धनत्रयोदशी दिवाळी दिपावली

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇


धनत्रयोदशी

आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस हा सण साजरा केला जातो. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

दिवाळीची संपूर्ण माहिती पाहा.


धनत्रयोदशी या सणामागे काही कथा ही आहे. असे म्हणतात की हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते.

सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.


आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
भारतात काही ठिकाणी धनतेरसच्या दिवशी लोक सोने-चांदीची भांडी, नाणी, आभूषण इ. खरेदी करतात.

माहिती संकलन: प्राची तुंगार

दिवाळीतील महत्त्वाचे दिवस व

ईतर लेख, दिवाळी-diwali, प्रतिपदा,

काय आहे बलिप्रतिपदेची कथा ?

🕉️ बलिप्रतिपदा 🕉️२६/१०/२०२२, बुधवार दिवाळी हा सर्व सणांचा राजा असून याला दीपोत्सव असे सुद्धा म्हटले जाते. या दीपोत्सवाची सुरुवातच गोमातेच्या पूजनाने होते व सांगता ही बहिण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या…
अमावास्या,, अशोककाका कुलकर्णी, अशौच सुतक विटाळ, आरोग्य, ग्रहण, दिवाळी-diwali, धर्म मार्ग, वैदिक-हिंदू संस्कृती, व्रत, शास्त्र असे सांगते

सूर्य ग्रहण 25ऑक्टोबर 2022 संपूर्ण माहिती

🌹 ग्रहण निर्णय 🌹निर्णय, स्नान, दान, मोक्ष, सुतक, विधी. महात्म्य संपूर्ण यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे बरेच सदस्यांनी लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे . वास्तविक यावर्षी दि २४ ऑक्टोबर…
कार्तिक, चरित्र मराठी, चरित्र हिंदी, दिवाळी-diwali, देवी देवता, प्रतिपदा,, वैदिक-हिंदू संस्कृती, श्रीकृष्ण सर्व, सण

गोवर्धन पूजा २०२२

गोवर्धन पूजागोवर्धन पूजागोवर्धन पूजा पर भगवान कृष्ण को अन्नकूट का भोगअन्य नाम अन्नकूट पर्वअनुयायी हिन्दूउद्देश्य धार्मिक निष्ठा, उत्सवउत्सव गोवर्धन पूजा, श्रीकृष्ण पूजा, गौ पूजा, अन्नकूट का छप्पन भोग, सामूहिक भोज…
कार्तिक, त्रयोदशी, दिवाळी-diwali, वैदिक-हिंदू संस्कृती, श्रीकृष्ण सर्व, सण

धनत्रयोदशी दिवाळी दिपावली

धनत्रयोदशी आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस हा सण साजरा केला जातो. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट…
कार्तिक, चतुर्दशी,, दिवाळी-diwali, वैदिक-हिंदू संस्कृती, श्रीकृष्ण सर्व, सण

नरक चतुर्दशी दिवाळी दिपावली

नरक चतुर्दशीतिथीइतिहासमहत्त्वसण साजरा करण्याची पद्धत नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही…
एकादशी, कार्तिक, दिवाळी-diwali, द्वादशी,, वैदिक-हिंदू संस्कृती, शेती आणि शेतकरी, श्रीकृष्ण सर्व, सण

गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस दिवाळी दिपावली

भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे,…
दिवाळी-diwali, द्वितीया,, वैदिक-हिंदू संस्कृती, सण

भाऊबीज दिपावली- दिवाळी

भाऊबीजभाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज…
दिवाळी-diwali, वैदिक-हिंदू संस्कृती, सण

दिपावली – दिवाळी महात्म्य संपूर्ण 2023

धन्य आजि दिन ॥ झाले संताचे दर्शन ॥१॥झाली पापा तापा तुटी ॥ दैन्य गेलें उठाउठी ॥२॥झाले समाधान ॥ पायी विसावलें मन ॥३॥तुका म्हणॆ आले घरां ॥ तोचि दिवाळी दसरा ॥४॥…
दिवाळी-diwali, पौराणिक व्यक्ती, प्रतिपदा,, राक्षस-दानव-असुर, वैदिक-हिंदू संस्कृती, सण

बलिप्रतिपदा अर्थात पाडवा दिवाळी दिपावली

आपण आजही ‘इडा पीडा टळो बळी चे राज्य येवो’ असे म्हणतो बळीराजाच्या राज्यात जर जनता इतकी खुश होती सुखी होती तर वामनाने बळीराजाला का मारले?वामनाने बळी राजाला मारले नाही तर…
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *