गोंधळ भारुड -माझें कुळींची कुळस्वामिनी… वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

गोंधळ भारुड प्रारंभ

माझें कुळींची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी ।
येई वो पंढरपूरवासिनी । ठेविले दोनी कर जघनीं ।
उभी सखीसजनी ॥१॥

येई पुंडलीक वरदायिनी । विश्वजननी । रंगा येई वो ॥धृ०॥


मध्यें सिंहासन घातलें । प्रमाण चौक हे साधिले ।
ज्ञान कळस वर ठेविले । पूर्ण भरियले ।
धूप दाविले । सुवासें करुनी ॥२॥

सभामंडप शोभला । भक्ति चांदवा दिधला ।
उदो उदो शब्द गाजला । रंग माजला । वेद बोलिला ।
मूळचा ध्वनी ॥३॥

शुक सनकादिक गोंधळी । जीव शीव घेउनी संबळी ।
गाती हरीची नामावळी । मातले बळी । प्रेमकल्लोळीं ।
सुखाचे सदनीं ॥४॥

ऐसा गोंधळ घातीला । भला परमार्थ लुटिला ।
एका जनार्दनीं भला । ऐक्य साधिला ।
ठाव आपुला । लाभ त्रिभुवनीं ॥ ५ ॥

गोंधळ भारुड समाप्त

सार्थ भारुड SARTHA BHARUD
Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *