४८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ४८.

यशास्वी,विजयी युधिष्ठीराने सर्व मृतांना तिलांजनी देऊन झाल्यावर कुंती म्हणाली,कर्ण तुमचा जेष्ठ भ्राता होता, त्याला पण तिलांजली दे!हे ऐकताच, आधीच शोकाकुल आणि उद्गिन्न असले ल्या धर्माला पराकाष्ठेचे दुःख होऊन, तो कुंतीला शाप देत म्हणाला,जगातील कोणत्याही स्रीच्या पोटात गुपीत राहणार नाही आणि त्याला भयंकर विरक्ती आली.सर्वांना मारुन राज्य ऊपभोगने त्याला पटत नव्हते.सर्वांनी परोपरीने समजावले पण व्यर्थ!श्रीकृष्ण व महर्षी व्यास बाजुला बसुन सर्व पाहत होते.धर्माची विरक्ती कमी होईना,तेव्हा व्यास म्हणाले,दंडधारणा हे सर्वात श्रेष्ठ कर्तव्य आहे,तेव्हा भ्रात्यांसह धर्मार्थ कामाचा यथाशास्र प्रथम कर्तव्ये पार करुन मग जा अरण्यांत.तूं अश्वमेध केलास.तुझ्या कडुन झालेले हिंसाकृत सर्व पाप नाहीसे होतील.अखेर श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशाने राज्य स्विकारण्यास तयार झाला.


सर्वांचे सजलेले रथ,शंख,मंगलवाद्याच्या गजरात व प्रजाजनांच्या जयजयकारात राजवाड्यात पोहोचल्यावर ,धौम्य मुनींनी उदडःमुख वेदीवर व्याघ्रचर्म घालुन वर सर्वतोभद्र ठेवलेल्या सिंहासना वर धर्मराज व द्रौपदीला बसवुन स्वतः श्रीकृष्णाने गंगोदोकाने त्याला पृथ्वीच्या सम्राटाचा अभिषेक केला.भीमास युवराज,सैन्यावर नकुल,परराज्य व दुष्टां ना शासन या कामावर अर्जुन,सहदेव समीपस्थ(खाजगी चिटणीस)अशा नेमणुका केल्यावर विदूर,संजय,कृपाचार्यना योग्य कामे वाटुन दिलीत


याप्रमाणे सर्व व्यवस्था लावल्यावर जिथे भीष्म शरपंजरी पडले होते तिथे कृष्णासह धर्मराज गेले, भीष्माभोवती अनेक मुनी बसले होते.दूरवर रथ उभा करुन पायीच सर्वजण भीष्माकडे गेले. भीष्मांना श्रीकृष्ण म्हणाले,या विरक्ती आलेल्या युधिष्ठीराला चातुर्वर्ण्य व चतुर्था श्रम धर्माचा उपदेश करुन याचा शोक नाहीसा करा.कृष्णा मी असा शरपंजरी!ऐवढे बोलण्याने सुध्दा अतिशय कष्ट होत आहे रे! श्रीकृष्णाने भीष्मांना योगशक्ती देऊन म्हटले,तू उपदेश करेपर्यंत बुध्दी स्थीर राहुन वेदना जाणवणार नाही.

पण……. कृष्णा,अरे! सर्व धर्माचा प्रवर्तक प्रत्यक्ष विष्णूरुप तू…. सत्य अद्वितीय,आदिम ध्यानरहित असा परब्रम्ह तू… आदीतीच्या पोटी द्वादशरुपाने अवतीर्ण सुवर्नकांती सूर्य तू…. देवांना आणि कृष्णपक्षात पितरांना तृप्त करणारा रजनीकांत तू… वेदरुपी परमेश्वर तू…सहस्र फणांनी शोभणार्‍या शेषाच्या पर्यंकावर निद्रा घेणारा निद्रास्वरुपी तू… धर्मस्वरुपी तू… सर्व सुष्ट पदार्थात आणि प्राणीमात्रांच्या शरीरात जीवरुपाने व्याप्त तू…जागृती,स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्हीही अवस्थेत सारखाच राहणारा आत्मा,पंचमहाभूते व मनासह अकरा इंद्रिये व सतरावा ज्ञानी

तो सांख्यरुपी तू…योगस्वरुपी तू…पुन र्जन्मापासीन मुक्त,मोक्षरुपी तू…अग्नी हे मुख,स्वर्ग हे मस्तक,आकाश ही नाभी, भूमी हे चरण,सूर्यचंद्र हे नेत्र आणि दिशा हे कान अश्या अवयवांनी युक्त असलेल्या विश्वरुपी परमात्मा तू… जय आणि दंड यांनी युक्त लंबोदर, कमंडलु धारण करणारा ब्रम्ह तू…शूलधारी,भस्मचर्चित, उर्ध्वलिंग,त्रिनेत्र देवाधियती रुद्र तू…विश्व कर्मन,विश्वात्मन्,विश्वसंभव पंचभूतातीत तू….. अशी वाक् रुपी यज्ञाने भीष्मांनी त्याची आराधना केल्यावर श्रीकृष्ण सद्गदीत होत म्हणाला,भीष्मा !मी तुझ्या वर संतुष्ट आहे.युधिष्ठीराला राजधर्म व मोक्षधर्माचा उपदेश तूंच कर!


या राजाला उपदेश करण्याचा अधिकार माझा नाही तुझा आहे.तेव्हा निःशक मनाने,गुरुस्थानी असलेल्या त्या तुझ्या मुखातुन जे उपदेशामृत निघेल ते स्मृतिशास्रा प्रमाणे आदरणीय होईल.मग श्रीकृष्णाच्या अनेक प्रश्नानुरुप राजधर्माचे व मोक्ष धर्माचे रहस्य भीष्मांनी युधिष्ठीराला समजावुन दिले.भीष्मांचा उपदेश ऐकुन तिथे जमलेले समस्त ऋषीमुनी रोमांचित झालेत.शेवटी भीष्म म्हणाले,युधिष्ठीरा! हस्तिनापुलला जाऊन प्राप्त पृथ्वीचे राज्य चालव.यज्ञ करुन पितर व देवांचे ऋण फेड.प्रजेला आनंदीत ठेव.जा तू आतां.सूर्य उत्तरायणाकडे वळेल तेव्हा माझे उत्तरकार्य करण्यास परत ये.भीष्मांच्या आज्ञेने सर्व हस्तिनापुरला परतले. काही दिवस राहुन श्रीकृष्ण सुभद्रेला माहेरपणासाठी बरोबर घेऊन द्वारकेला रवाना झाला.जातेवेळी कृष्ण म्हणाला, अश्वमेध यज्ञाची तयारी झाली की, सर्व मंडळीसह परत येतो.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *