४९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ४९.

थोड्याच दिवसांनी हस्तिनापुरहुन अश्वमेधयज्ञाची तयारी पुर्ण होऊन तिथी निश्चित झाल्याचे वृत्त घेऊन,सर्वांना आमंत्रित केल्याचा निरोप घेऊन दूत आला.श्रीकृष्ण सगळ्या यादव वीरांसह अगत्याने हस्तिनापुरला पोहोचल्यावर त्याचे यथोचित स्वागत केले.अश्वमेध यज्ञासाठी चार बंधु चारही दिशांना जाऊन अगनित द्रव्रे आणले.सर्व मंडळी आनंदात वार्तालाप करीत बसली असतां, तेवढ्यात लगबगीने एक दूत घाबर्‍या घाबर्‍या येऊन म्हणाला,उत्तरादेवीने मृत मुलाला जन्म दिला.नगरातील सर्व नामांकित राजवैद्यांचे सगळे उपाय हरले आहे.


श्रीकृष्ण लगबगीने अंतःपुरात गेला तेव्हा तिथे दुःखी व शोकाकुल अवस्थेत कुंती,सुभद्रा,द्रौपदी बसलेल्या होत्या.तो आलेला पाहिल्याबरोबर,कुंती अतिशय दुःखाने म्हणाली,अरे माधवा!कुरु वंशाचा हा दीप,शेवटचा तंतु त्या अश्वत्थामाने खुडुन टाकला की रे…हे पुरुषोत्तमा!या महान संकटातुन तारण्या स तूच समर्थ आहेस.त्यावेळी तूं प्रतिज्ञा केली होतीस की,या मेलेल्या बालकास जिवंत करीन.तेवढ्यात सुभद्रा अश्रु ढाळीत म्हणाली,कृष्णा!आधीच सर्व कुरु कुलाचा उच्छेद झाला.पार्थाचा हा नातू जन्मला पण मेलेल्या अवस्थेत.कृष्णा! आमच्या कुलाच्या अभिरुध्दीसाठी तरी याला जिवंत कर!


कुंती,सुभद्रेचा करुन विलाप ऐकुन दुःखी झालेल्या कृष्णाने त्यांना अशास्तव केले आणि तो प्रसुतिगृहात दाखल झाला तिथली विधिपुर्वक व्यवस्था पाहुन प्रसन्न झाला.श्रीकृष्ण आंत आलेला पाहतांच आतापर्यंत आवरुन धरलेला बांध फुटुन उत्तरा ओक्सीबोक्सी रडुं लागली,विलाप करुं लागली.म्हणाली,भगवान अभिमन्यु म्हणाले होते, तुझा हा पुत्र पराक्रमी होईल.मामाकडे अस्रशस्र,युध्दनीतीचे अध्ययन करुन नांव कमावेल!देवा,आतां त्यांचे शब्द खरे करणे तुमच्या हाती आहे. तिचा विलाप ऐकल्यावर,तिला धीर देत म्हणाला, उत्तरे! घाबरु नकोस. धीर धर.. तो आसन घालुन बसला.

आचमन करुन त्या मृत बालकाला मांडीवर घेतले व मोठ्याने सर्व जगाला ऐकु जाईल एवढ्या आवाजांत म्हणाला….”मी आजपर्यत थट्टे तही असत्य भाषण कधी केले नाही. युध्दातुन कधी माघार घेतली नाही.मला धर्म विशेष म्हणजे ब्राम्हण प्रिय आहेत, त्या पुण्याईच्या बळावर…..सत्य आणि धर्म माझे ठीकाणी वास करतात,हे जर खरे असेल तर….हा पांडवांचा कुलांकुर अभिमन्युपुत्र जिवंत होवो. असे कृष्ण म्हणत आहे तोच त्या बालकाच्या मुखातु न टॅहाss टॅहाss चा मधुर स्वर ऐकुन सर्वीकडे आनंदी आनंद होऊन ह्रदयें हर्षा ने उचंबळुन आली.श्रीकृष्णाची स्तुतीगीते गाऊ लागली.उत्तराने कृष्णाला खाली वाकुन नमस्कार केला.श्रीकृष्णाचे नित्य सत्यवचन,धर्मप्रिती,ब्राम्हणांचा आदर आणि धर्मानेच दुष्टांचे निर्दालन हीच धर्म परायणता उपयोगात आणुन,धर्मपरायणतेत इश्वरीय सामर्थ्य आहे हे जगाला दुसरा कोणताही चमत्कार न करतां त्याने दाखवुन दिले,


उत्तराने बालकाला श्रीकृष्णाच्या पायावर घातले असतां,कृष्ण म्हणाला, सगळ भरतकुल परिक्षीण झाले असतां हा अभिमन्युपुत्र जन्मला म्हणुन याचे नांव परिक्षित ठेवा.अर्जुन कृष्णाने एकमे कांना दृढ अलिंगन देत कृष्ण म्हणाला आपण दोघे नरनारायण आहोत.
चैत्र पोर्णिमेचा उत्तम मुहुर्त पाहुन व्यास महर्षीनींनी युधिष्ठीर-द्रौपदीला यज्ञ दिक्षा देऊन अर्जुनाच्या संरक्षणाखाली यज्ञीत अश्व सोडला.अश्व निरनिराळ्या देशात फिरुन एक वर्षाने सर्व राजांना पराक्रमाने जिंकुन अर्जुन परत आल्याचे वृत्त कळताच श्रीकृष्णासह युधिष्ठीर सामोरे जाऊन समारंभपुर्वक अर्जुनाला यज्ञमंडपात आणले.यथाशास्र अश्वमेध यज्ञ झाल्यावर,सर्व राजांसह अवभृतस्नान झाले.


दक्षिणा द्यायची वेळ आली तेव्हा युधिष्ठीर म्हणाला,अश्वमेधाची दक्षिणा पृथ्वी होय.अर्जुनाने जिंकलेली पृथ्वी सर्व ब्राम्हणांना दान देतो, ती त्यांनी आपसात विभागुन घ्यावी.आणि मी चारही बंधु व पत्नीसह वनात जातो.त्याचा हा निर्णय चार बंधु व द्रौपदीस आनंदाने मान्य झाला.पण व्यासमुनी धर्माला म्हणाले, आम्हाला तूं दिलेली पृथ्वी तुला परत करतो तिचा स्विकारुन आम्हाला त्याबदल्यात धन दे.युधिष्ठीराने कोटी कोटी दक्षणा देऊन सर्व ब्राम्हणांना तृप्त केले. व्यासांनी आपला भाग कुंतीला दिला. त्याचा पुढे दानधर्मातच विनियोग झाला. नंतर बलराम कृष्णालाही अपार धन द्रव्य दिले.श्रीकृष्ण मंडळीसह द्वारकेला निघाला तेव्हा परिक्षिताला त्याच्या ओटीत घालत सुभद्रा म्हणाली,याला अभिमन्युसारखा श्रेष्ठ धनुर्धर बनव…
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *