६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ६.


जे लोक घरदारे आणि शेतीवाडी करुन स्थायीक झाले आहेत त्यांना स्थान त्याग करणे अशक्य आहे,पण आपण गवळी असल्यामुळे एखादे योग्य स्थान बघुन गौळीपाडा तीथे वसवावी लागेल. सर्वानुमते कृष्णाने शोधलेल्या यमुनातीरी रम्य व विपुल दाट कुरणांनी भरलेल्या वृंदावनमधे नंदाचा गोकुळपाडा तीथे वस्तीला आला. वृंदावनमधे सगळी कडे कदंबाचीच झाडे,शिवाय गोवर्धन पर्वत,उंच उंच शिखरे,मधुर फळांचे वृक्ष, यमुना नदी जवळच असल्यामुळे पाण्या ची समृध्दी जणुं दुसरे नंदनवनच! नंदन वनातुन जशी नलिनी नदी गेली तशीच वृंदावनातुन अगदी मधोमध कालींदी नदी चा प्रवाह गेलेला,गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी ‘मंजिर ‘ नावाचा प्रचंड वटवृक्ष


हे स्थान निश्चित झाल्यावर सर्वांनी आपापले सामान आवरुन वृंदावनाला जाण्याची तयारी करुं लागले,नवीन जागी वृंदावनाला जातांना ऐकीकडे आनंद होत होता,तर दुसरीकडे ज्याठीकाणी आयुष्या चे दिवस घालवले ते जुनं स्थान सोडुन मनाला खिन्नपणा येऊन वियोगाचे दुःख पण होत होते.मात्र कृष्ण!संकर्षण,त्यांचे गोपसख्यांना नदीत डुंबायला,वाळुत,कदं बाच्या वनात खेळायला मिळेल म्हणुन आनंदात होते,


जाण्याचा दिवस उजाडला.तयारी निशी गाड्यांमधे अवजड सामान भरुन सर्वजण मार्गस्थ झालेत.मागे वळून पाहि ल्यावर व्रजगोकुळ उजाड,उध्वस्त अरण्यासारखे दिसुं लागले.श्रीकृष्ण आपली बासरी वाजवित सर्वांच्यामधुन चालत होता.पाहतां पाहतां सर्वजण वृंदा वनात पोहोचले.मोठी विस्तिर्ण जागा पाहुन तात्पुरता आडोसा तयार करुन, स्वयंपाकघर,पुढे बैठकीचे दालन,दारापुढे मोठे अंगण करण्यात आले.चुली पेटल्या. स्वयंपाक सुरु झाला.अंगणांत खाटा पडल्यात.गोपांचा प्रमुख वृध्द नंद एका खाटेवर बसला.त्याच्याभोवती अनुभवी गोप बसले होते.

खरच हे वृंदावन म्हणजे दुसरे नंदनवनच!श्रीकृष्ण तल्लीनतेने बासरी वाजवत होता.बासरीचे सूर आस मंतात भरुन गेलेत.आणि सर्व विश्व जागीच स्तब्ध झाले.गोपी पेटलेल्या चुली व हातातील कामे तशीच टाकुन बासरीचे सूर ऐकण्यासाठी नंदाच्या घराकडे धावल्या.यशोदा व रोहिणीही बाहेर आल्यात.पश्चिम क्षितिज लालसर झाले. सूर्याचा लाल गोल तिथेच थबकला.त्या लालसर अद्भुत,अद्वितीय अलौकीक प्रकाशात श्रीकृष्णाची मूर्ती वेगळीच दिसु लागली शंख,चक्र,गदाधारी जणुं विष्णुच सर्व गोपगोपी नतमस्तक झाले.नंदयशोदे च्या डोळ्यातुन आनंदाश्रु वाहु लागले. तेवढ्यात बासरी वादन बंद करुन नऊ वर्षाचा कृष्ण धावत नंदाजवळ येऊन म्हणाला,बाबा! उद्यापासुन दादा आम्हाला यमुनातीरी मल्लविद्या शिकवणार आहे.


वृंदावनात राहायला आल्यावर, वसुदेवाचे दोन्हीही पुत्र बलराम आणि कृष्ण वनांत गाई वासरांचे कळप चाराय ला नेऊ लागले.तिथे गोपसवंगड्यांसह यमुना नदीत भरपुर पोहणे,वृक्षांच्या सावलीत मनसोक्त खेळणे,न्याहारी करणे सूर्य कलेपर्यंत वृक्षाखाली पहुडणे व घरी जाण्याच्या वेळेस कृष्णाने बासरीचे सूर काढले की,गाई वासरे जिथे असेल तिथुन उड्या मारीत त्याच्या दिशेने येत असत. संध्याकाळी घरी पोहोचले की,बलराम कृष्णावरुन यशोदा रोहिणी मिठ मिरच्या ओवाळुन दृष्ट काढीत असे.


पाहतां पाहतां ग्रीष्म संपुन पर्जन्य सुरु झाला.जिकडे तिकडे सृष्टी हिरवीगार दिसुं लागली.यमुना दुथडी वाहुं लागली. बाहेर पर्जन्यधारा कोसळत होत्या. काळ्या मेघांनी भरलेले आकाश पाहुन बलराम म्हणाला,मेघांनी बघ,तुझाच वर्ण चोरुन घेतलाय! कृष्णा हा काळ तुझा निद्रा घेण्याचा,अरे शयनी एकादशीपासुन कार्तिकी एकादशीपर्यंत तु झोप घेतोस ना देवा विष्णू? कृष्णाने हलकेच त्याला सावध करत म्हटले,बलभद्रा!आपण पृथ्वीवर कोणत्या कार्यासाठी आलोत हे विसरुं नकोस.तेवढ्यात यशोदा बाहेर येऊन दोघांनाही नास्त्यासाठी आंत घेऊन गेली.


याप्रमाणे दिवस आनंदात जात होते राम कृष्ण पौंगडावस्थेत आले.एक दिवस श्रीकृष्ण एकटाच गायी चारत यमुनेच्या काठाकाठाने जात होता.यमुना दुथडी वाहत होती.ऋषीमुनी स्नान करुन घाटा वर ध्यानधारणेंत मग्न होते.आश्रमाबाहेर होमहवन सुरु होते.कृष्ण तसाच किनार्‍या किनार्‍याने जात असतां एक खुप मोठा डोह त्याच्या दृष्टीस पडला.त्या प्रचंड डोहाच्या तीरावर सर्पांची मोठमोठी बिळं दिसत होती.सर्पांचे त्या डोहाभोवती वेष्टण पडले होते.त्यांच्या फुत्कारांनी डोहाचे पाणी दुषित झाले होते.काठावर ची झाडेही जळुन गेली होती.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *