४० भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ४०.

धृतराष्र्टाने द्रौपदीस वर मागण्यास सांगीतल्यावर,आपले पती दास्यातुन मुक्त व्हावे! त्यांनी आणखी वर मागण्यास सांगीतल्यावर,माझ्या पतीचे राज्य परत मिळावे!असे म्हनुन धृतराष्र्टां ना वंदन करुन आंत निघुन गेली. सभा बरखास्त झाल्यावर युधिष्ठीर आपल्या परिवारासह इंद्रप्रस्थाकडे रवाना झाला.पण दुर्योधनादी चांडाळ चौकडीने एवढा रचलेला डाव,हाती आलेले पृथ्वीचे साम्राज्य पित्याने ऊधळुन लावल्याने दुर्योधनाचा संताप संताप झाला.पण शकुनीने झटपट नवा डाव रचुन दुर्योधना ला, तात्काळ धृतराष्र्टाकडे पाठविले.तात सापाच्या शेपटीवर पाय

देऊन तसाच सोडला तर दंश,सूड घेतल्याशिवाय राहणार नाही.तात! ते निश्चित सूड उगवुन आमचा सर्वनाश करतील.हे जर टाळाय चे असेल तर! आताच्या आता युधिष्ठीरा ला परत बोलवा.आम्ही फक्त एकच पण लावतो.जो हरेल त्याने १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासात जावे.लाडका पुत्र काकुळतीला आलेला पाहुन,अंध धृतराष्र्टाने पांडवांना परत बोलावले. धर्मराज पुन्हा परतला,नाही..त्याला परतावेच लागले.कारण युध्द आणि द्युता ला क्षत्रिय नकार देऊच शकत नाही.परत द्युताचा पट मांडल्या गेला.आणि युधिष्ठीर “पण” हरला.ठरल्याप्रमाणे युधिष्ठीर चारही बंधु व द्रौपदीसह वल्कले नेसुन वनवा साला निघाले.कुंती निरुपायाने विदुराघरी राहिली.हे सर्व वृत्त दूताकडुन श्रीकृष्णाला कळल्यावर पांडवांची व सखी,लाडक्या बहिणीची दुर्दशा ऐकुन त्याला खुप दुःख झाले.पण या अवतार कार्यात पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी ज्या गोष्टी घडवुन आणायच्या आहेत. त्यामुळे तो शांत झाला.


काम्यवनात वास्तव्यास असलेल्या पांडवांना भेटण्यासाठी जाण्याचा निश्चय कृष्णाने केला.पांडवांची काम्य वनातील दिनचर्या सुरुळीत सुरु होती. वनवासाला सुरुवात झाल्यामुळे युधिष्ठीर अत्यंत दुःखी व अंतर्मुख झाला होता.माझे भ्राते शूर व अजिंक्य असुनही,याज्ञसेनेची विटंबना अगतिक होऊन केवळ माझ्यासाठी पाहत बसले.धिक्कार असो माझा….तो स्वतःच्याच दुःखात चुर असतांनाच,कृष्ण येत असल्याची वार्ता अर्जुनाने सांगीत ल्यावर,त्याच्या मनाची उद्गिनता व दुःख विसरुन,सर्व बंधु,ऋषीमुनींसह कृष्ण स्वागतासाठी सामोरे गेले.सोबत इतरही देशाचे राजे होते.ते कौरवांच्या नीच कृत्या ने क्रुध्द झाले होते.याज्ञसेनेची भरसभेत झालेल्या विटंबनाचे वृत्त कळल्यापासुन श्रीकृष्ण विलक्षण संतापला होता.पण अर्जुनाने अपल्या मृदु बोलाने शांत केले.


भोजन आटोपल्यावर सर्वजण ऋषीमुनीं सभोवताल बसल्यावर, कृष्ण यीधिष्ठीराला म्हणाला,राजसूययज्ञात माझी अग्रपुजा केल्यामुळे शिशुपालाला सहन न झाल्याने तो उन्मत्त बनल्यामुळे त्याचा वध करावा लागला.त्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी क्रोधीत शाल्व मी द्वारकेत नाही ही संधी घेऊन,द्वारकेवर स्वारी करुन द्वारकेचे अतोनात नुकसान तर केलेच शिवाय हाती लागेल ती संपत्तीही पळविली.राजसूययज्ञ आटोपुन जेव्हा द्वारकेला गेलो तेव्हा शाल्वाचे कृत्य कळ ल्यावर त्याचे परीपात्य करुन द्वारकेस परतलो तेव्हा द्युताची अनर्थकारी वार्ता कळली.युधिष्ठरा!कौरवांचे दिवस आता भरत आलेत,जो अधर्माने वागतो,त्याचा नाश निश्चित आहे.


धर्मा पांडवांचा अपमान तो प्रत्यक्ष माझा अपमान! कृष्ण एकदम क्रुध्द झालेला पाहुन,नित्य प्रसन्नमुखी,संयमी अर्जुन त्याला शांत करीत म्हणाला, माधवा!पुर्वी तूं मनोवृत्ती,आचरणाने गध मादन पर्वतावर बरीच वर्षे फिरलास,फक्त जलप्राशन करुन बराच काळ राहिलास, मधुसुदना!बद्रीकाश्रमात केवळ वायु भक्षण करीत एका पायावर उभा होतास! भगवंता! लोकांची प्रवृत्ती धर्माकडे वळावी म्हणुन स्वतः नियमनिष्ठ होऊन प्रभास तिर्थावर जाऊन घोर तपश्चर्या केलीस!श्रीकृष्णा तूं अंतरात्मा असुन सर्व प्राण्यांचे आदिकरण आणि लय पावण्याचे स्थान आहेस.यदूनंदना!तू आदितीचा पुत्र होऊन विष्णु नांवाने प्रसिध्द झालास. श्रीकृष्णा!तुझ्या ठीकाणी क्रोध,मत्सर, असत्यपणा अगर क्रोर्य असुच शकत नाही.अर्जुनाचे बोलणे ऐकुन श्रीकृष्णाचा क्रुध्द चेहरा सौम्य झाला.कांहीशा गंभीर स्वरात म्हणाला,अरे पार्था! माझाच तू व तुझाच मी! दोघेही एकरुप आहोत.हे अजिंक्य अर्जुना! तू नर असुन मी श्रीहरी स्वरुप नारायण आहे.आपणा उभयंतातील अंतर कोणालाही कधीच कळणार नाही.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *