३६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ३६.

बलरामाचा अद्वितिय पराक्रम पाहुन दुर्योधनादी कौरव मंडळी शरण येऊन म्हणाले, भगवान! तुझी शक्ती अनंत आहे.आमच्या अपराधाला क्षमा कर! सांबाला मुक्त करुन आनदाने व आदराने लक्ष्मणा त्याला अर्पन केली. बलरामाच्या या अद्भभुत पराक्रमाची खुण आजही हस्तिनापुरच्या दक्षिण बाजुस नांगराचा फाळ घालुन ओढल्याने शहराच्या त्या बाजुला आलेला उंचवटा अद्यापही कायम आहे.


अभिमन्युच्यावेळी गरोदर असलेल्या सुभद्रेला पहिली प्रसुती माहेरी व्हावी या प्रथेनुसार विवाहानंतर प्रथमच श्रीकृष्ण तिला न्यायला इंद्रप्रस्थाला गेल्यावर त्याचे यथोचित स्वागत झाले.श्रीकृष्णाचा मुक्काम अर्जुनाच्या महाली असे.एकांतात अनेक विषयांवर बोलणी होत नदी किनारी फिरायला जात.असेच बोलत असतांना तिथे मनुष्यरुप धारण केलेले अग्निदेवता त्यांच्याजवळ येऊन हात जोडुन म्हणाले,भगवान! मी भुकेला आहे माझी भुक शांत कर!

तसही इंद्रप्रस्थाच्या पश्चिमेस खांडववन हे घनदाट अरण्यात रानटी लोक व हिंस्र पशुंचा उपद्रव राज्या ला नेहमीच होत असल्यामुळे कृष्णार्जुनाने ते खांडववन अग्निला देण्याचे मान्य केले.
अग्नीला कबुल केल्यानुसार कृष्णार्जुनाने ते दाट अरण्य सगळीकडुन पेटवुन दिले.आग एवढी भयानक भडकली की,त्यातुन कोणीही बाहेर पडु शकले नाही.तिथे राहत असलेल्या मया सुराला कृष्णाने वाचवुन सुरक्षित बाहेर जाऊ दिले.त्याच वनांत तक्षक नावाचा नाग बाहेर गेलेला असल्यामुळे वाचला आणि त्याचा भाऊ युक्तीने निसटला. तेव्हापासुन ते दोघेही पांडवांचे व त्यांच्या पुढील वंशाचे कायम शत्रु बनले.खांडव वन जळल्यामुळे पांडवांना वसाहतीला व शेतीला मोठा मुलुख मिळाल्याने राज्याची भरभराट जलद गतीने झाली.अग्नीतुन वाचलेल्या मयासुराने कृतज्ञतेने पांडवांना इंद्रप्रस्थात दिव्य मयसभा बांधुन दिली. या दिव्य मयसभा व पांडवांच्या अतुल पराक्रमाची किर्ती भरत खंडातच नव्हे तर त्रिभुवनात पसरली.


श्रीकृष्णाचे वय आता ६६-६७ वर्षाचे झाले होते.त्याचे गृहस्थश्रमी आयुष्य जीवनक्रम सुरळीत व आनंदात सुखात चालले होते.तो सर्वांना सुख देत व स्वतः भोगीत सर्व कर्तव्ये पार पाडीत होता.अगदी बालवयापासुन ते आतांपर्यंत लोकांसमोर स्ववर्तनाने,कृतीने आदर्श ऊभे केले होते.हा विष्णुचा अवतार आहे याची जाणीव लोकांना झाली होती.
परित्राणाय साधूनां।विनाशाय च दुष्कृतोम् । धर्म संस्थापनार्थाय। संभवामि युगे युगे ।। या वचनाप्रमाणे अवतार कार्य पुर्ण करण्याची वेळ हळु हळु जवळ येत होती.उन्मत्त क्षत्रियांचा भार हलका करण्याविषयी पृथ्वीने श्रीविष्णुंना प्रार्थना केली होती.त्यानुसार स्वतः विष्णुने कृष्णरुपाने अवतार घेऊन पृथ्वीवर आले.
एके दिवशी नित्याप्रमाणे श्रीकृष्ण ‘सुधर्मा’ सभेत बसला असतां दूत

आल्या चे सांगीतल्यावर सभेतच घेऊन यायला सांगीतले.दूत आंत येऊन तेजस्वी श्रीकृष्णाकडे पाहुन मनोभावे नमस्कार करीत सांगु लागला,जरासंधाने द्विग्विजय करण्याचे ठरवुन अफाट सैन्यानिशी सगळीकडे भ्रमण करुन ज्या राजांनी करभार दिला त्यांना मांडलिक व ज्यांनी दिला नाही त्यांना जिंकुन बंदिवासात टाकले.त्यांचा नरमेध यज्ञ करणार आहे. म्हणुन सगळ्या राजांच्या वतीने मदती साठी आपल्याकडे पाठविले आहे.ठीक! तू सर्व राजांना अशास्तव करुन सांग की, त्यांची लवकर सुटका करीन.दूत कृतज्ञ होऊन वंदन करुन हे शुभ वर्तमान राजांना कळविण्यास निघुन गेला.


जरासंध तसा अवध्य,त्याच्या जवळ अगणित सैन्य पण “सुष्टांचे संरक्षण आणि दुष्टांचे निर्दालन” हेच या लोकीचे माझे कार्य आहे.सभा बरखास्त करुन उठणार तेवढ्यात इंद्रसेन नामक दूत इंद्रप्रस्थावरुन धर्मराजाला कांही सल्लामसलत करण्यासाठी तातडीने बोलवल्याचा निरोप सांगीतला.श्रीकृष्ण आपल्या अष्टभार्यांसह इंद्रप्रस्थाकडे रवाना झाला.अष्टभार्यांसह श्रीकृष्ण येत असल्याचे आनंदवृत्त समजल्याने धर्भ राजा आपल्या राजवैभवानिशी श्रीकृष्णा ला सामोरे गेले.भव्य मिरवणुकीसह वाजत गाजत जयघोषात श्रृंगारलेल्या इंद्रप्रस्थ नगरीत प्रविष्ट झाले.दारोदारी सुवा सिनींनी पंचारतीने ओवाळले.जंगी वैभव शाली मिरवणुक राजवाड्याजवळ पोहोचली .श्रीकृष्णांच्या अष्टभार्यांना द्रौपदीला पाहण्याची उत्सुकता लागली होती.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भ. श्रीकृष्ण संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *