२३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – २३.

हेरांनी बातमी आणल्यानुसार या डोंगराच्या चारही बाजुस आग लावुन दोघांनाही जाळुन मारण्याचा सल्ला शिशु पालने दिल्याचा जरासंधाचा बेत कळल्या वर तिथल्या रहिवास्यांना पलीकडील डोंगरावर तात्काळ जाण्याचा आदेश दिला.दुसर्‍या दिवशी सगळी अगणित सैन्यांनी गवत,शेण्या,लाकडे गोळा करुन दुसर्‍या दिवशी सकाळी पर्वताच्या सभोवार रचुन आग पेटवुन दिली.चोहो बाजुंनी आगीचे प्रचंड लोट आकाशाला भिडु लागले.सगळीकडे हाःहाकार माजला. मोठाल्या शिळांचे तुकडे उल्का प्रमाणे चारही बाजुस उडु लागले.डोंगरा तील धातु वितळुन त्याचे पाट वाहु लागले मोठमोठ्या वृक्षांचे प्रचंड निखारे खाली पडु लागले

. मोठमोठे साप,श्वापदं,पक्षी गुदमरुन मरुन पडुं लागले.मेरुसमान सुंदर पर्वत दोन दिवस धगधगत होता. आगीच्या भयंकर तापाने जरासंधाचे सैनिक अर्धा कोस मागे हटले.आपल्या मुळे या सुंदर पर्वताची दुर्दशा झालेली पाहुन बलराम कृष्णाला अतिशय वाईट वाटले.आणि क्रोधायमान होऊन,श्रीविष्णु चे हे दोन योध्दे आपापली आयुध्यानिशी शत्रुसैन्यावर तुटुन पडले.शेवटी पराभूत जरासंध व इतर राजांनी उरलेले सैन्य घेऊन तेथुन पळ काढला.दोघेही विजयी बंधु क्रौंचपुरला परत आलेत.


तिथले शिशुपालचे पिता दमघोष व क्रौंचपुरच्या राजाने त्यांच्या अद्वितिय पराक्रमाची तारीफ केली.चेदिपती दमघोषाला श्रीकृष्णाची सख्खी आत्या, वसुदेवाची बहिण दिली असल्याने शिशूपाल हा कृष्णाचा आतेभाऊच! या संबधाची आब राखुन दमघोषाने जरासंध ची साथ सोडली.त्याने दोघा बंधुचा सत्कार करुन उत्तम वस्रालंकार,सैन्य,रथ देऊन सन्मानाने त्याची उत्तरेला मथुरेकडे रवानगी केली.राम-कृष्णांची पदयात्रा पुर्ण झाली.
गर्वाने फुगलेला व उन्मत्त झालेल्या शृगाल राजाच्या कानी या दोघांच्या पराक्रमांच्या व गोमंत युध्दाच्या वार्ता कानी गेल्या होत्या.त्याने “सावित्री” व्रत करुन सूर्याकडुन दिव्य रथ प्राप्त केला. त्या दिव्य रथात बसुन कृष्णाला युध्दाचे आव्हान केले.दोघांचे द्वैरथयुध्द सुरु झाले त्याच्याकडुन येणारे सर्व बाण श्रीकृष्णाने सहजतेने तोडुन टाकले आणि सुदर्शन चक्राने त्याची छाती फोडली.याप्रमाणे करविरच्या शृगाल राजा आपल्या गर्वाने विनाकारण युध्द करुन मरण पावला.

श्रीकृष्णाने त्याच्या सर्व राण्यांचे सांत्वन करुन पद्मावतीच्या लहान मुलाला शास्रोक्त पध्दतीने राज्याभिषेक करवुन करवीरच्या राजसिंहासनावर बसविले.
श्रीकृष्ण बलराम नुसते विजयीच नव्हेतर धनुर्धर ही श्रेष्ठ पदवी प्राप्त करुन येत असल्याचे वृत्त कळल्यावर सारी मथुरा नगरी सजवुन वसुदेवांसह उग्रसेन व सगळे राजसेवक उत्तम पोषाख करुन सीमेजवळ सामोरे गेले.सोळा श्रृंगार केले ल्या स्रीया मंगल कलश व आरती घेऊन आपपाल्या दारांत स्वागतासाठी उभ्या राहिल्यात.दुतर्फा जमलेल्या हजारों लोक जयघोष व मंगल वाद्यांच्या गजरांत बलराम-कृष्णाने प्रवेश केला.सर्वप्रथम दोघांनी आपल्या मातापितांच्या पायावर नतमस्तक होऊन त्यांचा आशिर्वाद घेतला.


मथुरा नगरी निर्भय झाली.उग्रसेनच्या उत्कृष्ट कारभाराने मथुरा नगरी परत भरभसाटीस येऊ लागली.पाहतां पाहतां तीन वर्षे सरली हे कळलेही नाही. सर्व स्थीर स्थावर झाल्या वर आप्तांचा शोध घेऊ लागले,कारण कंसाच्या जुलमाने बंदीवासात बरीच वर्षे गेल्यामुळे ते नातलना दुरावले होते.शोध घेत असतांना आपली आत्या पृथा(कुंती) नुकतेच पंडुराजाचे निधन झाल्यामुळे आपल्या पांच पुत्रांना घेऊन निराश्रित अवस्थेत हस्तीनापुरच्या राजगृही आले. पांडुनंतर अंध धृतराष्र्ट मंत्रीमंडळाच्या सहाय्याने राज्यकारभार चालवित होते. श्रीकृष्णाने अक्रुराला कुंतीआत्या ला अश्वास्त करण्यासाठी पाठवले.नुकती च चेदिपती दमघोषची पत्नी,शिशुपालची आई,भाऊ वसुदेवाला भेटण्यास आलेली होती. तिच्या विनंतीवरुन श्रीकृष्णाने शिशुपालचे १०० अपराध माफ करण्याचे वचन दिले.व्रज वृंदावन सोडुन सात वर्षे झाली होती.या सात वर्षात सतत युध्दात गुंतुन जुलमी राजांचा बिमोड केला. सुरु वात कंसयुध्दापासुन झाली.पराभूत जरासंध स्वस्थ बसणार नाही ही जाणीव होती कृष्णाला!

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *