३५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ३५.

बलरामने जिंकलेल्या पैजेवरुन परत वाद निर्माण झाल्यावर आकाश वाणी झाली की,बलरामानेच पैज जिंकली,रुख्मी नेहमीच कपट व खोटे बोलतो,तो विश्वासाहार्य नाही.येवढ्या वरुन रुख्मीने सावध व्हायला हवे होते, पण कपटी मित्रांच्या जोरावर शेफारुन तोल सुटुन भलतेसलते बोलत बलरामा कडे तुच्छतेने हसुन बघत म्हणाला, अरे बलरामा! तुम्ही गवळ्यांची पोरं, रानात गाई चारणेच तुमचे काम!द्युत खेळणे आम्हा राजांचा षौक…उत्तेजन देणारे त्याचे मित्र होतेच.यावेळी मात्र बलरामा ला संताप अनावर होऊन, लोखंडाच्या परिघाने रुख्मीच्या मस्तकाचे तुकडे केले. गोष्ट एवढ्या थराला जाईल असे न वाटल्याने कलिंगराजा तिथुन निघाला असतां बलरामाने त्याचेही दात पाडले. शत्रुपक्षाकडील विरांची एकट्या बलरामा ने कत्तल केली.रुख्मीचा वध झाल्यावर श्रीकृष्ण मात्र तटस्थ राहिला.कारण दुःख दाखवले तर दादाला राग येईल व आनंद मानला तर रुख्मिणीला वाईट वाटेल.नव वधुसह सर्व मंडळी द्वारकेला परतली.पुढे कांही दिवसांनी रुख्मावतीला अनिवृध्द नावाचा पुत्र झाला.योग्यवेळी बाणासुराची कन्या उषाशी त्याचा विवाह झाला.


द्वारकेत श्रीकृष्णाचे व इंद्रप्रस्थात पांडवांचे जीवन सुरळीत सुरु होते,दोन्ही कडचे दूत चांगल्या वाईट वार्ता घेऊन ये जा करीत होते.द्रौपदी विवाहानंतर पांडव बंधुना नियम घालुन दिला होता की,जेव्हा द्रौपदी एका भ्रात्याबरोबर एकांतात असेल तर दुसर्‍याने त्या एकांताचा भंग करु नये.जर झालाच तर त्याने बारा वर्षे तिर्थाटन करावे.एका ब्राम्हणाच्या गाई कसाई लुटुन नेत असल्याची तक्रार आल्यामुळे शस्रासाठी नाईलाजाने युधिष्ठीर-द्रौपदी एकांतात असतांना नियमाचा भंग करावा लागल्याने त्याला बारा वर्षे तिर्थयात्रेला जावे लागले. १२ वर्षे संपल्या वर श्रीकृष्णाला भेटण्यास अर्जुन आला असतां त्याच्या सन्मानार्थ कृष्णाने रैवत पर्वतावर मोठा उत्साह केला,तिथे श्रीकृष्णाची बहिण सुभद्रा त्याच्या दृष्टीस पडली.तिच्या रुपावर अर्जुन मुग्ध झाला.

श्रीकृष्णाच्या लक्षात आल्यावर,शिवाय अर्जुनावर विशेष मर्जी असल्यामुळे सुभद्राचा विवाह त्याच्याशीच व्हावा, पण बलरामची इच्छेनुसार तिला दुर्योधनाला द्यायची होती.त्यानुसार वाटाघाटी सुरु होत्या.त्यामुळे दादा सम्मत्ती देण्याची शक्यता नव्हतीच.शिवाय दुर्योधन राजा होता,तर अर्जुन राजाचा भाऊ! म्हणुन त्याने अर्जुनाला सुभद्रेचे हरण करण्याचा सल्ला दिला.त्यानुसार मृगयेला जाण्याचे निमित्य करुन रथ घेऊन निघाला व योग्य वेळ पाहुन सुभद्रेला रथात घालुन रथ इंद्र प्रस्थाकडे हाकलला.हे वृत्त कळतांच संतापुन बलरामाने यादव सेनेला पाठलागाचा हुकुम दिला,पण श्रीकृष्ण स्वस्थ असलेला पाहुन,बलरामाच्या लक्षात सारा प्रकार आल्याने,अर्जुनाला समोपचाराने परत बोलावुन द्वारकेत त्यांचा विवाह थाटात लावुन दिला.या विवाहाने अर्जुन श्रीकृष्णाचे संबंध अधिकच दृढ झाले. दोघांचे जीव व आत्मे जणुं एक झाले.


या विवाहाने श्रीकृष्ण दुर्योधनाचा जुळुन येणारा संबंध जरी मोडला तरी पुढे जांबवती पुत्र सांबने दुर्योधन कन्या लक्ष्मणाचे अपहरण केल्याने जुळुन आला.पण खवळलेले कौरववीर कर्ण, शल्य,भूरी,यज्ञकेतू स्वतः दुर्योधन सैन्या सह सहा जणांनी त्याचा पाठलाग करुन एकट्या सांबावर बाणांचा वर्षाव केल्या वर सांबानेही त्यांचा प्रतिकार केला शेवटी बर्‍याच प्रयत्नाने कसेबसे सांबाला पकडण्यात यश मिळाले.सांबाला बांधुन लक्ष्मणासह विजयी हर्षाने परतले.हे वृत कळताच दोन्ही कुळात वैर उत्पन्न होऊ नये या हेतूने,व बलरामाचा ओढा शिष्य दुर्योधनाकडे असल्याने हे प्रकरण समोप चाराने मिटवण्याच्या उद्देशाने त्याने उध्दव कुलोपध्याय ब्राम्हणास सोबत घेऊन हस्तिनापुरला गेला.


नगराबाहेरच्या ऊपवनात छावणी टाकल्यावर, स्वतः एकदम जाणे प्रशस्त न वाटल्याने प्रथम उध्दवला पाठविले. बलराम आल्याचे कळताच,प्रथम उध्दव चे यथोचित स्वागत करुन बलरामाला भेटण्यास भीष्म,द्रोण सर्व मंडळी गेली. वातावरण मित्रत्वाचे व खेळीमेळीचे झाल्यावर वाक्चतुर बलराम म्हणाला, तुम्ही अधर्माने एकट्या सांबाशी युध्द करुन बध्द केले म्हणुन जय मिळवला अशी समजुत केलेली बरोबर नाही.सांबा ला मुक्त करुन मित्रत्व कायम ठेवा.पण कौरवांना पटले नाही.यांच्यासारख्या हीन म्हणजे गवळी कुळात आमची कन्या कधीही देणार नाही.त्यांची दर्पोक्ती ऐकुन बलरामाला अतिशय राग आला.बघा मग आतां यादवांचा पराक्रम, असे म्हणुन बलराम बाहेर येऊन हस्तिनापुरच्या दक्षिणेस नांगर जमीनीत घुसवुन पुर्ण हस्तिनापुर शहरच वर उचलुन गंगेच्या पाण्यावर तरंगत ठेवले.सगळे नगरवासी भयभीत झालेत.शेवटी कौरव शरणआले

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *