५४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ५४.

दैवच फिरले होते.तिथे आभीर नामक रानटी लोकांची वस्ती होती. एवढ्या मोठ्या संख्येत असणार्‍या स्रियांच्या रक्षणार्थ एकटा अर्जुनाला पाहुन,त्या जमातीने स्रीयांचे हरण सुरु केले.पार्थाने जे गांडीव धनुष्य आजपर्यंत सहजतेने पेलत होता, ते धनुष्य विलक्षण जड झाले बाहुतले सामर्थ्य एकाऐकी नष्ट होऊन निर्जिव झाले.एकही अस्र आठवेना. सोबतचे यादव त्या दस्युशी लढत होते, पण त्यांचा टिकाव लागेना.अनेक यादव स्रीयांना दस्युंनी हरण करुन नेले.
आपले बाहु ऐनवेळी निर्जिव झाले. हा सर्व दैवाचा खेळ-दुर्विलास आहे हे त्याच्या लक्षात आले.उरलेल्या स्रीया व यादवांना संपत्तीसह एकदाचा अर्जुन कुरु क्षेत्री पोहोचला.तिथल्या मर्तिकावत नगरा तील हर्दीक्याच्या मुलाला राज्यावर बसवुन उरलेल्या भोज स्रीयांना तिथे ठेवले.मग वृध्द,बालक आणि बाकीच्या स्रीयांना तो राजप्रस्थाला आला.सात्यकी चा पुत्र योयुपादीला सरस्वतीकाठच्या प्रदेशाचा अधिकारी बनवुन त्याच्या आप्तांना त्याच्या सुपुर्द केले.


श्रीकृष्णाचा नातु ब्रजला इंद्रप्रस्थाचे राज्य देऊन द्वारकेहुन आणलेले प्रजाजन त्याच्या स्वाधिन केले.ही सर्व व्यवस्था लावल्यावर गंगातीरी असलेल्या व्यासांकडे जाऊन,घडलेला सर्व वृतांत कथन करुन,अर्जुनाने आपल्या मनातील शंका, पंचनद प्रदेशात अनपेक्षीत,अघटीत घटना माझे बाबतीत कां घडली असे विचारले असतां,महर्षी व्यास म्हणाले, पार्था शांत हो!जे घडले ते भवितव्य होते. विधिलिखित तसेच होते.
तुझा जिवलग सखा,श्रीकृष्ण साक्षात नारायण होता.पृथ्वीवरचा भार उतरवल्यावर त्याचे अवतार कार्य पुर्ण झाले.आणि मानवी देहाचा त्याग करुन स्वस्थानी निघुन गेला.तुम्ही सर्व बंधु ज्या कार्यासाठी अवतरले होतात ते कर्म संप ल्यामुळे तुमचे सामर्थ्य क्षीण झाले.अस्रां ची गरज संपल्यामुळे त्यातील शक्ती निघुन गेली.महर्षी व्यासांनी केलेला खुलासा व उपदेश ऐकुन त्याच्या मनांती ल शंका निमाल्या,मन शांत झाले.वंदन करुन तो हस्तिनापुरास परत आला.


इकडे युधिष्ठीर,पांडवादींना यादव विनाशाची व श्रीकृष्णाच्या परमधाम गमनाची बातमी कळली तेव्हा त्यांच्या शोकाला पारावार राहिला नाही.त्यांनी सुध्दा अभिमन्यु पुत्र परिक्षिताला गादीवर बसवुन,धृतरष्र्टपुत्र युयुत्सूला त्याच्या सेवे साठी नियुक्त करुन सर्वांनी हिमालयाकडे प्रस्थान केले.हिमालय ओलांडुन मेरु पर्वताकडे जात असतांना मार्गातच क्रमशः द्रौपदी,सहदेव,नकुल,अर्जुन आणि भीम आयुष्याची दोरी तुटल्याने मृत्युमुखी पडले.एकटे धर्मराज आपल्या श्वानासह सदेह स्वर्गात पोहोचले.
श्रीकृष्ण कोण होता,हे जन्मदात्री देवकीला,पिता वासुदेवाला,जन्मभर साथ करणार्‍या बलभद्राला,ज्यांना गुरु मानले त्या सांदीपानी,घोर अंगिरस,ज्याला जलतत्वाचे पुरुष मानले त्या पितामह भीष्मास,आणि दानवीर कौंतेय कर्णाला, ज्यांनी पालनपोषण केलेल्या चित्रसेन आजोबा,यशोदा,नंद, एवढच कशाला आत्या कुंती या सार्‍यांना तरी कळला का? खरेच कौरवमाता गांधारीच्या कठोर शापाने श्रीकृष्ण संपणार होता कां?

ज्यांना त्याने सखे आणि सख्या मानले त्यांना तरी नेमका कृष्ण कोण हे कळले का?ज्या पांडवांना सतत पाठीशी घातले त्यांना तरी श्रीकृष्ण कोण कळले कां? इतरांच राहु देत,पण! ज्याला एवढी समृध्द गीता एकवली,आपल्या लौकीका चा परमप्रिय सखा म्हणुन गौरवले त्या धनुर्धारी अर्जुनाला तरी त्याच्या जीवना च्या आयामाचं नीट दर्शन झालं का?एवढंच कशाला, गेली तीन तप पडेल ती अखंड सेवा करणार्‍या उध्दवाला तरी नीट कळला कां? थोडंफार कळलं असेल ते फक्त रुख्मिणीलाच… ज्यावेळी ज्याला कुणाला थोडा तरी समजेल तो आर्यवर्ता चाच नव्हे तर,सर्व विश्वातील तो दिवस सोन्याचा असेल.
हेच श्रीकृष्णाचे खरे स्वरुप आहे. त्याच्या चरणी शरणागत होऊन निश्चल प्रिती असणार्‍यांना मिळणारे सुमधुर फळ आहे.श्रीकृष्ण नित्य आहे.आजही तो आपल्या भक्तांना दर्शन देऊन,त्यांच्या बरोबर क्रीडा खेळुन आनंद देतो.
आपणसुध्दा इच्छिले तर,त्याच्या अभयचरणी शरणागत होऊन सदैव निर्भय होऊ शकतो
!!श्रीकृष्णार्पणमस्तु।ॐश्रीपरमात्मने नमः!!
!! समाप्त !!

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *