भारुड – संसार नगरी बाजार भरला भाई संत एकनाथ वारकरी भजनी मालिक

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भारुड – संसार नगरी बाजार भरला भाई
संसार नगरी बाजार भरला भाई ।
कामक्रोध लोभ याचे गिर्‍हाइक पाही ॥ १ ॥
यात सुख नाही त्यात सुख नाही ।
या हाटाचे सुख कोठे नाही ॥ २ ॥
या हाटासी थोर थोर मेले ।
नारद शुक भीष्म उमगले ॥ ३ ॥


आणिक संती बाजार पाहिला ।
व्यर्थ जाणोनि निराश भाविला ॥ ४ ॥
या बाजारी सुख नाही भाई ।
माझे माझे म्हणॊ वोझे वाही ॥ ५ ॥
एका जनार्दनी बाजार लटिका ।
संतसंगावाचुनी नोहे सुटिका ॥ ६ ॥

संत एकनाथ महाराज संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *