१७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – १७.

सिंहासनाधीन कंस क्रोधाने पेटुन त्याच्या मनावरचा ताबा गेला,त्याने सेवकास आज्ञा करीत म्हणाला या रानवट गावंढळ गोपांना सभागृहातुन हाकलुन द्या व या दुटप्पी नंदाला लोखंडी खोड्यात साखळीने अडकवुन टाका. नेहमी माझा द्वेष करणार्‍या वासुदेवाला फटक्याच्या शिक्षेची अंमलबजावणी करा
शिवाय कृष्णाच्या पक्षाचे जे आहेत त्यांचे गोधन व संपत्ती जप्त करुन नगराबाहेर हाकलुन द्या.याप्रमाणे कंस भराभर हुकुम सोडत असलेला व नंदाचा व वसुदेवाचा अपमान केलेला पाहुन कृष्णाच्या संतापाचा कडेलोट झाला.त्याने कंसाकडे एकदम इतक्या चपळतेने उडी मारली की तो तिथे कधी प्रगट झाला कुणाला कळलेच नाही.

मग क्षणही न दवडतां कृष्णाने आपला बाहु लांबवुन,कंसाचे केस पकडुन सिंहासनावरुन खेचत,फरफटत रंगभूमीवर आणत असतांनाच त्याचा प्राण गेला.त्या क्रुर व शूर पुरुषाला ‘वीरगती’ न मिळतां त्याची इतिश्री झाली.कंसाला मारुन प्रजेचा जुलुम नाहीसा केला.तेवढ्यात कंसाचा भाऊ सुनामा धावुन आला असतां बलरामने मधेच अडवुन त्याचा चेंदामेंदा केला.सारा आखाडा मल्लांच्या प्रेताने भरुन गेला.वसुदेव जिथे बसले होते तीथे बलराम श्रीकृष्णाने जाऊन त्यांच्या चरणा वर मस्तक ठेवले.नंतर तिथे बसलेल्या इतर श्रेष्ठ जेष्ठ यादवांना व क्षत्रियांना परिचय देऊन सगळ्यांनी नमस्कार केला व देवकीकडे गेलेत.तिने दोघांना कवटाळु न आनंदाश्रु व स्तनातुन दुध ठिपकु लागले.नंतर बलराम कृष्णाने आपल्या मातापित्यांना जन्मस्थानी वाड्यात घेऊन गेले.


आतांपर्यंत बलराम कृष्णाच्या भितीने दाबुन ठेवलेला शोक कंस अंतः पुराचा बांध फोडुन बाहेर पडला.कंसाच्या स्रीया त्याच्या प्रेताभोवती गोळा होऊन आर्त स्वरांत आकांत करुं लागल्या,नाथ आम्हाला अनाथ करुन एकटेच कसे चाललात?पती हेच आमचे परम दैवत!आतां आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहावे? नाथ! आपले अजेय चतुरंग सैनिकांनी इंद्रालाही जिंकले!मग आजच हे असे कसे घडले? नाथ! माझे पिता,जगाचा सर्वश्रेष्ठ अधिपती जरासंधाचे पाठबळ असतांना ते असे हतवीर्य कसे झालेत? नाथ!

आपण सर्व राजांमधे पराक्रमी व बलिष्ठ असुन एका यत्किंचित गवळ्या च्या पोराने आपली अशी अवस्था केलीच कशी?आतां आम्ही कृष्णाच्या आधारावर जगायचे कां? अरे आमच्या सहगमनाची बिनाविलंब तयारी करा.त्यांचा शोक सुरु असतांनाच कंसाची आई व उग्रसेन पुत्र कंसाच्या वधाची वार्ता समजताच,पुत्र कसाही असला तरी,दोघेही लगबगीने तिथे आलेत.आपल्या पुत्राचे फरफटत आणलेले,धुळीत,दुर्दशावस्थेत पडलेले प्रेत पाहताच शोकाकुल माता प्रेतावर पडुन धायमोकलुन आक्रोश करुं लागली.
जरा वेळाने आपला शोक आवरुन, पती उग्रसेनला म्हणाली,महाराज! जीत आणि जेता हा क्रम अखंड चालणारच आहे.विजयी कृष्णाकडे जाऊन प्रेत संस्कार करण्यासाठी विनंती करुन तयारीला लागा.


१६-१७ वर्षापुर्वी ज्या वाड्यात जन्म झाल्याबरोबर ऐन मध्यरात्री तुफान पावसात,यमुनेच्या प्रचंड पुरातुन कंसा च्या भितीने वसुदेवाने कृष्णाला गोकुळा त नंदाघरी नेऊन,त्याची नुकतीच जन्मले ली कन्या घेऊन आले होते,आज त्याच वाड्यात कंसाचा वध करुन कृष्ण विजयी झाला.
आज तोच वाडा लतापताकांनी,दारा त सडा संमार्जन,रांगोळी घालुन, दारांना फुलांच्या माळांनी सजवला होता.बलराम कृष्ण दारात येताच त्यांचेवरुन लिंबलोन उतरवले.ज्या खोलीत कृष्णाचा जन्म झाला होता,ती खोली पाहुन देवकीला अनावर दुःखाचा उमाळा आला.

भावना वेग आवरेनासा झाला.अरे कान्हा! किती अभागी आम्ही? पुत्रसुखाला,बाललिलां ना,बोबडे बोल ऐकायला, बालमुख चुंबना ला पारखे झालो,पण आजचा तुम्हा दोघां चा अद्वितिय पराक्रम पाहुन तुम्ही परत मिळालात हे आमचे अहोभाग्य!नाही माते… अभागी तू नसुन आम्ही आहोत.समर्थ असुनही एवढे दिवस तुम्हाला दुःखात खितपत पडुन रहावे लागले.कंसापासुन तुमची मुक्तता लवकर करुं शकलो नाही हे आमचे दुर्देवच!यापुढे तुम्हा दोघांची अक्षय सेवा घडावी हा प्रयत्न करुं!तेवढ्यात वृध्द नंद,वसुदेव देवकीच्या भेटीस आल्यावर कृष्ण त्यांना कडकडुन मिठी मारत म्हणाला,बाबा! तिकडे यशोदामाता इथली हकिकत ऐक ण्यास वाटेकडे डोळे लावुन बसली असेल तरी विनाविलंब व्रजाकडे प्रस्थान करावे.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *