४५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ४५.

युध्दाचा दहावा दिवस उजाडला. भीष्मांना परशुरामाकडुन मिळालेल्या अस्राने पांडव सैन्याचा नाश करण्यास सुरुवात केली.भयंकर रणकंदन करीत ते कौरवसेनेपासुन बरेच पुढे आल्याने, पांडवसैन्याने त्यांना चारही बाजुंनी घेरुन शिखंडीचा रथ पुढे करुन,अर्जुनाने त्यांचे वर बाणांचा वर्षाव केला.असंख्य बाण त्यांच्या शरीरांत घुसल्याने शेवटी सुर्य अस्ताला जाण्याच्या सुमारास पुर्वेकडे डोके होऊन रथातुन भीष्म खाली पडले.अंगात असंख्य बाण घुसल्यामुळे बाणांच्या शय्ये वर अधांतरी राहिले.कौरवांचा सीमावृक्ष उन्मळुन पडला.त्यांचे डोके लोंबकळते पाहुन अर्जुनाने भूमीत तीन बाण मारुन त्यांचे डोके अलगद सावरुन ठेवले.आणि ती महान विभूती उत्तरायणाची वाट बघत इच्छामरणी असल्यामुळे जीव देहात धरुन ठेवला.शेवटचा प्रयत्न म्हणुन त्यांनी परत एकदा दुर्योधनाला संधी करण्या करितां समजावण्याचा प्रयत्न केला,पण “विनाशकाले विपरित बुध्दी” त्याला पटणे शक्यच नव्हते.दोन्ही पक्षाकडील रथी महारथींनी भीष्मांना नमस्कार करुन जड पावलांनी शिबिराकडे परतले.


११ व्या दिवशी कर्णाच्याच सांगण्यावरुन द्रोणाचार्य सेनापती झाले.त्या दिवशी तुंबळ युध्द होऊन पांडवसैन्याचा भयंकर नाश झाला.दोन्हीकडच्या रथी महारथींच्या आहुत्या पडत होत्या.शेवटच्या म्हणजे अठराव्या दिवशी भीम-दुर्योधनाचे गदायुध्द होऊन भीमाकडुन दुर्योधन ठार झाला.आणि युध्दाचा शेवट होऊन पांडव विजयी झाले.
श्रीकृष्णाच्या आज्ञेने पुढील योजनांच्या विचारविनिमयासाठी द्रौपदीसह सर्व पांडव छावनीपासुन दूर नदीकिनारी गेले. विचारांती असे ठरले की, दुर्योधनाचा शेवट ज्याप्रकारे झाला ते कळल्यावर, महातपस्विनी व सत्याने राहणारी गांधारी देवीचे तप एवढे उग्र आहे की,त्रैलोक्यही दग्ध करण्याचे सामर्थ्य असल्यामुळे, तिच्या कोपापासुन पांडवांना वाचवण्या साठी श्रीकृष्ण त्वरेने हस्तिनापुरी निघुन गेला.

सरळ धृतराष्र्ट महालीच गेला.तिथे द्वैपायन महर्षी व्यास,संजय,व गांधारी बसलेली होती.जनार्दनाने व्यास व धृतरा ष्र्टाचे पदवंदन व गांधारीला अभिवंदन केले.श्रीकृष्ण धृतराष्र्टासमीप बसुन, त्याचेकडुन पेरलेले विषारी बीज,पुत्रमोहा मुळे केलेल्या अपराधामुळे झालेला कुलक्षय इत्यादी गोष्टींचा धृतराष्र्टापुढे पाढा वाचुन केवळ आणि केवळ तुझ्या मुळेच एवढा नरसंहार,कुलक्षय झाला. निदान आतां तरी,पांडवांबद्दलचा आकस असुया करु नकोस,ते तुझेच व तुझ्या कुळातील आहे.त्यांना जवळ कर!नंंतर गांधारीकडे वळुन म्हणाला,तपस्वीनी! तुझ्यासारखी निरपेक्षपणे हितकर उपदेश करणारी,स्वपुत्राला शेवटपर्यंत आशिर्वाद न देणारी,सतत सत्याची कास धरुन ठेवणारी स्री अखिल जगात नाही.आतां शोक न करतां पांडवांच्या विनाशाचा विचारही मनांत आणु नकोस…कृष्णा पुत्रवियोगाने तशी मानसिक दुःखाने दग्ध होऊन कांही वेळापुरती माझी बुध्दी थोडी हळवी झाली होती,पण तुझे बोलणे ऐकुन बुध्दी ताळ्यावर आली.आतां या पुत्रहिन अंधाना पांडवच आधार असेल.


श्रीकृष्ण हस्तिनापुरी धृतराष्र्ट गांधारीच्या सांत्वनात गुंतला असतांना इकडे पांडव व दौपदी नदीकिनारी बोलत बसले होते.पांडवांना जरी विजय मिळाला तरी विशेषतः युधिष्ठीर या सगळ्या महाविनाशाने उद्गिग्न होऊन अंतःकरण विरक्तीने भरुन गेले होते.
सुर्यास्तासमयी मुर्च्छित झालेल्या दुर्योधनाची शुध्द येऊन फुटलेल्या मांडी च्या वेदनेने विव्हळत असतांनाच,रणांगण सोडुन गेलेले अश्वत्थामा,कृपाचार्य,आणि कृतवर्मा तिथे येऊन पोहोचले.आपल्या राजाची दयनीय अवस्था पाहुन तिघेही क्रोधीष्ट झाले.अश्वत्थामा संतापाने कठोर पणे म्हणाला, पांडवांनी विश्वासघाताने अतिशय निचपणे माझ्या पित्याचा घात, तुझी अशी अवस्था केली.राजा!शत्रु केवळ अधर्माने विजयी झाले, राजा जर तुझी अनुमती असेल तर अजुनही पांडवांना ठार करीन.


दुर्योधनाचा क्षीण झालेला स्वर एका एकी उत्तेजीत झाला.अश्वत्थामाचा सेनापती म्हणुन अभिषेक करण्यांत आला.दुर्यौधनाला अशास्तव करुन तिघे रथात बसुन दक्षिणेकडील एका अरण्यांत एका झाडाखाली विसाव्यास बसले.कृत वर्मा व कृपाचार्य थकल्याने गाढ झोपी गेले,पण अश्वत्थामाला अति क्रोधाने सूड सूड करीत विचारांच्या गर्तेत तसाच पडुन राहिला.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *