योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे…

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

मृत्युपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, “माझ्या आजोबांनी मला दिलेले हे एक घड्याळ आहे”… हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे… मी ते तुला देतो… तू दागिन्यांच्या दुकानात जा… त्यांना सांग की, मला ते विकायचे आहे… ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा… “मुलगा दागिन्याच्या दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला आणि म्हणाला, त्यांनी १५० रुपये ऑफर केले… कारण ते फारच जुने आहे… वडील म्हणाले, “आता तू भंगाराच्या दुकानात जा”… मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येऊन म्हणाला,

त्यांनी २० रुपये अॉफर केले… कारण ते खूप खराब झाले आहे.. आता वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितलं… तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला… म्हणाला, बाबा क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी ५ लाख रुपयांची ऑफर दिली आहे… वडील शांतपणे स्मितहास्य करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की, योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे… स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागावू नका… ज्यांना आपले मूल्य माहीत आहे, तेच आपली प्रशंसा करतात… आपली किंमत जाणून घ्या… म्हणजे अशा व्यक्तीपासून दूर रहा, ज्यांना आपली किंमत नाही…

बाळासाहेब हांडे संग्रहित सर्व साहित्य पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *