला वाचा धुर आगी ॥४॥
आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदें नाचती भोंवताली ॥५॥
भोंवतीं आपणा मेळविलीं देवें । तुका ह्मणे ठावें नाहीं ज्ञान ॥६॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ३१
॥६६९८॥
नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥
जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले ॥२॥
वादियासी भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥३॥
दुराविले दूर आशाबद्ध देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥४॥
चित्तीं द्रव्यदारा पुत्रादि संपत्ति । समान ते होती पशु नर ॥५॥
नरक साधिला विसरोनीं देवा । बुडाले ते भवनदीमाजी ॥६॥
जिहीं हरिसंग केला संवसारीं । तुका ह्मणे खरी खेप त्यांची ॥७॥

बाळक्रीडा अभंग ३२
॥६६९९॥
खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥
मातेपाशीं एक नवल सांगती । झाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥
ओवाळिलें तिनें करुनी आरती । पुसे दसवंती गोपाळांसी ॥३॥
पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥
कवतुक कानीं आइकतां त्याचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥५॥
नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥६॥
तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळूहळू दोहीं मायबापां ॥७॥
हळूहळू त्यांचे पुण्य झालें वाड । वारलें हें झाड तिमिराचें ॥८॥
तिमिर हें तेथें राहों शके कैसें । झालिया प्रकाशें गोविंदाच्या ॥९॥
दावी तुका ह्मणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥१०॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ३३
॥६७००॥
काय आतां यासी ह्मणावें लेकरु । जनाचा हा गुरु मायबाप ॥१॥
माया याची यासी राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥
क्षण एक होतां विसरलीं त्यासी । माझें माझें ऐसें करी बाळा ॥३॥
करी कवतुके कळों नेदी कोणा । योजुनी कारणा तेंचि खेळे ॥४॥
तें सुख लुटिलें घरींचिया घरीं । तुका ह्मणे परी आपुलाल्या ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ३४
॥६७०१॥
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनी ॥१॥
खेळ मांडियेला यमुनें पाबळीं । या रे चेंडूफळी खेळूं आतां ॥२॥
आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनियां वांटी गडिया गडी ॥३॥
गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण ह्मणे दुजा ॥४॥
जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसी उपाव तोचि सांगे ॥५॥
सांगे सकळांसी व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुह्मी माझा ॥६॥
मज हा नलगे आणीक सांगाती । राखावी३ बहुतीं हाक माझी ॥७॥
माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेका ॥८॥
एका समतुकें अवघेचि राहा । जाईल तो पाहा धरा चेंडू ॥९॥
चेंडू धरा ऐसें सांगतों सकळां । आपण निराळा एकलाचि ॥१०॥
चिंतुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळीक पाहातचि ॥११॥
पाहातचि ठेलीं न चलतां कांहीं । येरु लवलाहीं ह्मणे धरा ॥१२॥
धरावा तयानें त्याचें बळ ज्यासी । येरा आणिकांसी लाग नव्हे ॥१३॥
नव्हे काम बळ बुद्धि नाहीं त्याचें । न धरवे निचे उंचाविण ॥१४॥
विचारीं पडिले देखोनी गोपाळ । या ह्मणे सकळ मजमागें ॥१५॥
मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥
चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥१७॥
यामागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥१८॥
पंथ जे चुकले आपले मतीचे । तयामागें त्यांचे तेचि हाल ॥१९॥
हाल दोघां एक मोहरा मागिलां । चालतां चुकला वाट पंथ ॥२०॥
पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥२१॥
वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥२२॥
सिकविलें हित नाइके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥२३॥
नये तेंचि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तोचि खरा ॥२४॥
रानभरी झाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥
लाज सांडुनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठीच्या ॥२६॥
चारी वेद ज्याची कीर्ति वाखाणिती । तया अति प्रीति गोपाळांची ॥२७॥
गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें ॥२८॥
सोयी धरुनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभाळिलें ॥२९॥
सांभाळिलें तुका ह्मणे सकळांहि । सुखी झाले तेही हरिमुखें ॥३०॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ३५
॥६७०२॥
मुखें सांगे त्यांसी पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥
माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥
जळांत पाहातां हाडति या दृष्टि । ह्मणे जगजेठी ऐसें नव्हे ॥३॥
नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चित्त लावा वरी ॥४॥
वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । ह्मणती गोपाळा आतां कैसें ॥५॥
कैसें करुनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥६॥
डोहो बहु खोल काळ्या भीतर । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥७॥
जयाचें कारण तयासीच ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥८॥
त्यासी नारायण ह्मणे रहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥
वरी जातां हरि पाहाती गोपाळ । ह्मणती सकळ आह्मी नेणों ॥१०॥
नेणों ह्मणती हें करितोसी कायी । आह्मां तुझी आई देईल सिव्या ॥११॥
आपुलिया कानां ठेवूनियां हात । सकळीं निमित्य टाळियेलें ॥१२॥
निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥
खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडु तळीं ॥१४॥
तळील नेणती तुका ह्मणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥१५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ३६
॥६७०३॥
नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥
न पुरेसा हात घाली चेंडुकडे । ह्मणीतलें गडे सांभाळावें ॥२॥
सांभाळ करिता सकळां जीवांचा । गोपाळांसी वाचा ह्मणे बरें ॥३॥
बरें विचारुनी करावें कारण । ह्मणे नारायण बर्‍या बरें ॥४॥
बरें म्हणऊनी तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडु तळा ॥५॥
तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडत येती घरा ॥६॥
येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥७॥
पुसती ते मात आप आपल्यासी । हरिदु:खे त्यांसी न बोलवे ॥८॥
न बोलवे हरि बुडालासे मुखें । कुटितील दु:खे उर माथे ॥९॥
मायबापें तुका म्हणे न देखती । ऐसें दु:ख चित्तीं गोपाळांच्या ॥१०॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ३७
॥६७०४॥
गोपाळां उभडु नावरे दु:खाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची ॥१॥
झालें काय ऐसें न कळे कोणासी । ह्मणती तुह्मांपासीं देव होता ॥२॥
देवासवें दु:ख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥३॥
आजी दिसे हरि फांकला यांपाशी । ह्मणऊनी ऐशी परी झाली ॥४॥
जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि । शहाणे तयांसी कळों आलें ॥५॥
कळों आलें तिहीं फुंद शांत केला । ठायींचाच त्यांला थोडा होता ॥६॥
होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥७॥
सांगे आतां हरि तुह्मां आम्हां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥८॥
यासी अवकाश नव्हेचि पुसतां । झालिया अनंता कोण परी ॥९॥
परी त्या दु:खाची काय सांगो आतां । तुका ह्मणे माता लोकपाळा ॥१०॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ३८
॥६७०५॥
पाषाण फुटती तें दु:ख देखोनी । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥
काय ऐसें पाप होतें आम्हांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥
एकांचिये डोळां असूं बाह्यात्कारीं । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥३॥
जळतील एकें अंतर्बाह्यात्कारे । टाकिली लेंकुरें कडियेहूनी ॥४॥
निवांत चि एकें राहिलीं निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥५॥
त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥६॥
वांचणें ते आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरीसवें ॥७॥
सवें घेऊनियां चाललीं गोपाळां । अवघींच बाळा नर नारी ॥८॥
नर नारी नाहीं मनुष्याचें नांव । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥९॥
सांडियेली अन्ने संपदा सकळ । चित्तीं तो गोपाळ धरुनी जाती ॥१०॥
तिरीं माना घालुनियां उभ्या गाई । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥११॥
यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली । दु:खें कोमाइलीं कृष्णाचिया ॥१२॥
यांचें त्यांचे दु:ख एक झालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥१३॥
मायबाप तुका ह्मणे सदोदर । तोंवरीच तीर न पवतां ॥१४॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ३९
॥६७०६॥
तीर देखोनियां यमुनेचें जळ । काठींच कोल्हाळ करिताती ॥१॥
कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासी ओढी भय मागें ॥२॥
मागें सरे माय पाउलापाउलीं । आपलेंच घाली धाकें अंग ॥३॥
अंग राखोनियां माय खेद करी । अंतरींचें हरी जाणवलें ॥४॥
जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका ह्मणे कुडी भावना हे ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ४०
॥६७०७॥
भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥१॥
पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥२॥
न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥३॥
अंतरला बहु बोलतां वाउगे । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥४॥
गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडतीं तीं ॥५॥
तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥६॥
मायाबापांची तों ऐसी झाली गति । तुका ह्मणे अंतीं कळों आलें ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ४१
॥६७०८॥
आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणासाठीं होता ॥१॥
होता भाव त्यांचा पाहोनी निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥
आधीं पाठीमोरीं झालीं ती सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥३॥
दिली हाक त्याणें जाऊनी पाताळा । जागविलें काळा भुजंगासी ॥४॥
भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥५॥
गर्व हरावया आला नारायण । मिस या करुन चेंडुवाचें ॥६॥
चेंडुवाचे मिसें काळ्या नाथावा । तुका म्हणे देवा कारण हें ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ४२
॥६७०९॥
काळ्याचे मागे चेंडू पत्नीपाशीं । तेज:पुंज राशी देखियेला ॥१॥
लावण्यपुतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥
उगवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥३॥
पाहिला सकळ तिनें न्याहाळूनी । कोण या जननी विसरली ॥४॥
विसरु ही तीस कैसा याचा झाला । जीवाहूनी वाला दिसतसे ॥५॥
दिसतसे रुप गोजिरें लहान । पाहतां लोचन सुखावले ॥६॥
पाहिलें पर्तोनी काळा दुष्टाकडे । मग ह्मणे कुडें झालें आतां ॥७॥
आतां हा उठोनी खाईल या बाळा । देईल वेल्हाळा माय जीव ॥८॥
जीव याचा कैसा वांचे ह्मणे नारी । मोहिली अंतरीं हरीरुपें ॥९॥
रुपें अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ४३
॥६७१०॥
ह्मणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवाया कोड त्याचें ॥१॥
त्याचें आइकोन निष्ठुर वचन । भयाभीत मन झालें तिचें ॥२॥
तिची चित्तवृत्ति होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥३॥
वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आह्मांवरी ॥४॥
वरी उदकास अंत नाहीं पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥
संचारकरुनी कोण्या वाटे आला । ठायींच देखिला अवचिता ॥६॥
अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥
मोठयानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥८॥
जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥९॥
यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळ्याकृतांतधुधुकारें ॥१०॥
कारणें ज्या येथें आला नारायण । झालें दरुषण दोघांमध्यें ॥११॥
दोघांमध्यें झाले बोल परस्परें प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥१२॥
चिंतावला चित्तीं तोंडें बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥
झाला सावकाश झेंप घाली वरी । तंव हाणे हरि मुष्टिघातें ॥१४॥
तेणें काळें त्यासी दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव आला ॥१५॥
आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुत नागकुळें ॥१६॥
कल्हारीं संधानीं वेष्टियेला हरि । अवघा विखारीं व्यापियेला ॥१७॥
यांस तुका ह्मण नाहीं भक्ताविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥१८॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ४४
॥६७११॥
निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पे वेष्टियेला ॥१॥
लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्यांच्या धुधुकारें निवारलीं ॥२॥
निघतां आपटी धरुनी धांवामधीं । एकाचेंचि वधी माथें पायें ॥३॥
एकीं जीव दिले येतांच त्या धाकें । येतील तीं एकें काकुलती ॥४॥
यथेष्ट भक्षिलीं पोट धाये वरी । तंव ह्मणे हरि पुरे आतां ॥५॥
आतां करुं काम आलों जयासाठीं । हरि घाली मिठी काळयासी ॥६॥
यासी नाथुनियां नाकीं दिली दोरी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥७॥
चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगून बहुडविलें ॥८॥
विसरु न पडे संवगडया गाई । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥९॥
त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनी सांगती । बुडाला दाविती येथें हरि ॥१०॥
हरीचें चिंतन करितां आठव । तुका ह्मणे देव आला वरी ॥११॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ४५
॥६७१२॥
अवचित त्यांणी देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥
आला घेऊनिया यमुने बाहेरी । पालवितो करीं गडियांसी ॥२॥
गडियांसी ह्मणे वैकुंठनायक । या रे सकळीक मजपाशीं ॥३॥
मजपाशीं तुह्मां भय काय करी । जवळी या दुरी जाऊं नका ॥४॥
कानीं आइकिलें गोविंदाचे बोल । म्हणती नवल चला पाहों ॥५॥
पाहों आले हरी जवळ सकळ । गोविंदें गोपाळ आळिंगिले ॥६॥
आल्या गाई वरी घालितील माना । वोरसलें स्तना क्षीर लोटें ॥७॥
लोटती सकळें एकावरी एक । होऊनी पृथक कुर्वाळलीं ॥८॥
कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥९॥
त्यांचपाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥
याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसी कृष्णें काया दिव्य दिली ॥११॥
दिले गोविंदें त्या पदा नाहीं नाश । तुका म्हणे आस निरसली ॥१२॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ४६
॥६७१३॥
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देऊनी चपळां हातीं गुढी ॥२॥
हाका आरोळिया देऊनी नाचती । एक सादाविती हरि आला ॥३॥
आरंभीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥
लोकां भूक तान नाहीं निद्रा डोळां । रुप वेळोवेळां आठविती ॥५॥
आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥
आधीं चुकी मग घडे आठवण । तुका म्हणे जन परिचयें ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ४७
॥६७१४॥
जननी हे म्हणे आहा काय झालें । शरीर रक्षिलें काय काजें ॥१॥
काय काज आतां हरिविण जिणें । नित्य दु:ख कोणें सोसावें हें ॥२॥
हें दु:ख न सरे हरि न भेटे तों । त्यामागेंचि जातों एका वेळे ॥३॥
एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवांपरता न करितें ॥४॥
करितों हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका म्हणे ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ४८
॥६७१५॥
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनी आले ॥१॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥
हरुषली माता केलें निंबलोण । गोपाळांवरुन कुरवंडी ॥३॥
गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥४॥
थोर सुख झालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरी आला ॥५॥
आले वरी बैसोनियां नारायण । काळ्या नाथून वहन केलें ॥६॥
नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥७॥
नारायणापुढें गोपाळ चालती आनंदें नाचती गाती गीत ॥८॥
तंव तो देखिला वैकुंठीचा पति । लोटांगणीं जाती सकळही ॥९॥
सकळही एका भावें आलिंगिलें । अवघियां झाले अवघे हरि ॥१०॥
हरि आलिंगनें हरिरुप झालीं । आप विसरलीं आपणास ॥११॥
सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापभावें लोकपाळां ॥१२॥
मायबाप देखा नाहीं लोकपाल । सारिखीं सकळ तुका म्हणे ॥१३॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ४९
॥६७१६॥
नेणे वर्ण धर्म जीं आलीं सामोरीं । अवघींच हरी आलिंगिलीं ॥१॥
हरि लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥२॥
पारणें तयांचें झालें एका वेळे । देखिलें सांवळें परब्रम्ह ॥३॥
ब्रम्हानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥४॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंग माला चौकदारीं ॥५॥
दारीं वृंदावनें तुळसीचीं वनें । राम कृष्ण गाणें नारायण ॥६॥
नारायण तिहीं पूजिला बहूतीं । नाना पुष्पयाती करुनियां ॥७॥
यांचें ऋण नाहीं फिटलें मागील । पुढें भांडवल जोडिती हीं ॥८॥
हीं नवह्तीं कधीं या देवा वेगळीं । केला वनमाळी सेवाऋणी ॥९॥
सेवाऋणें तुका म्हणे रुपधारी । भक्तांचा कैवारी नारायण ॥१०॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ५०
॥६७१७॥
नारायण आले निज मंदिरासी । झाले या लोकांसी बहुडविते ॥१॥
बहुडविले बहु केले समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥२॥
मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥३॥
सकळां भातुक वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥४॥
लोक गेले कामा गाईपें गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥५॥
लोभ दावूनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥६॥
आशेचे बांधले तुका म्हणे जन । काय नारायण ऐसा जाणें ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ५१
॥६७१८॥
झाला कवतुक करिता रोकडें । आणिकही पुढें नारायण ॥१॥
येऊनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रयाजीं ॥२॥
इंद्रा दहीं दूध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनी वाटे त्यांचें ॥३॥
हिरोनी घेतल्या कावडी सकळा । म्हणति गोपाळा बरें नव्हें ॥४॥
नव्हे तेंचि करी न भे कळिकाळा । तुका म्हणे लीळा खेळे देव ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ५२
॥६७१९॥
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव तया भीऊंनका ॥१॥
नका धरुं भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौळियांसी ॥२॥
गौळियांसी धीर नाहीं या वचनें । आशंकित मनें वेडावलीं ॥३॥
वेडावलीं त्यांस न कळतां माव । देवाआदिदेव नोळखतां ॥४॥
नोळखतां दु:खें वाहाती शरीरीं । तुका म्हणे वरी भारवाही ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ५३
॥६७२०॥
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥
अंगसंगें तयां न कळे हा देव । कळोनी संदेह मागुतला ॥२॥
मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुद्धि स्थिर ॥३॥
बुद्धि स्थिर होऊं नेदी नारायण । आशाबद्ध जन लोभिकांची ॥४॥
लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका म्हणे तेणें दु:खी होती ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ५४
॥६७२१॥
दु:खी होती लोभें करावें तें काई । उडतील गाई म्हैसी आतां ॥१॥
आणीकही कांहीं होईल अरिष्ट । नाइके हा धीट सांगितलें ॥२॥
सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासी देवा रागें ॥३॥
रागें काला देतां न घेती कवळ । टोंकवी गोपाळ क्रोधियांसी ॥४॥
क्रोध देवावरी धरियेला राग । तुका ह्मणे भाग न लभती ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ५५
॥६७२२॥
भाग त्या सुखाचे वांकडया बोबडयां । आपलिया गडयां भाविकांसी ॥१॥
भारवाही गेले टाकूनी कावडी । नवनीतगोडी भाविकांसी ॥२॥
काला करुनियां वांटिला सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥३॥
खेळेमेळे दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्तीं कवणाचें ॥४॥
कवणाचें चाले तुका म्हणे बळ । जयासी गोपाळ साह्य झाला ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ५६
॥६७२३॥
जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥
तातडिया मेघा आज्ञा करी राव । गोकुळीचा ठाव उरों नेदा ॥२॥
नेदाविया गाई म्हैसी वांचों लोक । पुरा सकळीक सिळाधारी ॥३॥
धाक नाहीं माझा गौळियांच्या पोरां । सकळीक मारा म्हणे मेघां ॥४॥
म्हणविती देव आपणां तोंवरी । जंव नाहीं वरी कोपलो मी ॥५॥
मीपणें हा देव नकळेचि त्यांसी । अभिमानें रासी गर्वाचिया ॥६॥
अभिमानराशि जयाचिये ठायीं । तुका म्हणे तई देव दुरी ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ५७
॥६७२४॥
देव त्यां फावला भाविकां गोपाळा । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥
नाडलीं आपल्या आपणचि एकें । संदेहदायकें बहुफारें ॥२॥
फारें चालविलीं नेदी कळों भाव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥
विश्वासावांचूनी कळों नये खरा । अभक्तां अधिरा जैसा तैसा ॥४॥
जैसा भाव तैसा जवळी त्या दुरी । तुका ह्मणे हरि देतो घेतो ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ५८
॥६७२५॥
तो या साचभावें न कळेचि इंद्रा । ह्मणऊनी धारा घालीसिळा ॥१॥
घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरी अवचिता देखियेला ॥२॥
देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥
विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ ह्मणती केला ॥४॥
लागलेंसे गोड न कळे ते काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥५॥
आतां काय कैसा करावा विचार । गोधनासी थार आपणिया ॥६॥
यांचिया विचारें होणार तें कायीं । तुका ह्मणे ठायीं वेडावलीं ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ५९
॥६७२६॥
वेडावलीं काय करावें या काळीं । म्हणे वनमाळी गोपाळांसी ॥१॥
शिरीं धरुं गोवर्धन उचलूनी । ह्मणे तुम्ही कोणी भिऊं नका ॥२॥
नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाकां आरोळिया ॥३॥
आशंकित चित्तें न वाटे त्यां खरें । धाकेंच ते बरें ह्मणती चला ॥४॥
चित्तीं धाक परि जवळी अनंत । तुका ह्मणे घात होऊं नेदी ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ६०
॥६७२७॥
नेदी दु:ख देखों दासा नारायण । ठेवी निवारुन आल्या आधीं ॥१॥
आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागे मग सुखरुप ॥२॥
पर्वतासी हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥३॥
आपल्या आपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासी ॥४॥
निमित्य करुनी करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥५॥
दीनाचा कृपाळू पतितपावन । हें करी वचन साच खरें ॥६॥
सांगणें न लगे सुखदु:ख दासा । तुका ह्मणे ऐसा कृपावंत ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ६१
॥६७२८॥
कृपावंतें हाक दिली सकळिकां । माजिया रे नका राहों कोणी ॥१॥
निघाले या भेणें पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥२॥
लाविले गोपाळ फेरीं चहुंकडे । हांसे फुंदे रडे कोणी धाकें ॥३॥
धाकें हीं सकळ निघालीं भीतरी । उचलिला गिरी तयाखालीं ॥४॥
तया खालीं गाई वत्सें आलीं लोक । पक्षी सकळीक जीवजाति ॥५॥
जिहीं ह्मणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी तरी ॥६॥
जाति कुळ नाहीं तयांसी प्रमाण । अनन्या अनन्य तुइका ह्मणे ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ६२
॥६७२९॥
त्यांसी राखे बळें आपुले जे दास । कळिकाळासी वास पाहों नेदी ॥१॥
पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥२॥
येऊनी दगड बैसतील गिरी । वरुषला धारी शिळांचिये ॥३॥
शिळांचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥४॥
एक सरें गिरी धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आम्ही ऐसें ॥५॥
ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । ह्मणे तुह्मी आतां हात सोडा ॥६॥
हांसती गोपाळ करुनी नवल । आइकोनी बोल गोविंदाचे ॥७॥
दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥८॥
भार आह्मांवरी घालूनी निराळा । राहिलासी डोला चुकवूनी ॥९॥
निमित्य अंगुली लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसी ॥१०॥
सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकेंचि खरें मानूनियां ॥११॥
यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका ह्मणे वाचा वाचाळ ते ॥१२॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ६३
॥६७३०॥
वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखाणावें ॥१॥
बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्याचें ॥२॥
आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥३॥
लटिका चि आम्ही सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसी ॥४॥
आलें कळों तुका ह्मणे अनुभवें । मग अहंभावें सांडवलें ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ६४
॥६७३१॥
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥
लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भले ॥२॥
भला आजी तुम्ही केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥
लागती चरणा सकळ ते काळीं । आम्हांमध्यें बळी तूंचि एक ॥४॥
एका तुजविण न यों आम्ही कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥५॥
आजिवरी आम्हां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥६॥
तुझा पार आह्मी नेणों नारायणा । नखीं गोवर्द्धना राखियेलें ॥७॥
राखियेलें गोकुळ आह्मां सकळांसी । दगडाच्या रासी वरुषतां ॥८॥
वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकळही ॥९॥
सकळही तान विसरलीं भूक । सकळही सुख दिलें त्यांसी ॥१०॥
त्यांसी कळों आला वैकुंठनायक । तुका ह्मणे लोक निर्भर ते ॥११॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ६५
॥६७३२॥
लोकां कळों आला देव आह्मामधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥१॥
शंका नाहीं थोरां लहानां जीवांसी । कळला हा हृषीकेशी मग ॥२॥
मग मनीं झाले निर्भर सकळ । संगे लोकपाळ कृष्णाचिया ॥३॥
कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चित्त झालें त्यांचें ॥४॥
त्यांसी ठावा नाहीं बाहेरील भाव । अंतरींच वाव सुख झालें ॥५॥
सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥६॥
चिंतनेंचि धालीं न लगे अन्नपाणी । तुका ह्मणे मनीं समाधान ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ६६
॥६७३३॥
समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥
गोविंदाचा झाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काज ॥२॥
काज काम त्यांचे सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥३॥
माया सकळांची सकळां ही वरी । विषम तें हरि दिसों नेदी ॥४॥
दिसे तया आप परावें सारिखें । तुका ह्मणे सुखें कृष्णाचिया ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ६७
॥६७३४॥
कृष्णाचिया सुखें भूक नाहीं तान । सदा समाधान सकळांचे ॥१॥
कळलेंचि नाहीं झाले किती दिस । बाहेरील वास विसरलीं ॥२॥
विसरु कामाचा तुका ह्मणे झाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥३॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ६८
॥६७३५॥
जावें बाहेरी ना नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥
कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥
कवतुकासाठीं भक्त देहावरी । आणिताहे हरि बोलावया ॥३॥
यासी नांव रुप नाहीं हा आकार । कळला साचार भक्ता मुखें ॥४॥
मुखें भक्तांचिया बोलतो आपण । अंगसंगें भिन्न नाहीं दोघें ॥५॥
दोघे वेगळाले लेखील जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥
तयासी घडलीं सकळही पापें । भक्तांचिय कोपें निंदा द्वेषें ॥७॥
द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवीं प्राणा नाश करी ॥८॥
करितां आइके निंदा या संतांची । तया होती तेचि अध:पात ॥९॥
पतन उद्धार संगाचा महिमा । त्यजावें अधमा संतसेवीं ॥१०॥
संतसेवीं जोडे महालाभरासी । तुका ह्मणे यासी नाश नाहीं ॥११॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ६९
॥६७३६॥
नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळही ॥१॥
सकळही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥
येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥३॥
सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाई वत्स पशु जीवां ॥४॥
वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका ह्मणे देवावांचूनियां ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ७०
॥६७३७॥
यांसी समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा ह्मणे देव ॥१॥
देव राखे तय आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥
दासां दु:ख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळतां ॥३॥
नाहीं मेघ येतां जातां देखियेला । धारीं वरुषला शिळांचिये ॥४॥
एवढें भक्तांचे सांकडें अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ७१
॥६७३८॥
काकुलती एकें पाहाता बाहेरी । तया ह्मणे हरि वोसरला ॥१॥
वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥
कवतुक झालेम ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥३॥
भावें तया पुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥४॥
गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पावे ॥५॥
वत्सें गाई पशु नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाचया ॥६॥
चित्त वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें देवाचें तयाहूने ॥७॥
तयाहूनी कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥
गोविंदाचा संग तुका ह्मणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥९॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ७२
॥६७३९॥
गोकुळींची गति कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥१॥
इंद्रापाशीं मेघ बोलती बडीवार । सकळ संहार करुनी आलों ॥२॥
आतां जीव नाहीं सांगाया ते रानीं । पुरिलें पाषाणीं शिळाधारीं ॥३॥
रिता कोठें नाहीं राहों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥४॥
न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥५॥
माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥६॥
पाहतां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका म्हणे ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ७३
॥६७४०॥
नाचतां देखिलीं गाई वत्सें जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥
लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसी येथें ॥२॥
येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निर्विघ्न तें ॥३॥
विचारितां उंचलिला गोवर्द्धन । अवतार पूर्ण कळों आला ॥४॥
आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥५॥
त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रम्हयासी ॥६॥
सीणतां जो ध्याना नये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥७॥
समागमें गाई वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळितां अंगसंग ॥८॥
संग झाला मायबापां लोकपाळां । आलिंगिती गळां कंठाकंठ ॥९॥
करिते हे झाले स्तुति सकळीक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥
करितील वृष्टि पुष्पवरुषाव । देवाआदिदेव पूजियेला ॥११॥
पुष्पांजुळी मंत्रघोष जयजयकार । दुमदुमी अंबर तेणें नादें ॥१२॥
नामाचा गजर गंधर्वाचीं गाणीं । अनंद भुवनीं न माये तो ॥१३॥
तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥१४॥
दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥१५॥
भावना भेदाची जाय उठाउठी । तुका ह्मणे भेटी गोविंदाचें ॥१६॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ७४
॥६७४१॥
गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कईचे वैरभाव ॥१॥
भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरी ॥२॥
वरी हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या ॥३॥
सकळ ही बरी बहुडविले स्थळा । चलावें गोपाळां ह्मणे घरा ॥४॥
राहिली हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलिया डोळें छंदें होतीं ॥५॥
छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसी ॥६॥
त्यांच्या तुका ह्मणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ७५
॥६७४२॥
समागमें असे हरि नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसी ॥१॥
अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकळही ॥२॥
सकळही जन आले गोकुळासी । आनंद मानसी सकळांच्या ॥३॥
सकळांचा केला अंगिकार देवें । न कळतां भावे वांचवी त्यां ॥४॥
त्यां झाला निर्धार हरि आह्मांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥५॥
निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकळीक नारायणें ॥६॥
नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका ह्मणे नावां अनुसारे त्या ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ७६
॥६७४३॥
ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥
हें सोंग सारिलें या रुपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥
आहे तुका ह्मणे धर्मसंस्थापणें । केला नारायणें अवतार ॥३॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ७७
॥६७४४॥
अवतार केला संहाराया दुष्ट ॥ करिती हे नष्ट परपीडा ॥१॥
परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो हि भाव आरंभिला ॥२॥
लाविलें लाघव पाहोनियां संधि । सकळांहीं वधी दुष्टजन ॥३॥
दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणी न साहती ॥४॥
न साहवे दु:ख भक्तांचे या देवा । अवतार घ्यावा लागे रुप ॥५॥
रुप हे चांगलें राम कृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारितां ॥६॥
उच्चारितां नाम कंस वैरभावें । हरोनियां जिवें कृष्ण केला ॥७॥
कृष्णरुप त्यासी दिसें आवघें जन । पाहे आपण कृष्ण झाला ॥८॥
पाहीलें दर्पणीं आधिल्या मुखासी । चतुर्भुज त्यासी तोचि झाला ॥९॥
झालीं कृष्णरुप कन्या पुत्र भाज । तुका ह्मणे राज्य सैन्य जन ॥१०॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ७८
॥६७४५॥
सैन्य जन हांसे राया झालें काई । वासपे तो ठायीं आपणासी ॥१॥
आपणा आपण जयास तीं तैसीं । वैरभाव ज्यांसी भक्ति नाहीं ॥२॥
नाहीं याचा त्याचा भाव एकविध । ह्मणऊनी छंद वेगळाले ॥३॥
वेगळाल्या भावें ते तया हांसती । तयास दिसती अवघीं हरि ॥४॥
हरिला कंसाचा जीवभाव देवें । द्वेषाचिया भावें तुका ह्मणे ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ७९
॥६७४६॥
द्वेषाचिया ध्यानें हरिरुप झाले । भाव हारपले देहादिक ॥१॥
देहादिक कर्म अभिमान वढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥
नारायण जोडे एकविध भावें । तुका ह्मणे जीवें जाणें लागे ॥३॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ८०
॥६७४७॥
जीवभाव त्याचा गेला अभिमान । ह्मणऊनि जन हांसे कंसा ॥१॥
सावध करितां नये देहावरी । देखोनियां दुरी पळे जन ॥२॥
जन वन हरि झालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥
झांकूनी लोचन मौन्येंचि राहिला । नाहीं आतां बोळायाचें काम ॥४॥
बोलायासी दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण झालें स्वर्यें रुप ॥५॥
रुप पालटलें गुण नाम याति । तुका म्हणे भूतीं देव जाला ॥६॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ८१
॥६७४८॥
जीवभाव त्याचा गेला अभिमान । ह्मणऊनि जन हांसे कंसा ॥१॥
सावध करितां नये देहावरी । देखोनियां दुरी पळे जन ॥२॥
जन वन हरि झालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥
झांकूनि लोचन मौन्येंचि राहिला । नाहीं आतां बोळायचें काम ॥४॥
बोलायासी दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण झालें स्वयें रुप ॥५॥
रुप पालटलें गुण नाम याति । तुका म्हणे भूतीं देव झाला ॥६॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ८२
॥६७४८॥
झालों स्वये कृष्ण आठव हा चित्तीं । भेदें भयवृत्ति उरली आहे ॥१॥
उरली आहे रुप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥
तोंवरी हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासी तोचि देव ॥३॥
देवरुप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयातीत भेदें ॥४॥
भेदें तुका म्हणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ८३
॥६७४९॥
वांयां तैसे बोल हरिशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥१॥
भेद भय गेले नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा झाली ॥२॥
झाली भेटी कंसा हरीशीं निकट । सन्मुखचि नीट येरयेरां ॥३॥
येरयेरां भेटी युद्धाच्या प्रंसगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥४॥
त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका ह्मणे सत्तानायक हा ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ८४
॥६७५०॥
नारायणें कंस चाणुर मर्दिला । राज्यीं बैसविला उग्रसेन ॥१॥
उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविल अंत अभक्ताचा ॥२॥
अवघेंचि केलें कारण अनंतें । आपुलिया हावें सकळ ही ॥३॥
सकळही केलीं आपलीं अंकित । राहे गोपिनाथ मथुरेसी ॥४॥
मथुरेसी आला वैकुंठनायक । झालें सकळीक एक राज्य ॥५॥
राज्य दिलें उग्रसेना शरणागता । सोडविलीं माता दोन्ही ॥६॥
सोडवणे धांवे भक्ताच्या कैवारें । तुहा ह्मणे करें शस्त्र धरी ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ८५
॥६७५१॥
धरी दोहीं ठायीं सारखाचि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥
दोन्ही एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्यली ॥२॥
व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें माय बाप ॥३॥
माय हा जगाची बाप नारायण । दुजा करी कोण यत्न यासी ॥४॥
कोण जाणे याचे अंतरींचा भाव । कळों नेदी माव तुका म्हणे ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ८६
॥६७५२॥
दिनाचा कृपाळू दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥
हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये पराकृत ह्मणों यासी ॥२॥
यासी कळावया एक भक्तिभाव । दुजा नाहीं ठाव धांडोळितां ॥३॥
धांडोळितां श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपिसवें ॥४॥
गोपिकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळीं न देखतां ॥५॥
न देखता त्यांसी उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळां ॥६॥
वेळोवेळां पंथ पाहे गोपिकांचा । तुका ह्मणे वाचा नातुडे तो ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ८७
॥६७५३॥
तो बोले कोमळ निष्ठुर साहोनी । कोपतां गौळणी हास्य करी ॥१॥
करावया दास्य भक्तांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥२॥
दिलें उग्रसेना मथुरेचें राज्य । सांगितलें काज करी त्याचें ॥३॥
त्यासी होतां कांहीं अरिष्ट निर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥
शरणागता राखे सर्वभावें हरि । अवतार धरी तयांसाठीं ॥५॥
तयांसाठीं वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥
तळमळ नाहीं तुका ह्मणे चित्ता । भक्तांचा अनंता भार माथां ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ८८
॥६७५४॥
मारिले असुर दाटिले मेदिनी । होते कोणा कोणी पीडित ते ॥१॥
ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥
वरिले ते दूतीं यमाचिये दंडीं । नुच्चारितां तोंडीं नारायण ॥३॥
नारायण नाम नावडे जयांसी । ते झाले मिरासी कुंभपाकीं ॥४॥
कुंभपाकीं सेख वाज वो जयांचा । तुका ह्मणे वाचा संतनिंदा ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ८९
॥६७५५॥
वास नारायणें केला मथुरेसी । वधूनी दुष्टांसी तये ठायीं ॥१॥
ठायीं पितियाचें मानी उग्रसेन । प्रतिपाळी जनासहित लोकां ॥२॥
लोकां दु:ख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥३॥
देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥४॥
येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥५॥
काया वाचा मन कृष्णीं रत झालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥६॥
ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका ह्मणे चित्तीं ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ९०
॥६७५६॥
चिंतिलीं पावलें जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥
वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥
चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥३॥
न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतें वांचूनियां ॥४॥
चुकवूनी जन्म दाखवी आपणा । भजा नारायणा तुका ह्मणे ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ९१
॥६७५७॥
भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्तीं हेवा दुजा कांहीं ॥१॥
दुजा छंदु नाहीं तयाचिये मनी । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥
ध्यान ज्यां हरीचें हरीसी तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥३॥
भाग्यें पूर्व पूण्यें आठविती लोक । अवघे सकळीक मथुरेचे ॥४॥
मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥५॥
राज्यकरी गोपियादवांसहित । कर्मिलें बहुतकाळ तेथें ॥६॥
तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ९२
॥६७५८॥
रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनी गोमटीं नानारत्नें ॥१॥
रत्नें खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥
कळा सकळ ही गोविंदाचे हातीं । मंदिरें निगुती उभारिलीं ॥३॥
उभारिलीं दुर्गे दारवंटे फांजी । कोटि चर्यामाजी शोभलिया ॥४॥
शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरि ॥५॥
आला नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥
निवडीना याति समानचि केलीं । टणक धाकुलीं नारायणें ॥७॥
नारायणें दिलीं अक्षई मंदिरें । अभंग साचारें सकळांसी ॥८॥
सकळ ही धर्मसीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥
रचिलें तें देवें न मोडे कवणा । वळियांचा राणा नारायण ॥१०॥
बळबुद्धीनें तीं देवाच सारखीं । तुका म्हणे मुखीं गाती ओंव्या ॥११॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ९३
॥६७५९॥
गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरी ॥१॥
ऋद्धिसिद्धि दासी दारीं ओळंगती । सकळ संपत्ति सर्वा घरीं ॥२॥
घरी बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्तन नरनारी ॥३॥
नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसी संगति गोविंदाची ॥४॥
गोविंदे केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका ह्मणे ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ९४
॥६७६०॥
कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसी राज्य देव ॥१॥
द्वारकेसी राज्य करी नारायण । दुष्ट संहारुन धर्म पाळी ॥२॥
पाळी वेदाआज्ञा ब्राह्मणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचें ॥३॥
अतीत अलिप्त अवघियां वेगळा । नाहीं हा गोपाळा अभिमान ॥४॥
अभिमान नाहीं तुका ह्मणे त्यासी । नेदी आणिकांसी धरुं देव ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ९५
॥६७६१॥
धरियेलें रुप कृष्ण नाम बुंथी । परब्रह्म क्षिती उतरलें ॥१॥
उत्तम हें नाम राम कृष्ण जगीं । तरावयालागीं भवनदी ॥२॥
दीनानाथ ब्रिदें रुळती चरणीं । वंदितील मुनि देव ऋषि ॥३॥
ऋषीं मुनीं भेटी दिली नायायणें । आणिक कारणें बहु केलीं ॥४॥
बहु कासावीस झाला भक्तांसाठीं । तुका ह्मणे आटी सोसियेली ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ९६
॥६७६२॥
सोसियेली आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥
वाहोनी सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥
नेदी काळाचिये हातीं सेवकांसी । तुका ह्मणे ऐसी ब्रीदावळी ॥३॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ९७
॥६७६३॥
ब्रीदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥१॥
सुखावे मेदिनी कृष्णाचिये चाली । कुंकुमें शोभलींख होय रेखा ॥२॥
होऊनी भ्रमर पाउलांचें सूख । घेती भक्त मुख लावूनियां ॥३॥
याचसाठीं धरियला अवतार । सुख दिलें फार निज दासां ॥४॥
निजसुख तुका ह्मणे भक्तां ठावें तिहींच जाणावें भोगूं त्यासी ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ९८
॥६७६४॥
भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणि गोपाळां गाईवत्सां ॥१॥
गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरी ॥२॥
भक्ति नवविधा तयांसी घडली । अवघींच केली कृष्णरुप ॥३॥
रुप दाखविलें होतां भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाहीं ॥४॥
नाहीं राहों दिलें जातां निजधामा । तुका ह्मणे आह्मांसहित गेला ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग ९९
॥६७६५॥
गेला कोठें होता कोठूनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥
आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥
कोठें नाहीं ऐसा नाहीं रिताठाव । अनुभवी देव स्वयें झाले ॥३॥
जातों येतों आह्मी देवाचे सांगात । तुका ह्मणे गात देवनाम ॥४॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग १००
॥६७६६॥
मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धीटपणें सलगी देवा ॥१॥
वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥
नाहीं झालें ज्ञान पाहिलें अक्षर । मानी जैसें थोर थोरीं नाहीं ॥३॥
नाहीं मनीं लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसी ॥४॥
चतुरांच्या राया मी तुझें अंकित । झालों शरणागत देवदेवा ॥५॥
देवा आतां करीं सरतीं हीं वचनें । तुझ्या कृपादानें बोलिलों तीं ॥६॥
तुझें देणें तुझ्या समर्पूनीं पायीं । झालों उतरायी पांडुरंगा ॥७॥
रंकाहुनी रंक दास मी दासांचें । सामर्थ्य हें कैचें बोलावया ॥८॥
बोलावया पुरे वाचा माझी कायी । तुका ह्मणे पायीं ठाव द्यावा ॥९॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥

बाळक्रीडा अभंग १०१
॥६७६७॥
चारी वेद ज्याची कीर्ति वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥
चहुं युगांचे हें साधन साधिलें । अनुभवा आलें आपुलिया ॥२॥
एवढें करुनी आपण निराळा । प्रत्यक्ष हें डोळां दाखविलें ॥३॥
दावूनि सकळ प्रमाणाच्या युक्ति । जयजयकार करिती अवघे भक्त ॥४॥
भक्ति नवविधा पावली मुळची । जनार्दननामाची संख्या झाली ॥५॥
नवसें ओंव्या आदरें वाचितां । त्याच्या मनोरथा कार्यासिद्धि ॥६॥
सीमा न करवे आणीक ही सुखा । तुका ह्मणे देखा पांडुरंगा ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥


बालक्रीडा अभंग समाप्त

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *