१३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!!  श्रीकृष्ण  !!! भाग – १३.

मल्लयुध्द स्पर्धेसाठी मथुरेत यमुना तीरी विस्तिर्ण मोकळ्या मैदानात मध्य भागी मल्लवीरांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी मोठा हौदा बांधला. त्याच्या भोवती उंच बिनसंधीचे खांब उभारुन प्रचंड प्रेक्षगार हजारो लोक बसतील असे तयार केले.एका उंच वेदी वर रत्नजडीत सुवर्ण सिंहासन व त्याच्या दोन्ही बाजुस सरदारांना बसण्यासाठी मंच तयार केले.तसेच इतर श्रेणीच्या व दर्जाच्या माणसांसाठी पण बसण्याची व्यवस्था केली.अंतःपुरातील राजस्रीया व सरदार स्रीयांसाठी पडदपोशीची जागा करविली. ही सर्व सुंदर रचना पाहुन केशी वधाने संतप्त कंस खुश झाला.खाण्या पिण्याची, व प्रसंग पडल्यास औषधीची पण व्यवस्था करविली.उदईक बारा वाजतांसाठी शहरांतील प्रतिष्ठीत लोकांना निमंत्रित केले.


ही सर्व तयारी झाल्यावर त्याने अक्रुराला वृंदावनला जाऊन बलराम कृष्णाला आणण्याची आज्ञा केली.त्याला पाठवल्यावर कंस थोडा स्वस्थचित्त जरी झाला तरी आंतुन तो धसकला होताच. नारदाची वाणी असत्य होणार नाही.मग आपण आपल्या मृत्युला आमंत्रण तर दिले नाही ना? यातुन मार्ग काढण्यासाठी गुप्तपणे चाणूर व मुष्टकाला बोलावुन बलराम कृष्णला कमी लेखुं नका.जीवा पाड प्रयत्न करुन शत्रुचे निर्दालन करा. त्यांनी कंसाला अश्वास्त करुन निघुन गेले तरी सुध्दा तो निश्चिंत झाला नाही.कष्णा चा आतांपर्यतचा पराक्रम पाहतां या दोन मल्लांनाही जिंकेल,मग काय करावे? उद्या अक्रुर निघणार! सुचले.. तेवढ्या मध्य रात्री त्याने दुताला पाठवुन महा बलाढ्य व मस्तवाल कुवल्यापीठ नांवा च्या हत्तीच्या माहुताला बोलावले.तो आल्यावर माहुताला म्हणाला,मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ भरपुर सोमरस पाजले ला कुवल्ल्यापीड अश्या तर्‍हेने उभा करा की,जणुं त्याच्या स्वागतासाठी उभा आहे.


आणि कृष्ण दरवाज्याजवळ आला की, बेफाम हत्तीने त्याला चिरडुन टाकावे. महाराज! आपण निश्चिंत असावे.आज्ञे प्रमाणे होईल, असे म्हणुन माहुत निघुन गेला आणि कंस कांहीसा स्वस्थ होऊन निद्राधिन झाला.
माहुताच्या आश्वासनाने कंस थोडा स्वस्थ झोपला, त्याचवेळी सर्वमान्य वयो वृध्द अंधकाच्या घरी कंसाच्या जुलमाने त्रस्त झालेले सर्व यादव,वृष्णी,भोज इत्यादी क्षत्रिय मध्यरात्री जमुन कंसाच्या निर्दलनासाठी विचारविनिमय करुं लागले. कंसाने निष्कारण वसुदेवाची केलेली निंदा व निरपराध बलराम कृष्णा ला ठार मारण्याचा त्याचा बेत म्हणजे जुलुमाचा कळसच झाला.श्रीकृष्णाला वाचवुन कंसाचा काटा काढण्यासाठी अक्रुराला आपल्याकडे वळविण्यासाठी त्याला आताच गाठावे लागेल.अक्रुर आल्यावर प्रथम त्याच्याकडुन वचन घेऊन कंसाचा बेत कृष्णाच्या कानी घालण्यास सांगुन कंसाचा कायमचा बंदोबस्त केल्यास कोणीही हरकत घेणार नाही असे सुचवण्यास सांगीतले.या कामगिरीच्या बदल्यात आहुकाची कन्या सुगात्री देण्याचे आश्वासन दिले.


खरें तर अक्रुराचा कल आधी पासुनच श्रीकृष्णाकडे होता.पण कंसाच्या दहशतीमुळे त्याला शक्य नव्हते.पण आता मोठ्या आनंदात रथ घेऊन संध्याकाळच्यावेळी वृंदावनास नंद वाड्यात पोहोचला.सौंदर्याचा पुतळा,दुर्ज नाचा कर्दनकाळ समोर दिसतांच त्याच्या दर्शनाने अक्रुर सद्गदीत झाला.हाच..हाच! तो दुष्ट संहारक!अक्रुरचे ह्रदय भक्तीभावा ने दाटुन आले.तेवढ्यात श्रीकृष्णाची नजर पडल्याबरोबर त्याला कडकडुन मिठी मारली.मथुरेहुन रथ घेऊन अक्रुर कशासाठी आला हे जाणण्यासाठी गोप जमा झाले.अक्रुराने सांगीतले की,कंस राजाने धनुर्यज्ञाचे व कुस्त्याचे आमंत्रण देण्यासाठी मला पाठविले.कृष्णाला म्हणाला,तू वसुदेवपुत्र आहे हे कंसाला समजल्यापासुन तो वसुदेवाला त्रास देत आहे.कृष्णा! वसुदेव-देवकी तुझ्या वाटे कडे डोळे लावुन बसले आहेत.गेली १६-१७ वर्षापासुन अपार दुःख यातना भोगत आहेत,आतां त्यांचे ऋण फेडण्या ची वेळ आली आहे. उद्या मथुरेला जाण्याची तयारी करण्यात रात्र संपली.


जेवणे झाल्यावर नंदाघरी अक्रुर, बलराम कृष्ण एकांतात रात्रभर खल करीत बसले होते.नंद आपल्या खोलीत बिछान्यावर बेचैनावस्थेत पहुडले होते. कृष्ण मथुरेला जाणार म्हणजेच तो कायमचा जाणार!कृष्ण आपला पुत्र नसुन वसुदेवाचा आठवा पुत्र व त्याच वेळी आपल्याला झालेली मुलगी घेऊन गेला ही हकिकत कळल्यावर त्याच्या वियोगाची वेळ इतक्या लवकर व अचानक येईल असे त्याला वाटले नव्हते. गेली १६-१७ वर्षे वसुदेव देवकीला पुत्र विरहाचे दुःख सहन करावे लागले,त्या मुळे आतां त्याला मथुरेला जाणे क्रम प्राप्तच आहे.आता वृंदावनाचा आनंद जाणार म्हणजे एकप्रकारे प्राणच जाणार यामुळेच नंद जास्त अस्वस्थ झाले.यशोदे च्या दुःखाला तर पारावारच राहिला नाही.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇