संध्या अभंग – झाली संध्या संदेह माझा गेला … वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – झाली संध्या संदेह माझा गेला
भारुड – संध्या Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

संध्या अभंग प्रारंभ
झाली संध्या संदेह माझा गेला
झाली संध्या संदेह माझा गेला ।
आत्माराम ह्रदयीं शेजे आला ॥धृ॥

गुरुकृपा निर्मळ भागिरथी ।
शांति क्षमा यमुना सरस्वती ।
असीपदें एकत्र जेथें होती ।
स्वानुभव स्नान हें मुक्तास्थिती ॥१॥

सद्‍बुद्धीचें घालुनि शुद्धासन ।
वरी सद्‍गुरुची दया परिपूर्ण ।
शमदम विभूति चर्चुनी जाण ।
वाचे उच्चारी केश‍व नारायण ॥२॥
बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां ।
ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां ।
भक्ति बहीण धावूनि आली गांवा ।
आतां संध्या कैसी मी करूं केव्हां ॥३॥

सहज कर्में झालीं तीं ब्रह्मार्पण ।
जन नोहे हा अवघा जनार्दन ।
ऐसें ऐकतां निवती साधुजन ।
एका जनार्दनीं बाणली निज खुण ॥४॥
संध्या अभंग समाप्त

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *