३४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ३४.

द्रुपदाने श्रीकृष्णाची व्यवस्था उत्तम ठेवली होती.कृष्णाच्या मनांत आले,इथे अर्जुन हवा होता.द्रौपदीसाठी तोच योग्य होता,पण रानोमाळ भटकणार्‍या पांडवांना स्वयंवराचे वृत्त कळले असेल का?स्वयंवाराचा दिवस उडाडला.विस्तिर्ण सुशोभित स्वयंवर मंड पात निमंत्रित राजे आपापल्या स्थानी विराजमान झाले.समोर उंच मंचावर खास तयार करवुन घेतलेले वेगाने फिरत्या यंत्रात एक मत्स्य बसविलेले, खाली पात्रात ठेवलेल्या पाण्यात पाहुन त्या मत्स्याच्या डोळ्याचा वेध घ्यायचा ‘पण’ ठेवला होता.हा ‘पण’ कोणत्याच राजाला जिंकता आला नाही.श्रीकृष्ण, सात्यकी समर्थ असुनही उठले नाहीत. कर्ण उठला.तो लक्ष्य साधणारच होता, पण तो अधिरथी सूतपुत्र,क्षत्रिय नाही,मी सूतपुत्राला वरणार नाही असे भरसभेत त्या अग्निशिखा द्रौपदीने म्हणुन त्याचा अपमान केला.पुढे काय?


तेवढ्यात एका बाजुला बसलेल्या ब्राम्हणांतुन एक वीर ऐटीत पावले टाकीत पुढे आला.श्रीकृष्णाने त्याला तात्काळ ओळखले.त्या ब्राम्हणवीर रुपातील अर्जुनाने सहज ‘पण’ जिंकला आणि द्रौपदीने त्याला वरमाला घातली.पण जिंकलेल्या द्रौपदीला घेऊन आपल्या बंधु सह जिथे उतरले होते तिथे आले,पाठोपाठ श्रीकृष्णही आला.आत्या कुंतीच्या पायावर मस्तक ठेवले.पांडवांनी भोगले ल्या वनवासी जीवनाची व्यथा ऐकल्यावर त्यांचे सांत्वन,समाधान केले.द्रौपदीला बहिण मानली.द्रौपदीच्या विवाह सोहळ्यात जातीने हजर राहुन,अहेर म्हणुन तिला अपार धन दिले.त्या दिवसां पासुनच पांडवांची श्रीकृष्णावर भक्ती कायम जडली.अर्जुनाकडे त्याचा विशेष कल,ओढा होता.पुढे हे दोघे नर-नारायण म्हणुन प्रसिध्द झाले.सर्व उरकवुन श्रीकृष्ण द्वारकेत परतला.


वारणावतातील लाक्षागृहात कुंती व पांडव जळली नसुन सुरक्षित व जिवंत असुन, ‘पणात’ अर्जुनाने द्रौपदीला जिंकले ही वार्ता चहुकडे पसरली.तशीच हस्तिनापुरला लोभी अंध धृतराष्र्टालाही कळल्यावर त्याचे धाबे दणाणले.पांचाल राज्याच्या सहाय्याने आपला हक्क मागण्यासाठी चालुन येतील,शिवाय आपले लाक्षागृहाचे कपट कारस्थान उघड होऊन बदनामी होईल असे वाटल्या मुळे,अंध,दुष्ट,लोभी धृतराष्र्टाने मायेचा आव आणुन पांडव जिवंत असल्याबद्दल जाहीरपणे आनंद प्रदर्शित केला.विदुराला पाठवुन पांडव,कुंती,द्रौपदी यांना कृष्णा सह प्रेमाने हस्तिनापुरी पाचारण केले. दुर्योधन-पांडवात समझौता घडवुन खांडववनासारखं,जंगलांनी,श्वापदांनी भरलेला प्रदेश,पांडवांना दिला.शांतता प्रिय व स्वकर्तुत्वार पुढे येणार्‍या पांडवां नी तेही कबुल करुन थोड्याच दिवसांत श्रीकृष्णाच्या सल्ल्याने मुळच खांडवप्रस्थ गांवाशेजारी “इंद्रप्रस्थ” नावाचे शहर वसवुन,पांडव नीती व पराक्रमाने राज्य करुं लागले.


श्रीकृष्ण द्वारकेला पोहोचल्यावर कांही दिवसांनी भीष्मक राजा व रुख्मीने त्याची मुलगी रुख्मावतीचे स्वयंवर मांडले.स्वयंवराला श्रीकृष्ण पुत्र प्रद्युम्न गेला होता.रुख्मिणीच्या हरणा पासुन रुख्मी वैर धरुनच होता,तरी पण स्वयंवरात रुख्मावतीने प्रद्युम्नच्याच गळ्यात वरमाला घातली व इतिहारासा ची पुनरावृत्ती झाली.पराक्रमाने प्रद्युम्नने सर्व राजांचा पराभव करुन वधुला घेऊन द्वारकेला परतला.
वास्तविक रुख्मीच्या मनांतील वैर, क्रोधाग्नी शांत झाला नव्हता,पण कृष्णा ला आपण जिंकु शकत नाही याची पक्की खात्री पटल्यावर,वरवर कां होईना लाडक्या बहिणीला बरे वाटावे हा विचार करुन पुत्री रुख्मावतीच्या विवाहास संमती दिली.या विवाहसोहळ्यास कृष्ण बलराम,रुख्मिणी,सांब इत्यादी मंडळी प्रद्मुम्नसह भोजकट नगरीस गेले.तिथे वेगवेगळ्या देशांचे राजे आले होते.मोठ्या समारंभपुर्वक थाटामाटात विवाह सोहळा व्यवस्थित पार पडला.खरंतर नवीनच विवाहसंबंध जोडुन आपले पुर्वकर्म विसरुन वैरभाव नाहीसा करायचे रुख्मीच्या मनांत होते,

पण त्याच्या दुष्ट सल्लागार मित्रांनी त्याला बलरामबरोबर द्युत खेळण्याचा सल्ला दिला..त्याला फासा तील मर्म कांही कळत नाही.पण आग्रहा ने बोलावल्यावर क्षत्रिय युध्दास व द्युतास नकार देत नाही या नियमास अनुसरुन रुख्मिने बलरामास द्युत खेळण्याचे आव्हान दिले.बलरामाने प्रथम शंभर हजार सुवर्ण नाणी पणास लावली.ती रुख्मीने जिंकली.बलरामाला राग यावा या उद्देशाने कलिंगराजा कुत्सितपणे हसला. इर्षेने रुख्मीने एक लाखाचा पण लावला तो बलरामाने जिंकला पण रुख्मी कबुल होईना.कपट करने त्याचा स्थायी भाव होताच शिवाय कपटी स्नेह्यांचे सहाय्य मिळाल्याने तो अधिकच चेकाळला ते पाहुन खवळलेल्या बलरामाने दहा कोटी निष्कांची लावलेली जंगी पैज पण जिंकला.परत वाद उपस्थित झाला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण संपूर्ण चरित्र

सर्व देवी देवतांचे व संतांचे चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *