सर्प अभंग – स्वरूपमंदिरीं होते मी एकली … वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – स्वरूपमंदिरीं होते मी एकली
भारुड – सर्प Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

स्वरूपमंदिरीं होते मी एकली ।
माया सांजवेळ अविद्येचे बिळी ।
माझें तुझें चालतां पाउली ।
मोहो भुजंगें धरिली करांगुळी ॥१॥

लोभसर्प डंखला करूं काय ।
स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय ।
आशालहरी तापला माझा देह ।
तृप्ति वारा घाली वो गुरुमाय ॥२॥

विषय निंब बहु गोडिये आला ।
भजनगूळ तो मज कडू झाला ।
वित्तहानीचा गळां झेंडु आला ।
असत्य अशुद्धाच्या येताती गुरुळा वो ॥३॥

कामिनी कामाचे डोळां आलें पित्त ।
रसस्तुतिनिंदा काळे झाले दात ।
विकल्पवासनेच्या मुंग्या धांवत ।
स्त्रीपुत्रलोभे जीवा पडली भ्रांत ॥४॥

मीतूंपणाची थोर आली भुली ।
मी येथे कोण वोळखी मोडली ।
अहं विवेके काया जड झाली ।
सद्गुरु गारुडी बोलवा माउली ॥५॥

गुरुगारुडी आला धाऊनि ।
बोध वैराग्याचे पाजिलें पाणी ।
विवेक अंजन घातले नयनीं ।
सोहंशब्द वाजवी नाम ध्वनी ॥६॥

मिथ्या भूतमय अवघी ब्रह्मस्थिति ।
अभयस्वरूपी लाविली विभूती ।
उतरला सर्प निवारली भ्रांती ।
एका जनार्दनीं आलीसे प्रचीती ॥७॥

सर्प अभंग समाप्त

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *