३७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ३७.

अष्टभार्यांसह श्रीकृष्णाने राजगृहात प्रवेश केल्यावर कृष्ण सर्वप्रथम कुंतीच्या दालनात गेल्यावर दोघांनी एकमेकांना गाढ अलिंगन दिले.कुंती आत्या तर होती च पण परमभक्तही होती.महासाध्वी द्रौपदीने कृष्णाला पाहिल्याबरोबर तिचे नेत्र अत्यानांदाने भरुन आले.हा आपला बंधु,सखा,नित्य पाठीराखा असुन अढळ भक्तीची भावनाही निर्माण,ज्या वेळी अर्जुनाने ‘पण’ जिंकुन त्याच्याबरोबर आला तेव्हाच झाली होती.८-१० दिवस आनंदात घालवल्यावर युधिष्ठीराने सभेचे आयोजन केले.त्या सभेत सर्वच स्तराती ल लोकं निमंत्रित होते. सारे सभा कशा साठी बोलावली म्हणुन उत्सुक झाले होते श्रीकृष्णाकडे पाहुन गंभीर स्वरात युधिष्ठीराने बोलण्यास सुरुवात केली. वासुदेवा! बरेच दिवसांपासीन राजसूय यज्ञ करण्याचा विचार मनी आहे. मधुसुदना!आम्ही आज जे कांही आहोत ते केवळ आणि केवळ तुझ्यामुळेच!हे राज्य उत्कर्ष पावुन वैभवास आले तेही तुझ्याचमुळे!नारदमुनींनी सुध्दा यज्ञाचा आग्रह केला,म्हणुनच मुद्दाम तुला बोलाव ले

आहे.राजधर्मा! तूं सर्वतोपरी योग्य व समर्थ आहेस,तरी सुध्दा यज्ञ करण्यापुर्वी सर्व राजांना जिंकुनच अखिल भूतलावर सत्ता प्रस्थापित करणे गरजेचे आहे.पण एक मोठी अडचण आहे,या भरत खंडात चंद्रवंशी व सुर्यवंशी एकंदर १॰१ कुळे आहेत. परशुरामाने जिंकलेल्या आणि त्यांच्या कत्तलीतुन वाचलेल्या क्षत्रियांनी तेव्हापासुन आपल्याचपैकी कोणा एकाला सार्वभौम मानुन त्याच्याच आज्ञेत सर्वांनी चालावे असा कडक नियम घालुन दिलेला तुला माहीतच आहेच.सध्या भोज कुल बलिष्ठ असुन मगध देशाचा राजा जरासंधाला सर्वांनी सम्राट मानले असुन चेदिपती शिशुपाल त्याचा सेनापती आहे. तसेच विदर्भाचा भीष्मक,पौंड्रकपती वासुदेव,करुणपति दंतवक्र इत्यादी राजे त्याचे आज्ञाधारक आहेत.तुझा मामा कुंतीभोज फक्त तुझ्याबाजुने आहे,बाकी सर्वच राजे त्याला अनुकुल आहे हा सर्व विचार करतां जरासंध जोवर जिवंत आहे तोपर्यंत दिग्विजय करणे तुला अशक्य आहे.आतां त्याच्या पापाचाही घडा भरत आला आहे.शेकडों राजांना जिंकुन

कैदेत टाकले,महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पुरीषमेध यज्ञ करायचा त्याचा विचार आहे. त्या सर्व राजांच्या सुटकेसाठी तरी त्याला ठार करणे,त्याचा काटा काढणे आवश्यक आहे.ते बंदिस्त राजे मुक्त झाले तर ते पण तुझे सहाय्यकारी होतील त्याला लढाईत जिंखणे तर अशक्य आहे द्वंदयुध्दातच फक्त अर्जुन किंवा भीम मारुं शकेल.ही वार्ता कर्णोपकर्णी होण्याआधी गुप्त वेशाने या दोघांसह मगधदेशी जाऊन त्याला द्वंदयुध्दाचे आव्हान केले की, तो द्वंदयुध्द नाकारणार नाही.अर्जुन भीम व श्रीकृष्णासह कृशतृणांची वल्कले व हाती कमंडलू घेऊन ब्राम्हणवेशात तिघे मगधदेशी पोहोचले.निर्भयतेने ते तेजस्वी ब्राम्हण चालले असतां कुणीही त्यांना अडविले नाही.ते सरळ जरासंधाजवळ पोहोचले, त्याने उठुन आदराने त्यांचा पायसमधुपर्काचा सत्कार पुढे केला पण तिघांनीही अस्विकार केला.तुम्ही ब्राम्हण आहात तर पुजासत्कार कां स्विकारत नाही? या तिघांनी जरी ब्राम्हणवेष धारण केला असला तरी,त्यांची धिप्पाड आकृति कसलेले शरीर

धनुष्याचा चाप ओढुन हाताला पडलेले घट्टे पाहुन हे ब्राम्हण नसुन क्षत्रिय आहे, हे त्याने ओळखले. शिवाय चेहेरेही ओळखीचे वाटत होते. त्याच्या मनांतील भाव ओळखुन,कृष्ण म्हणाला,बरोबर आहे! हे दोघे पांडव भीम अर्जुन व मी ह्रषिकेश शौरी,तुला द्वंदयुध्दा चे आव्हान करायला आलो आहोत.एक तर तू कैदेत टाकलेल्या सर्व क्षत्रिय राजाना सोडुन दे किंवा द्वंदाला तयार हो! हे ऐकुन जरासंध दर्प व त्वेषाने बोलला,अरे पळपुट्या!तू तर माझ्यापासुन पळुन गेला ठीक!या भीमाबरोबर बाहुयुध्द करण्यास तयार आहे.पूर्ण तयारीनिशी आखाड्यात उतरला.इकडे भीमाने श्रीकृष्णाला नमस्कार करुन तोही आखाड्यात उतरुन

समोरासमोर दोघे उभे ठाकले.आणी १४ दिवस युध्द सुरु राहिले,पण निकाल लागेना.संधी साधुन भीम कृष्णाला म्हणाला,इतके दिवस कसा तरी दम धरत लढलो,पण यापुढे त्या महावीरापुढे टिकाव लागेलसे वाटत नाही.तू बाहुयुध्दा ला सुरुवात कर!मी उपाय सुचवतो. श्रीकृष्णाला आठवले की,जरासध जन्माला आला तेव्हा त्याच्या शरीराचे दोन शकले होती. ‘जरा’ नामक राक्षसीने ती सोडली,सांधली तेव्हा तो जगला.म्हणुनच त्याला जरासंध नांव पडले.याच्या शरीरा चे दोन शकले केली तरच हा मरण पावेल हे लक्षात आल्यावर, त्याने जाडसर गवता ची काडी उभी चिरुन त्याची दोन शकले करुन दोन बाजुला टाकलेली भीमाला दाखवले.भीमाने लगेच ओळखुन जरासंधाला आपटुन उभा चिरले.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *