३२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ३२.

सर्व व्यवस्था लावल्यावर सत्यभामेसह देवांचे वास्तव्य असलेल्या मेरु पर्वत ओलांडुन देवलोकी इंद्रभवनात प्रवेश केला.इंद्रपुत्र शतक्रतु अमरनाथने त्यांचे स्वागत केले.श्रीकृष्णाने आणलेली आदितीमातेची दिव्य कुंडले त्याच्या स्वाधीन केले.नंतर दोघेही इंद्राबरोबर देव माता अदितीच्या वैभवशाली दिव्यमंदिरा कडे गेले.अदितीपुत्र इंद्राने,कृष्णाने जिंकुन आणलेली कुंडले तिला अर्पन करुन,श्रीकृष्णाने मोठा परिक्रमाने नरका सुराचा वध करुन कुंडले कशी मिळविली याचे समग्र वर्णन तीला ऐकवले.श्रीकृष्ण सत्यभामेने पदवंदन केल्यावर,ती आशिर्वाद देत म्हणाली,जसा हा जगद्वंद्य इंद्र अजिंक्य आहे तसाच भूमात्रांना तु ही अवध्य आहेस,आणि ही तुझी सत्यभामा सदैव सौंदर्यवती राहुन,तू मनुष्यरुपात

जो पर्यत पृथ्वीवर वास्तव्य करशील तोपर्यंत ‘जरा’ हिला स्पर्श करणार नाही.
नंदनवनावरुन मार्गक्रमण करीत असतां,सत्यभामेला पारिजातकाचे झाड पाहिल्यावर हा वृक्ष आपल्या दारी असावा असे कृष्णाला म्हटल्यावर त्याने ते झाड उपटुन द्वारकेला सत्यभामेच्या मंदिराच्या अंगनात लावले.श्रीकृष्ण द्वार केस सुखरुप पसरल्याने सर्वांनाच आनंद झाला.श्रीकृष्णाने मातापित्यांचे पदवंदन केल्यावर बाजुलाच बसली असलेली कृश झालेली रुख्मिणी दिसल्यावर,त्याने सहेतुक मातेकडे पाहिल्यावर,माता म्हणाली,कृष्णा!तू गेल्या दिवसापासुन युध्दात विजयी होऊन सुखरुप परत यावास म्हणुन कडक उपास व व्रत वैकल्ये करीत होती.


कृष्ण आल्याचे कळताच प्रमुख यादव सरदार भेटायला आले.तू द्वारके पासुन दूर गेल्याची संधी साधुन शिशुपाल द्वारकेवर चालुन आला,पण प्रद्युम्नने मोठ्या पराक्रमाने त्याला पराभूत केले. त्याने जातां जातां आग लावल्यामुळे द्वारकेचा बराचसा भाग जळून गेला.कांही हरकत नाही.येतांना प्रागज्योतिषपुराहुन अमाप संपत्ती आणली असल्याने विश्वकर्माच्या मदतीने द्वारकेला पृथ्वीवरील वैकुंठ बनवु!
रैवत पर्वतावर रुख्मिणीच्या व्रताचे पारणे मोठ्या थाटात झाले.आणलेल्या विपुल संपत्तीपैकी मुक्तहस्तोदान करुन सर्वांना संतुष्ट केले.या अद्वितिय झालेल्या पारणा समारंभाने सारी द्वारका खुष व आनंदीत होऊन,रुख्मिणीची

जिकडे तिकडे प्रशंसा होत असलेली पाहुन सत्यभामाच्या मनांत इर्षा निर्माण झाली.नेहमी प्रमाणे नारदमुनीची फेरी झाली असतां!पती कृष्ण फक्त माझेवरच वश राहतील असे व्रत सांगण्याची नारदा ला विनंती केल्यावर त्यांनी ‘पुष्पक’ व्रत करण्यास सांगीतले.या व्रताचा विधी स्वतः नारदाने केला.पुष्पक व्रताचे पारणे नारदमुनींच्या सागण्यानुसार केल्यावर स्वर्गाहुन आणलेल्या पारिजातकाच्या झाडाला श्रीकृष्ण बांधुन तो वृक्ष सत्यभामेने नारदांना दान केल्यावर नारद म्हणाले,

सत्यभामे! मला दान केलेला हा वृक्ष व कृष्ण सोबत घेऊन जातोय.चल कृष्णा, कृष्णही निमुट ऊठला व नारदा बरोबर गंभीर मुद्रा करुन जाऊ लागला, तेव्हा घाबरलेल्या सत्यभामेला आपलं कांही तरी चुकल्याची जाणीव झाल्याने ती म्हणाली,मुनिवर्य! हे तुम्ही काय केलेत? पतीचे अढळ प्रेम प्राप्त होण्याचा हा प्रभावी विधी केलास ना? तिने खुप विनंती केल्यावर,सवत्स कपिला गाईचे उदक सत्यभामेकडुन करवुन श्रीकृष्णा ला तिच्या स्वाधीन केले.मग तिने विपुल दान देऊन सर्वांना संतुष्ट केले.पारिजात क फुलांचा सडा व सुगंध वर्षभर सर्वी कडे पसरत होता.


सर्वी धार्मिक कृत्ये पार पडल्यावर श्रीकृष्णाने विश्वकर्माला पाचारण केले. त्याने द्वारकेचा कायापालट करुन स्वर्गा तील वैकुंठाप्रमाणेच द्वारकानगरी दुसरं वैकुंठच बनविले. द्वारकेभोवती कुबेराच्या चैत्ररथवन,इंद्राच्या नंदनवना प्रमाणे रमणीय बगीच्याचा वेढा दिल्यामुळे वेगळीच शोभा वाढली होती.विश्वकर्माने
श्रीकृष्ण,रुख्मिणी,सत्यभामा तसेच इतर राण्यांसाठी भव्यदिव्य व अनुपम

सौंदर्य युक्त महल बांधले.नरकासुराकडुन सोडवु न आणलेल्या सार्‍या स्रीयांसाठी सर्व सोयींनी युक्त असा भव्य वाडा कृष्णाने आपल्या वाड्याशेजारीच बांधुन घेतला. त्या स्रीया श्रीकृष्ण आला की, त्याची मनोभावे भक्तीने पुजन करीत . गोकुळ वृंदावनांतील गोपींप्रमाणेच प्रीती चे भक्तीत परिवर्तन झाले.श्रीकृष्णाच्या अष्टभार्याही त्यांच्याशी स्नेहभावाने वागत प्रमुख गृहिणी रुख्मिणी त्या सगळ्यांची अगत्यपुर्ण काळजी घेई.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती


1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *