४१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ४१.

स्रीसमुहाच्या अग्रभागी बसलेली याज्ञसेनी वरुन जरी निस्तब्ध,शांत वाटत असली तरी,कौरवांकडुन झालेल्या विटंबनेच्या आठवणींनी अंतरी क्रोध,त्वेष उफाळुन श्रीकृष्णाला म्हणाली,सख्या! या सृष्टीची उत्पादक तूंच आहेस.मधुसुदना! तूच अजिंक्य विष्णू असुन,यज्ञ,यज्ञकर्ता होमद्रव्येही तूच आहेस.माधवा!तूच साध्य आणि रुद्रांचा अधिपती असुन लोकांचा नियंता भूतांचा स्वामी आहेस.मधुसुदना! स्वर्ग आणि मृत्युमधे वास करणार्‍या सर्व प्राण्यांचा स्वामी तूच आहेस.द्रौपदीच्या बुध्दीवादी,चातुर्यपुर्ण बोलणे ऐकुन तिथे जमलेले सर्व राजे!ऋषीमुनी आवाक

झाले.ती विलक्षण बुध्दीमान राजकन्या, वेदाध्ययात,धनुर्विद्येत पारंगत होती.अरे कृष्णा!अजिंक्य अपराजित पांडवांची भार्या, सर्वशक्तीमान असलेल्या तुझी बहिण,सखी,शूर द्यृष्टद्युम्नची भगिनी अशी मी रजःस्वला स्थितीत भरसभेत कौरवांनी माझी विटंबना केली.अरे कृष्णा पांडव,पांचाल,यादव हे सर्व द्विग्विजयी जिवंत असतांना मला दासी बनवुन उपभोग घेण्याच्या वल्गना केल्या,अरे! महा पराक्रमी भीष्म,सम्राट धृतराष्र्टाची राजस्नुषा असुनही आपल्या पुत्रांचे नीच, हीन बोलणे निमुट ऐकुन घेतले.बोलतां बोलतां तिचा आवाज चढला. अग्निच्या ज्वाळा चेहर्‍यावर उमटल्या.स्वरांतुन ठीणग्या उडत होत्या. जमलेले सारे आवाक,भयभित झालेत.


श्रीकृष्णा!जरी सामर्थ्य कमी असले तरी, आपल्या स्रीचे संरक्षण करणे हा धर्म आहे तसच पत्नीचाही धर्म आहे. आणि त्यानुसार मला वर मिळाल्यावर,या पांडवांना त्यांची दास्यातुन मुक्तता करुन माझा धर्म पाळला.कृष्णा! अरे,पांडव एवढे सिंहासारखे पराक्रमी असतांना… नाही…माधवा… नाही…माझी झालेली घोर विटंबना, अंतःपुरातुन माझे हे विपुल केस धरुनओढत तो नराधम दुःशासनाने भरसभेत आणले,नाही…कृष्णा…नाही.. मला हे विटंबीत दुःख सहन होत नाहीय, कृष्णा…कृष्णा त्यावेळी माझं कुणीच नव्हतं,अरे ना पती,पुत्र,बंधु,पिता, आणि- आणि कृष्णा तू…तू…तू….ही माझा नव्हतास.मी असहाय्य,एकटी,एकाकी होते रे कृष्णा….तिचा अनावर दुःखावेग पाहुन श्रीकृष्ण मनी हेलावुन गेला.निश्चयी शांत स्वरात म्हणाला, सखे!कृष्णे शांत हो! ज्यांच्यावर तुझा क्रोध आहे त्यांचा मी योग्य समाचार नक्की घेईन विश्वास ठेव! मी तुझा सखा,या सर्वासमक्ष प्रतिज्ञा पुर्वक सांगतो की, पांडव पुनः निश्चितच पृथ्वीपती होऊन तूं सम्राज्ञी होशील व अश्वमेध यज्ञही होईल.


आलेली मंडळी कांही दिवस राहुन निघुन गेले.श्रीकृष्ण याज्ञसेनीचा निरोप घ्यायला गेला असतां ती म्हणाली,कृष्णा त्यादिवशी भावनावेगात टाकुन बोलले पण..पण त्याप्रसंगी तूच तर माझी लाज राखली,रक्षण केले होते,सख्या! असेच माझे सदोदित रक्षण कर!त्याने किंचित हसुन तिच्या मस्तकी हात ठेवुन,मी नित्य, तुझा पाठीराखा आहे.असे म्हणुन निघुन गेला.
वनवासाची बारा वर्षे व अज्ञातवासा चा एक अशी तेरा वर्षे पांडवांची दुःखात गेलीत तशीच कृष्णाची त्याच अवस्थेत गेलीत.मुलं,नातु मोठी झाली,त्यांचे विवाह ही झालेत, सर्व मार्गी लागल्यावर,शास्रा प्रमाणे श्रीकृष्ण गृहस्थाश्रमातुन

बाहेर पडुन सर्व लक्ष मोक्ष साधनेकडे लावले. उपनिषद् तत्वांचे श्रवण,मनन,अध्ययन सुरु केले.अंगिरस मुनींकडुन आत्मविद्या ग्रहण केली. अशाप्रकारे तेरा वर्षाचा काळ घालवला.जी पण विद्या ग्रहण करायची त्यांत पारंगत होऊन श्रेष्ठत्व प्राप्त करण्याच्या वृत्तीने,लहानपणी मल्ल श्रेष्ठ,तरुणपणी धनूर्धरश्रेष्ठ,योगसाधनेत श्रेष्ठत्व मिळवल्यामुळे योगीश्रेष्ठ अशी त्याची ख्याती पसरली,म्हणुनच त्याला “योगेश्वर श्रीकृष्ण” म्हणु लागले,


जगाला मोक्षमार्ग समजावा म्हणुन धर्मस्थापना करण्याच्या तयारी साठीच तो तेरा वर्षे कुठेही न जातां द्वारकेतच तपःश्चर्या व वैराग्यात घालविली.बलराम-कृष्ण उज्जयिनीला सांदीपनी गुरुंच्या आश्रमात असतांना एक गरीब ब्राम्हण शुध्द आचरणाचा,जे मिळेल त्यावर संतुष्ट राहणारा सुदाम नांवाचा मुलगा श्रीकृष्णाचा जिवलग मित्र बनुन त्याच्या कठीण प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन कृष्णाने त्याला दिले होते.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *