दहीभातात दडलंय आनंदाचं रहस्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आपण गणपतीच्या हातावर दही भात देतो… तसेच ब्राह्मण वर्ग नेहमी दहीभात खात असतो… तो दहीभात कसा योग्य आहे, ते आता सिद्ध झालं आहे… जगातील सर्वात जुनं शास्त्र म्हणून ओळखलं जाणाऱ्या आयुर्वेदात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे… यानुसारच पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची… या मागील कारणाचा आपण कधी विचार केला आहे का?… दहीभात खाल्ल्यानं मेंदूची कार्यक्षमता वाढते, असे संशोधनात सिद्ध झालं आहे…

मानवी शरीराला आवश्यक असणारं ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते…
पण आश्चर्याची गोष्ट अशी की, हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही… याचाच अर्थ असा की, आपण खाल्लेल्या गोष्टींपासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते… शरीरातील इतर घटकांसोबत त्याचं मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही रसायनं तयार होतात… त्यातील सेरटोनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे… त्याने आपला मूड चांगला होणं, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणं यांसारखे फायदे होतात…
ट्रिप्टोफॅनने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला मेंदूत जाणाऱ्या रक्तापर्यंत जावं लागतं…

ते इतर रसायनांएवढे सोपं नाहीये… त्यासाठी ट्रिप्टोफॅनचं कर्बोदकांबरोबर विघटन व्हावे लागतं… कर्बोदकांच्या मदतीनं ट्रिप्टोफॅन मेंदूच्या रक्तापर्यंत पोहोचतं…
आता असा प्रश्न पडेल की, कर्बोदक सांगितल्यावर दही भाताबरोबरच का खावं?… याचे प्रमुख कारणं म्हणजे तांदळामध्ये कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं… म्हणून दहीभात खाल्ल्यानं मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते… असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करता… त्यामुळे यापुढं जेवणाची सांगता करताना थोडातरी दहीभात खावा…
दहीभात खाण्यामुळं मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच… शिवाय आनंदी राहण्यासही मदत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही…

बाळासाहेब हांडे संग्रहित सर्व साहित्य पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *