३३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ३३.

श्रीकृष्णाचे गृहस्थ जीवन अगदी उत्तम तर्‍हेने चालले होते.आपल्या अष्ट भार्यांचे सर्व मनोरथ त्याने पुर्ण केले.तो सर्वांशी समभावनेने वागत होता.स्रीपुरुष उच्च नीच,भेदाभाव,श्रेष्ठ-कनिष्ठ ही भावना त्याच्या ठायी मुळीच नव्हती.जांबवतीला पुत्र होत नव्हता म्हणुन,स्वतः कृष्ण हिमालयावर जाऊन एक वर्ष घोर तपश्चर्या करुन महादेवाला प्रसन्न केले. महादेवाच्या वराने झालेल्या पुत्राचे नांव सांब ठेवले.


बर्‍याच वर्षांनी समुद्र यात्रेच्या पर्वणी निमित्य सहकुटुंब महायात्रेला समुद्र किनारी जमलीत.तिथे विविध क्रीडा,गोकुल वृंदावनासारखा रासक्रीडा सारखाच छालिक्य गान क्रीडा,नाट्य प्रयोग,विविध पक्वानांचा आस्वाद घेत नव्या जुन्या आठवणी काढत मनमुराद आनंद सर्वांनी ऊपभोगला.सगळ्यांच्या आग्रहावरुन बर्‍याच वर्षाने श्रीकृष्णाने मुरली वाजविली.सर्व वातावरण स्तब्ध झालं.सारे त्या वेणू वादनाने मोहित झाले. देहभान हरपले. सारे कार्यक्रम आटोपेस्तोवर पहाट झाली.मोठ्या आनंदात सर्वजण द्वारकेस पोहोचले.


श्रीकृष्णाच्या अष्टभार्यांना प्रत्येकी दहा पुत्रे व एक कन्या झाली.अपत्याबाब तीत ही त्याने समानता दाखवली होती. सर्व पुत्रे रुपवान व पराक्रमी होते.त्यांना सर्व प्रकारची विद्या व योग्य शिक्षण देण्यासाठी अनुभवी शिक्षण नेमाले.वेळ मिळेल तेव्हा तो स्वतःही मार्गदर्शन करीत असे.त्या पुत्रांच्या वेदाध्ययनासाठी द्वारकेतच वेगळा आश्रम बांधुन,सांदीपानी मुनींच्या देखरेखेखाली बलराम- श्रीकृष्ण व यादवांची मुले अध्ययन घेऊ लागली.श्रीकृष्णाचा संसार वाढत होता. पुढच्या पुढ्या निर्माण होत होत्या.प्रत्यक्ष श्रीकृष्णाचीही दिनचर्या अत्यंत आदर्श होती.रोज ब्रम्हमुहुर्तावर ऊठुन सर्व पुजा विधी आटोपुन ब्राम्हणांचे,मातापित्यांचे, धेनुचे दर्शन घेऊन बाहेर दर्शनार्थ जमले ल्या प्रजाजनांच्या इच्छा जाणुन तात्काळ पुर्ण केल्या जाई.नंतर अंतःपुरातील प्रत्येकीचा परामर्ष घेऊन

,प्रत्येकीकडे क्रमाने जाऊन भोजन घेत,त्यांना आनंद प्रदान करीत असे.हे सर्व होत आहे तोच पाणीदार पांढर्‍या शुभ्र घोड्यांनी जोडलेला रथ समोर आला की, उध्दव,सात्यकी या दोन मंत्र्यांसह रथारुढ होत असे.वेळे च्या बाबतीत तो फार काटेकोर असे.वेळेत सभागृहात प्रवेश करी.सर्व कामाचा रितसर आढावा घेतल्यावर दोन प्रहरा नंतर घरी परत येई,भोजनोत्तर विश्रांती झाली की,उध्दव किंवा एखाद्या पत्नीबरो बर सोंगट्याचा डाव खेळे.संध्याकाळी शस्रविद्येचा सराव,व्यायाम.परत रात्रीच्या भोजनोत्तर कारभारी,बलरामाशी राजकारणी चर्चा होई.भार्यांशी चर्चा करुन मुल-मुलींच्या विवाह,मोजिबंधने, यज्ञे,व्रते या सर्वांची उत्कृष्ट व्यवस्था लावुन दिली जाई.द्वितिय प्रहरी झोपायला जाई.


याप्रमाणे धर्मानुसार सध्दर्म काटेकोर पाळत श्रीकृष्णाचा काळ आनदात जात होता.अशातच पांचाल देशाचा राजा द्रुपद राजाकडुन द्रौपदी स्वयंवराचे निमंत्रण घेऊन दूत आला.४५ वर्षाचा श्रीकृष्ण आपल्या पुत्रांसहित स्वयंवराला गेला.जेष्ठ पुत्र २० वर्षाचा सुंदर,पराक्रमी प्रद्युमला जर द्रौपदी मिळाली तर पहावे.त्याच्या बरोबर स्वयंवर बघण्यास व पराक्रमाची परिक्षा देण्यास बरेच यादववीर व बलराम सुध्दा आपले दोन पुत्र व उल्युकसह निघाला.रोहिणीला बलराम नंतर आणखी पुत्र झाले तेही बरोबर होते.देवकीला कृष्णानंतर ‘गद’ नावाचा पुत्र झाला तोही बरोबर होता.या गदावरुन श्रीकृष्णास गदग्रज असेही म्हणत.


द्रौपदीला बघण्याच्या उत्कंठेने व तीला मिळविण्याच्या दुर्दम महत्वाकांक्षेने भरत खंडातील मोठमोठे राजे पण आले होते.यज्ञवेदातुन जन्मलेल्या या याज्ञसेनीचे अनुपम सौंदर्य,प्रखर बुध्दीमत्ता,दाहक तेजस्वीपणा इत्यादी अलौकिक गुणांची ख्याती त्यांच्या कानी पोहचली होती. दुर्योधन बंधु,कर्ण, गांधार पुत्र शकुनी, सौबल,बृहदल, इत्यादी राजे हजर होते. पंचनद्यादेश,विराटदेश,मगधदेशांचेही राजे चढाओढीने आले होते.भरतखंडाती ल एकही मोठा राजा येण्याचा राहिला नव्हता.सर्वांची ससैन्य शिबिरे पडली होती.आतांपर्यत कोणत्याही राजकन्ये साठी एवढी राजामहारांची गर्दी झाली नव्हती.अग्निशिखा द्रौपदीला जिंकण्या ची दुर्दम्य आकांशा मनी बाळगुन हजर झाले होते.नव्हते फक्त पांडव.ते लक्षागृहात जळुन मेल्याचे वृत्त मागेच सगळीकडे पसरले होते.त्यामुळे कांहीना आनंदी झाले होते,कारण एकटा अर्जुनानेच हा ‘पण’ जिंकला असतां व आपल्याला संधी मिळाली नसती.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *