५१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग –
५१.

अतिशय दुःखी अंतःकरणाने कृष्णा ला म्हणाला,म्हणजे तूं आपला अवतार संपवणार?अरे!आजपर्यंत क्षणभरही तुझे चरण सोडुन दूर झालो नाही.तुझ्या सर्व मंगलकारक लिला प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहुन,कानांनी ऐकुन तृप्त झालो.तुझा ‘वियोग” ही कल्पनाही करवत नाही रे… अरे!तुझ्याशी एवढा तदृप,एकजीव झालो की,तुझ्यावाचुन क्षणभरही जिवंत राहु शकणार नाही.परमेश्वरा! तुला थोडीही दया येत नाही का रे? तूं दयाळु होऊन मलाही सोबत ने रे!तूं खरच कां सोडुन जाणार? अवतार संपवणार?


उध्ववा!शांत हो!आणि मी जे कांही सांगतो ते लक्षपुर्वक ऐक.असे म्हणुन श्रीकृष्णाने त्याला ब्रम्हज्ञानाचा उपदेश केला.ऊध्ववा!मी सर्व भूतांच्या ठीकाणी अंतर्बाह्य भरुन आहे हे समजुन स्वतःच्या अंतःकरणांत माझे स्वरुप ओळखाण्याचा प्रयत्न कर! हे महाप्रज्ञा उध्ववा!अखिल भूतांच्या ठायी माझी भावना करुन सम दृष्टीने वागल्यास ज्ञानरुपी दृष्टी प्राप्त होऊन समतेने वागण्याचा प्रयत्न कर,या मुळे परब्रम्हाचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्या वर,संशयाचा निचरा होऊन सर्व जग ब्रम्हमय भासु लागेल.क्षणभंगूर देहाने,नित्य, अव्यय अशी माझी प्राप्ती करुन घेणेच या धर्माचे मुख्य उद्दीष्ट आहे.


ऊध्ववा! तुला ब्रम्हविद्येचा सर्व मतितार्थ सांगीतला आहे.तेव्हा तुझ्या अंतःकरणातला शोक,मोह विकार दूर झाले असावेत.उध्ववा हा उपदेश फक्त जो सच्छिल,पवित्र व ज्याची माझ्यावर निष्ठा,श्रध्दा आहे त्यालाच सांग!उध्ववाने श्रीकृष्णाच्या चरणांवर नतमस्तक होऊन अनन्य भक्तीभावाने म्हणाला,हे यदुश्रेष्ठा! माझा मोह अंधकार पुर्णपणे नाहिसा झालाय!मी तुला शरण आलो.माझ्यावर फक्त एकच अनुग्रह कर,एक शेवटची विनंती की,तुझ्या चरणकमळाची भक्ती सतत लाभावी!तथास्तू….तु बद्रीकाश्रमी जाऊन लोकांना बोध मिळावा या हेतूने, सर्व सुखाचा त्याग व निःस्पृह,सद्वर्तन व इंद्रियदमन करुन शांती धारण कर!बुध्दी स्थिर करुन ज्ञान विज्ञानाचा विचार करुन,आजपर्यंत जे कांही माझ्याकडुन शिकलास त्याचे एकांतात परिशिलन करुन लोकांपर्यंत पोहोचव.हेच “भागवत” किंवा ऊध्वगीता म्हणुन प्रसिध्द होईल. उध्ववाने भगवान श्रीकृष्णाच्या पायावर अश्रुंचा अभिषेक केला.पण लगेच स्वतःला आवरुन उठुन उभा राहिला. श्रीकृष्णाला सोडुन जाववेना.अखेर त्याच्या पादुका छातीशी कवटाळुन सरळ बद्रीकाश्रमाचा रस्ता धरला.


इकडे दुर्वास ऋषींच्या शापानुसार दुसरे दिवशी सांबाला खरोखरच मुसळ झाले.सर्व यादव घाबरले,पण श्रीकृष्णा कडे जाण्याचे धाडस कुणालाच नसल्या मुळे,त्यांनी ही वार्ता वासुदेवाला सांगीत ल्यावर,त्या मुसळाचे चुर्ण करुन समुद्रात फेकण्यास सांगीतले.त्याचवेळी अनेक उत्पात घडु लागले.यादवांचे मदिरापान, अनाचार,स्वच्छंद वर्तन वाढु लागले.स्रीया ही बहकल्यात.यादवांच्या आणि स्रीयांच्या अनाचाराने श्रीकृष्ण उद्गिन्न झाला. पण हे सर्व अनर्थ त्यानेच उत्पन्न केले असल्यामुळे त्यांना प्रतिकार करणे अशक्य होते.


वृध्दांना व मुलांना शंखोद्वारास व बाकी सर्व श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार प्रयासतिर्थी जायचे ठरले.दुसरे दिवशी (कार्तिक वद्य) अमावस्या व सूर्यग्रहण होते.शहरांत होणारे उत्पाद व हा कुयोग मनांत आणुनच श्रीकृष्णाने सर्वासह प्रभासतीर्थी जाण्याचा सल्ला दिला होता. सर्व यादव सरस्वती नदी समुद्राला मिळते त्या प्रभासतीर्थावर पोहोचले.तिथे सर्वांनी पर्वस्नान केले.ब्राम्हणांना विपुल दान केले नाना तर्‍हेचे भक्ष्ये,मेजवानी,नाचगायन,

मद्यपान सुरु झाले.द्वारकेत जरी मद्याला बंदी असली तरी इथे नव्हती.मैश्यक मद्य अतिशय उत्तेजित असल्यामुळे सर्वांच्या बुध्दीवरचे कंट्रोल जाऊन ते इतके उन्मत्त बेभान झाले की,त्यांना कशाचेही भान न राहिल्याने एकमेकांचे जुने उखाळे पाखळे काढु लागले. सात्यकी व कृतवर्मा ची चांगलीच जुंपली.व त्या भांडणांत दोन्ही कडच्या लोकांचे व त्या दोघांचाही वध झाला.चोहोकडे आसपास काटाकाटी सुरु झाली.नशेत ना बंधु,ना मित्र पाहिले.हजारो यादव-भोज एकमेकाशी लढुन मरण पावले.त्यांच्या जवळची शस्रे संपल्यावर समुद्र किनारी ऊगवले ल्या लव्हाळ्यांनी एकमेकांवर वार करुं लागले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *