दृष्टांत 107 मनाचा आवाज

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

मनाचा आवाज.*_

दोन मित्र खूप वर्षानंतर भेटले. आलिशान गाडीतून उतरलेला श्रीमंत मित्र त्याच्या रस्त्यात भेटलेल्या गरीब मित्राला घेऊन पार्कमध्ये गेला. गाडी तिथेच बाहेर पार्क केली. दोघंही पार्कमधल्या बाकड्यावर बसून गप्पा मारत होते. थोड्या वेळानं त्यांना भेळ खायची इच्छा झाली. शाळेतल्या आठवणी जागवत ते ते भेळ खात खात चालू लागले. गप्पा सुरूच होत्या.


श्रीमंत मित्र म्हणाला, तुझ्या-माझ्यात तर फारच फरक पडला रे आणि खूप अंतरसुद्धा…. आपण दोघंही खरंतर एकत्र शिकलो, खेळलो, वाढलो. पण, बघ, मी कुठे पोहचलो आणि तू कुठे राहून गेलास. चालता चालता तो गरीब मित्र अचानक थांबला. त्या श्रीमंत मित्रानं विचारलं काय झालं रे… का थांबलास अचानक..??? तो गरीब मित्र म्हणाला, ‘तुला काही आवाज आला का रे…????’


श्रीमंत मित्रानं पाठीमागे वळून पाहिलं. पाठीमागे पडलेलं पाच रुपयांचं नाणं उचलून तो म्हणाला,’अरे, हे नाणं तर माझ्या खिशातून पडलं होतं. त्याचाच हा आवाज होता.’ हे ऐकत ऐकतच गरीब मित्र तिथल्याच एका रोपट्याजवळ गेला. त्या रोपट्याला काटे होते. त्यामध्ये एक फुलपाखरू पंख फडफड करत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं. नाजूकपणे त्या फुलपाखराला बाहेर काढत त्या गरीब मित्रानं त्याला आकाशात मुक्तपणे सोडून दिलं.
श्रीमंत मित्रानं अधीरतेने विचारलं की, तुला त्या फुलपाखराचा आवाज कसा काय ऐकू आला रे..?? त्यावर तो गरीब मित्र अत्यंत नम्रतेने म्हणाला, तुझ्यात आणि माझ्यात हाच तर फरक आहे. ‘तुला धनाचा आवाज ऐकू आला आणि मला मनाचा….!!!!!!’

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 25
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *