५३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ५३.

एकलव्या! आज तूं मुक्त झालास.. सदेही स्वर्गात जाण्याचा त्याला आशिर्वाद दिला.तो गेल्यावर,श्रीकृष्णाने मनासहित निरोध करुन समाधिस्त झाला आणि क्षणांत त्याचा आत्मा देहत्यागुन अनंतात विलिन झाला.यादवांची यादवी संहाराची आणि बलराम-श्रीकृष्णाच्या निधन वार्ता दारुकाकडुन पांडवांना कळल्यावर त्यांना अतिव दुःख झाले.श्रीकृष्ण सखा अर्जुन द्वारकेला पोहोचल्यावर,आतांपर्यत आवरुन धरलेला शोकावेग अर्जुनाला पाहुन अनावर झाला.कठोर काळजाच्याही व्यक्तीचे पाणी व्हावे असा तोआक्रोशावेग पाहुन अर्जुनाचे ह्रदय शतशः विदिर्ण झाले.दुःखावेगाने श्रीकृष्ण…श्रीकृष्ण म्हणत मूर्च्छा येऊन पडला.


थोड्या वेळाने सावध झाल्यावर कसेबसे उठुन मामा-मामीं अत्यंत वृध्द व पुत्र शोकाने गलितात्र होऊन खिळलेल्या वासुदेव देवकीच्या भेटीला गेल्यावर त्यांची गलितात्र अवस्था पाहुन अर्जुनाचे ह्रदय गलबलुन गेले.त्याने वासुदेवाचे पायावर मस्तक ठेवल्यावर,आशिर्वाद देत म्हणाला,ज्यांनी हजारो शत्रु जिंकले,ते सर्व वृष्णीवीर,यादव,पुत्र,पौत्र,मित्र,ज्ञाती, बंधु सर्वांच्या निधनानंतर श्रीकृष्ण इथे येऊन म्हणाला,अर्जुन म्हणजे मीच असे समजावे.तो इथे येऊन तुमची व्यवस्था लावुन देईल.अरे! अर्जुना,माझ्या प्रिय, लाडक्या पुत्राचे,योगेश्वर,पुरीषश्रेष्ठाच्या स्वर्गारोहनाची वार्ता ऐकुनही मी अद्याप जिवंत आहो हे आश्चर्य नाही का?


बरेच दिवसांपासुन अन्न वर्ज्य करुन तुझ्या आगमनाची वाट बघत होतो.आतां एखाद्या दिवसाचाच सोबती आहे.या शून्य नगरीत क्षणभरही राहवत नाही. श्रीकृष्णपुत्र अनिवृध्दाचा पुत्र व्रज यास यादवांच्या राज्यावर बसवुन तुम्हा सर्वांना इंद्रप्रस्थाला नेऊन तीथे तुमची व्यवस्था करतो.येत्या सात दिवसांत सर्व तयारीनिशी आपण निघणार आहोत.रात्र भर अर्जुनाला झोप नाही आली.श्रीकृष्ण व त्याच्या जीवनातले सर्व गोष्टी त्याच्या नजरेसमोर चलचित्राप्रमाणे सरकु लागले.त्यालाही पृथ्वीवरचे जीवन लवकर संपवुन त्याच्या भेटीला जाण्याची त्याला घाई झाली.


पहाटेच्या सुमारास पुत्रशोकाने वासुदेवाने या जगाचा निरोप घेतला. द्वारकेतील उरलेले प्रजाजन अंत्ययात्रेला सामील झाले.वासुदेवाचा मृतदेह रत्न जडीत ठेवलेल्या शिबिकेच्या मागुन देवकी,भद्रा,रोहिणी,मंदिरा त्यांच्या सुना व इतर स्रीया चालत होत्या.वासुदेवाला अत्यंत प्रिय असलेल्या स्थळी अग्नि संस्कार झाला.त्यांच्या चारही राण्यांनी सहगमन केले.लव्हाळ्याची मुसळे बनुन जिथे एवढा घोर विनाश,नरसंहार झाला, ब्रम्हपाशाचा येवढा भयंकर परिणाम झाला,भोज,अंधक,यादव, आपापसात लढुन विनाश पावले त्याठीकाणी अर्जुना ने त्या सर्वांच्याच योग्यतेनुसार अग्नी संस्कार केल्यावर,बलराम,श्रीकृष्णाचा देह जिथे होता तिथे गेल्यावर,योगमग्नाव स्थेतील बलरामाचा पार्थिव देह दिसला. थोड्याच अंतरावर एका अश्वस्थ वृक्षा खाली, अर्जुनाचा सखा,सकल तत्वनेता योगाचा प्रणेता महायोग निद्रेत,शरीरा वरचे तेज,मुखावरची अलौकिक कांती विलसत असलेला अर्जुनाचा सर्वस्व असलेला श्रीकृष्ण,व्याधाने मारलेला बाण त्याच्या सुकुमार नाजुक पाऊलात तसाच रुतुन बसलेल्या अवस्थेत पाहुन त्याचा धरबंध सुटला व अतिशय शोकमग्न झाला असतां त्याच्या कानी आवाज गुंजला,अरे पार्था! कशासाठी हा शोक?अरे!मी कोण? व तूं कोण हे जाणतोस ना?ज्या कार्यासाठी आपण पृथ्वी वर अवतलो होतो ते कार्य आतां संपले आहे.
“यदा यदा हि भर्मस्य ग्लानिर्भवति भारत


अभ्युत्यानम् धर्मस्य तादात्मानं सृजाम्यहम्।” तू ही आतां लवकरच येशील.अर्जुन भानावर आला.राम-कृष्णा च्या आत्याकरवी त्यांच्या देहाचा अंतिम अग्निसंस्कार केला.रुख्मिणी,शैल्या, हेमवती व जांबवंती यांनी सहगमन केले. सत्यभामा व दुसर्‍या स्रीया तपश्चर्ये करितां वनांत निघुन गेल्यात.
सातव्या दिवशी सर्व शोकाकुल स्रिया,मुले व उरलेले लोकं संपत्तीसह हस्तीनापुराकडे रवाना झाले.मार्गात पंच नद नामक समृध्द देश लागला.तिथे पार्था सहित सर्वांनी थोडावेळ मुक्काम केला. पण…..
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

इ – ई

माहिती उपलब्ध नाही.

माहिती उपलब्ध नाही.

ए – ऐ

एकनाथ महाराज गाथा, App-डाऊनलोड-करा.

एकनाथ महाराज चरित्र app डाऊनलोड-करा.

एकनाथ महाराज गाथा पहा.

एकनाथ महाराज चरित्र पहा.

एकादशी व्रतलाभ १

एकनाथ महाराज चिरंजीव पद

श्री संत एकनाथ महाराज संपूर्ण

ओ – औ.

माहिती उपलब्ध नाही.

अं- अ:

माहिती उपलब्ध नाही.

ख, खा, खि,…….

घ, घा, घि,…….

माहिती उपलब्ध नाही.

च, चा, चि,…….
छ, छा, छि,…….

माहिती उपलब्ध नाही.

ज, जा, जि,…….

जनाबाई चरित्र App-डाऊनलोड-करा.

जनाबाई गाथा App-डाऊनलोड-करा.

जेवण-भोजन प्रकार

झ, झा, झि,…….

माहिती उपलब्ध नाही.

ट, टा, टि,…….

माहिती उपलब्ध नाही.

ठ, ठा, ठी,……

माहिती उपलब्ध नाही.

ड, डा, डि,……..

माहिती उपलब्ध नाही.

ढ, ढा, ढी,……..

माहिती उपलब्ध नाही.

थ, था, थि,…….

माहिती उपलब्ध नाही.

फ, फा, फि,…….

माहिती उपलब्ध नाही.

ल, ला, लि,…….

माहिती उपलब्ध नाही.

ष, षा,………
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *