भारुड – अंबा – सत्वर पाव गे मला । भवानी … वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – अंबा – सत्वर पाव गे मला । भवानी …
भारुड – अंबा Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड – अंबा
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥
सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥
जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥
दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥ ६ ॥
एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥ ७ ॥

ज्या काळात स्त्रियांना सासरी असह्य़ जाच होत असे, खरं म्हणजे सासर म्हटलं की संसारातील सुखदुःखे, परिस्थितीचे, काळाचे, वा स्वत: आपल्या जवळच्या माणसांच्या गरजा पूर्ण झाले नाही, किंवा त्यांचा सन्मान राखला गेला नाही की त्यांच्याकडून ची प्रतिक्रिया येते, त्या प्रतिक्रियेला मग त्याला कोणी छळ, जाच, सासुरवास, म्हणत असेल…..
पण खरच पाहू गेलो तर हे ….
हे सगळं होतच असतं,…
होणारच असत…
किंबहुना लग्नाच्या नंतर सासरी त्रास होणारच हा पूर्वग्रह आपल्या सगळ्यांच्या मनात जवळपास बसलेला आहे.

संत एकनाथांनी याच पूर्वग्रहाच स्वरूप पारमार्थिक जीवनाशी जोडलेला आहे.

या ग्रहाचा स्वरूप पारमार्थिक जीवनाशी जोडलेला आहे, जस सासरी जात होतो हि एक आपल्या मनातली पूर्वकल्पना अगोदरच असते, आपल्या लग्नाच्या अगोदर मुलीला कधी जो जाच तीन पहला नाही भोगला नाही तरीही तिला त्याची अनामिक भीती वाटत असते.

जस हे गृहीतच असते कि सासरी सासुरवाशीणी ला सासूरवास होणारच,,, तसेच जीवाला या भवसागरात दु:ख होणारच परंतु सदगुरू कृपेने जिला ह संसार सुद्धा खोटाच आहे आणि दुःख रूपच आहे अशी जाणीव झाली

जेव्हा तिने. ज्या लोकांना आपलं मानल होत. तेव्हा त्यांनी केलेला छळहीतीला. सहन झाला. परंतु सद्गुरूची कृपा झाली. आणि तिला. तिच्या मूळ स्वरूपाची जाणीव झाली. तेव्हा ती स्त्री. त्या संसारातल्या. तिच्या सर्व सहकार्यांना. सासू सासरे. पती. मुलं दिर. जाऊ. या सर्वांना? आपणास मानायला तयार नाही,

यांचा त्याग करून ति जेंव्हा हरिपदप्राप्तीच्या दिशेने अर्थात ईश्वराच्या प्राप्तीच्या दिशेने जेव्हा तिने पहिले पाऊल टाकले. तेव्हा या सगळ्या लोकांनी. तिला अडवण्याचा प्रयत्न केला.

तिच्या इच्छेच्या त्या मुख्य मार्गाचाच हे सगळे लोक विरोधी झाल्यावर. तिने जगाची आदीशक्ती मा भवानीची आराधना केली. भवानी आई.

ती सासूरवासीन म्हणते हे आई हि पराधीन सासुरवाशीण तुला फार काही नवस बोलू शकत नाही. परंतु रोडगा मात्र मी तुला नक्कीच होऊ शकते, कारण मी स्वयंपाकघरात राहते तेवढ्या. हक्क आणि तेवढी तयारी माझ्याकडे नक्कीच होईल. मी तुला रोडगा वाहते हाच माझा नवस आहे आणि मला ह्यातून मुक्त कर हाच संदेश या अभंगातून संत एकनाथ महाराज आपल्यापुढे मांडतात.

म्हणून संत एकनाथांनी या संसारामध्ये जन्म-मृत्यूच्या कचाट्यात जीव सापडतो आणि जेव्हा बाहेर पडायचा प्रयत्न करतो तेंव्हा हे त्यालाच धरून ठेवणारे काही विकार हरिपदाकडे जावू देत नाहीत तेंव्हा सगळ्यांच्या बरोबर तिला नातेसंबंध सोडावा लागला तेव्हा, ती स्त्री या सगळ्यांना त्याचा धिक्कार करते, एक प्रकारे त्यांचा त्याग करण्याची धडपड संत एकनाथांनी या भारूडांमध्ये मांडले आहे.

संत एकनाथ महाराज जीव अडकला जीवाचं माहेर आहे हे हरी पदाची प्राप्ती आहे, ईश्वराची प्राप्ती आहे, ‘सून’ या भूमिकेचा नाथांनी विचार केला आहे. दादल्यासकट सर्वाना दूर सारू पाहणारी नाथांची ही सून साधीसुधी नाही. जशी दिसते तशी नाही. तिचे मूळ आध्यात्मिक रूप नाथांनी येथे वर्णिले आहे

सत्वर पाव ग मला भवानी आई
रोडगा वाहीन तुला धृपद….


इथली सून म्हणजे ‘बुद्धी’ असून, ती चिच्छक्तीची प्रार्थना करीत आहे. कि भवानी मी तुला नवस करते आणि त्या नवसासाठी तू मला पांव.

सासरा माझा गावी गेला
तिकडेच खपवी त्याला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला धृपद….


‘प्रपंच’ हे सासर असून ‘हरिपद’ हे माहेर आहे. ‘अहंकार’ हा सासरा आहे.

सासू माझी जाच करिते
लवकर न्येई ग तिला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला धृपद….


अन ‘कल्पना’ ही सासू आहे. तिला लवकर ने..

जाऊ माझी फडाफडा बोलते
बोडकी कर ग तिला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला धृपद….


‘इच्छा’, ‘निंदा’ या जावा असून, त्याना बोडकी कर.

नणंदेचं कार्टं किरकिर करतं
खरूज येऊ दे त्याला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला धृपद…

.
ममता’ ही नणंद असून ‘दु:ख’ हे तिचे पोर आहे. ते ही ममता रूपी माझी नणंद तिचं दुःखरूपी कार्ट माझ्या घरी राहते. आणि ते कार्ट? सारख्. किरकिर करत राहते.
म्हणजे मी काहीही करू दे. त्याचं रुपांतर हे दु:खामध्ये करत. एक दिवस सुखानं संसार हे होऊ देत नाही, मला सुखाने राहू देत नाही. म्हणून या दुःखरूपी माझ्या नंदीच्या त्या पोराला. खरुज होऊ दे, त्यालाच. दुःख.होऊ दे म्हणजे ते आम्हाला ते त्रास द्यायचं थांबेल.

दादला मारून आहुति देईन
मोकळी कर ग मला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला धृपद….


‘काम’ हा दादाला आहे जो नित्य माझा भोग घेतो आणि त्याला दुसर काही सुचतच नाही, आता मी त्याला दादल्याला मारून तुला आहुती देते, पण हे आई तू मला त्या कामरूपी नवऱ्यापासून मोकळी करा…. व ‘क्रोध’ हा दीर आहे,

एका जनार्दनी सगळेच जाऊ दे
एकटीच राहू दे मला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला धृपद….


सांस-बहूच्या नेहमीच्या कटकटींनी संसारात कंटाळलेल्या गृहीणीचे रुपक घेऊन नवस आई भवानीला ती नवस बोलते व शेवटी म्हणते या माझ्या सासरच्या लोकांबरोबर कटकट होते म्हणून प्रत्येकाचेच तळपट करणारीस शेवटी “..एकटीच राहू दे मला अशी मागणी मागते …”

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *